Posts

Showing posts from June, 2025

जैन सोशल ग्रुप तर्फ दोंडाईचा येथे आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) दोंडाईचा प्रतिनिधी: दोंडाईचा:येथील जैन सोशल ग्रुप व स्व.ललीतादेवी रमेशचंद पारख यांच्या स्मरणार्थ गुडघ्याच्या व कंबरेच्या वेदनांना मुक्तता करण्यासाठी चिकित्सा शिबीर घेण्यात आले.यात अडीचशे पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.सदर शिबिराचे आयोजन दादावाडी येथे करण्यात आले होते.या शिबिरात राजस्थान राज्यातील जोधपुर येथील लक्ष्मीकांत पारख यांनी तपासणी केली. यांनी शिबिरार्थीना आयुर्वैदिक लेप लावून उपचार पद्धति समजून सांगितली. आयुर्वैदिक भुकटी लेप कसा  तयार करावा व लावावा याबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिराला डूंगरचंद बाफना,धरमचंद बोथरा यांची उपस्थिती लाभली. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष गणेश कोटेचा, प्रकल्प प्रमुख रविन्द्र कोटडिया, सचिव दिनेश कर्नावट,रमेशचंद पारख, मनोज मालू, संजय दुग्गड, अनिल पारख, प्रदीप पारख, रितेश कवाड,सुमीत चतुरमुथा,महेंद्र बिनायक्या,जितेंद्र बिनायक्या,नरेंद्र छाजेड, मुकेश बेदमुथा,देवेन्द्र भंडारी, नरेंद्र  भंडारी, महेंद्र चोपडा, सुनिल  पारख, अमरीश चतुरमुथा,नवनीत रुणवाल,...

पाचोरा नगरपरिषदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत भव्य महिला बचत गट मेळावा उत्साहात संपन्न..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा (प्रतिनिधी)  पाचोरा :-महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व जीवनमान उन्नतीसाठी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी दिनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने दिनांक ३० जून २०२५ रोजी समर्थ लॉन्स, पाचोरा येथे भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. किशोर आप्पा पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिता पाटील, संजय गोहील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, भिमसेना, युवासेना चे प्रविणभाऊ ब्राह्मणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रशासनातील उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी  दुर्गेश सोनवणे, आरोग्य अधिकारी  नकवाल साहेब, इलेक्ट्रिक विभागाचे रेवेकर साहेब  सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग,तहसीलदार विनोद कुमा...

दि पाचोरा पिपल्स बॅक निवडणुकीत एक जागा वगळता सर्व जागांवर बिनविरोध निवड; अतुल संघवी पॅनलचे वर्चस्व स्पष्ट...!

Image
पाचोरा प्रतिनिधी  30/6/2025 पाचोरा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दि पाचोरा पिपल्स बॅक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 09 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात उतरले असून, या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे तर उर्वरित सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अतुल सुभाषचंद संघवी यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या पॅनलचा प्रभाव ठळकपणे जाणवला. सहकार क्षेत्रातील प्रभावशाली चेहरा असलेल्या संघवी यांच्या संघटन क्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय यानिमित्ताने आला. या निवडणुकीत पॅनलतर्फे अतुल संघवी यांच्या नेतृत्वाखाली पुढील उमेदवार उभे होते – प्रशांत श्रीकिसन अग्रवाल, स्वप्निल सुधारकर पाटील, देवेंद्र रमनलाल कोटेचा, अनंतराव बाबुराव पाटील, राहुल अशोक संघवी, नरेंद्र उत्तमराव पाटील, पुखराज इंदरचंद डांगी आणि अविनाश वसंतराव कुडे. या पॅनलविरुद्ध निलेश विनायक मराठे यांनी एकटेच अर्ज भरल्याने एकाच जागेसाठी निवडणूक होणार असून उर्वरित 9 जागांसाठी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. विशेष म्हणजे ओबीसी, महिला, शाखा, एनटी व अनुसूचित जाती-जमाती राखीव जागांवर बिनविरोध निवड झालेली आहे...

शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा उपयोग तुम्ही जगाला बदलण्यासाठी करू शकता" युवा सामर्थ्य फाउंडेशन पाचोरा कडून जिल्हा परिषद मराठी शाळा, सिंधी कॉलनी येथे वह्या व पेन वाटप.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) ता:- 30 जून 2025 पाचोरा : युवा सामर्थ्य फाउंडेशन, पाचोरा यांच्या वतीने आज जिल्हा परिषद मराठी शाळा, सिंधी कॉलोनी येथे विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनिअर उमेश उर्फ बंटी हटकर हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात. यापूर्वी देखील त्यांनी वाचनालय, सेवा केंद्र यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. "शिक्षण हा वाघीणीचा दुध जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ...म्हणून शिका" भारतरत्न बाबासाहेब डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर. या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश उर्फ बंटी हटकर, ॲडव्होकेट राजेंद्र वासवानी, शिवाजी हटकर, यश मोरे, पंकज पवार, आकाश केसवानी, जितेश नागरानी तसेच शाळेचे शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबत फाउंडेशनचे अध्यक्ष इजि.बंटी हटकर यांनी पुढे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वाटर-प्युरिफायर व सामान्य झान ची पुस्तके देण्सास आश्वासीत केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून उपस्थितांनी फाउंडेशनच...