पाचोरा नगरपालिकेत भाजप गटनेतेपदी सुरज वाघ यांची सर्वानुमते निवड
(राजेंद्र खैरनार |मु्ख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सुरज संजय वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीमुळे पाचोरा शहराच्या राजकारणात भाजप संघटनेला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. या निवडीप्रसंगी मा. आमदार दिलीप भाऊ वाघ, अमोल भाऊ शिंदे, वैशालीताई सूर्यवंशी तसेच संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुरज वाघ, राहुल गायकवाड, सौ. कविता विनोद पाटील, सौ. कविता उमेश हटकर, गोपाल अर्जुनदास वासवाणी, देशमुख आमरीन अब्दुल रहेमान यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमास भाजपचे जेष्ठ व सक्रिय कार्यकर्ते मधुकर काटे, सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, सचिन भोसले, भूषण वाघ, वासुदेव महाजन, विकास पाटील, शरद सुभाष पाटील, विनोद सुभाष पाटील, लकी पाटील, ॲड. अविनाश सुतार, सुनील पाटील सर, ए. बी. अहिरे, सतीश बापू शिंदे, टिपू देशमुख, बंटी हटकर, दीपक माने, स्वप्निल सोनार, ॲड. ललित सुतार, पिंटू चौधरी, जगदीश पाटील, निखिल डी. पाटील, बंटी महाजन, कृष्णा साळुं...