Posts

Showing posts from July, 2025

शिक्षणाची लाल दिव्याची आशा – श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील कु. राजनंदिनी खैरे हिचे नवोदय यश...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल 9021356277) पाचोरा प्रतिनिधी:- पाचोरा -  शहरातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्तीमधून शिक्षणाची एक नवी उमेद निर्माण करणाऱ्या कु. राजनंदिनी खैरे हिने शासकीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे पान जोडले आहे. श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या नामवंत शाळेच्या इयत्ता पाचवी 'क' वर्गातील ही विद्यार्थिनी 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी झाली असून तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी निश्चित झाली आहे. या यशस्वी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. राजनंदिनी भीमराव खैरे ही सौ. सुवर्णा व भीमराव आनंद खैरे यांची कन्या असून, पाचोरा शहरातील मिलिंद नगर भागातील दलित वस्तीमध्ये राहते. या परिसरात शैक्षणिक वातावरणाचा पूर्णतः अभाव असून, मूलभूत सुविधा सुद्धा अपुऱ्या आहेत. येथे शिक्षणाच्या दृष्टीने कोणतेही उपक्रम नियमित राबवले जात नाहीत. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या राजनं...

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल 9021356277) पाचोरा प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे नव्याने भाडोत्री राहण्यासाठी आलेल्या एका सुखी कुटुंबात आज पहाटे दुःखाचा डोंगर कोसळला कारण होते पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय...आणि यातुनच रागाच्या भरात पतीने घरकामासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकुने पत्नीच्या गळ्यावर व पोटात सपासप वार करत पत्नीला जीवानिशी संपविले... प्रियंका खुशाल भदाणे असे मयत विवाहितेचे नाव असुन पती खुशाल भदाणे याने कृत्य केल्यानंतर गळफास लावुन घेत असतांनाच पाचोरा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून खुशाल पाटील याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. संजय निकुंभ हे करीत आहेत.

दोंडाईचा डी.बी. पथकाची कारवाई – ५ चोरीच्या मोटारसायकलींसह संशयित चोरटा गजाआड...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) दोंडाईचा प्रतिनिधी: दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी. पथक) अचूक माहिती व तात्काळ कारवाई करत एक मोठी चोरी उघडकीस आणली आहे. तब्बल पाच चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करत एक संशयित चोरटा अटक करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस यंत्रणेसाठी एकमोठे यश मानली जात आहे. दोंडाईचा शहरातील राणीपुरा होळी चौक येथील अविनाश धनगर (वय २२) यांच्या ताब्यातील ५०,००० रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने २७ जून ते २८ जून २०२५ दरम्यान त्यांच्या घरासमोरील अंगणातून लंपास केली होती. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १६१/२०२५ नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी सहा. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी डी.बी. पथकास निर्देश दिले होते. त्यानुसार ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस गस्तीदरम्यान मांडळ चौफुली जवळ एक संशयास्पद युवक लाल रंगाच्या विना नंबरच्या पल्सर मोटारसायकलवर फिरताना आढळून आला. तपासाअंती संबंधित इसमाचे नाव जुनेद इसाक शेख (वय २०, रा. म्हाळसा नगर, दोंडाईचा) असे निष्पन्न झाले. ...

कर्तृत्वाचा गौरव... सेवाभावी कुस्तीपटू काकासाहेब पाटील यांचा निरोप समारंभ भावुक वातावरणात संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (बांबरुड महादेवाचे, ता. पाचोरा) – गावाच्या सामाजिक, क्रीडा, आणि विकास कामांमध्ये नेहमी अग्रेसर राहून आपल्या सेवाभावी आणि कर्तृत्वशील कार्यशैलीने समाजमनात आदराचे स्थान निर्माण करणारे काकासाहेब कृष्णराव पाटील यांचा निरोप समारंभ महादेवाचे बांबरुड येथे रविवार, १३ जुलै २०२५ रोजी अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. बजाज ऑटो कंपनी, छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल ३५ वर्षे क्वालिटी कंट्रोलर इन्स्पेक्टर पदावर निष्ठेने सेवा बजावणाऱ्या या कुस्तीवीर सेवकाचा गौरव करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले.    कार्यक्रमाचे आयोजन पद्माई सिमेंट प्रॉडक्ट्स व महादेवाचे बांबरुड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या गौरव समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब किशोर पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ) होते. तर माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, आरटीओ इन्स्पेक्टर दादासाहेब हेमंत शिवाजी पाटील (...

चाळीसगावमधून ३१०० वारकऱ्यांची मोफत पंढरपूर वारी; आमदार मंगेश चव्हाण यांची संकल्पना पुन्हा यशस्वी...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक १२ जुलै रोजी चाळीसगाव शहरातून सुमारे ३१०० वारकरी खास मोफत पंढरपूर वारी स्पेशल ट्रेनने प्रस्थान झाले. ही वारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून यंदाही यशस्वीपणे आयोजित करण्यात आली असून, हे सलग पाचवे वर्ष आहे. रात्री ९ वाजता चाळीसगाव स्थानकावरून रेल्वेने निघालेल्या या भक्तांच्या यात्रेला उत्साही वातावरण लाभले. खास बाब म्हणजे आमदार मंगेश चव्हाण स्वतःही वारकऱ्यांसोबत रेल्वेने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. वारीच्या संपूर्ण प्रवासात – चाळीसगाव ते पंढरपूर –पंढरपूर ते चाळीसगाव वारकऱ्यांसाठी जेवण, राहण्याची व्यवस्था आणि आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन आमदार चव्हाण यांनी केले आहे. हजारो वारकऱ्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखीसोबत विठू माऊली च्या गजरात रेल्वे स्टेशन कडे जात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी विशेष ट्रेन ने रवाना झाले.   यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी देखील हजेरी लावली  चाळीसगाव परिसरातील नागरिकांमध्ये आमदार चव्हाण यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, त्य...

रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे तर्फे पॉकसो कायदा विद्यार्थ्यांचे हक्क व अधिकार यावर मार्गदर्शन...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी: पाचोरा विधी सेवा समिती आणि रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे तर्फे पॉकसो कायदा,विद्यार्थ्यांचे हक्क व अधिकार यावर आज दि 11जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम निर्मल इंटरनॅशनल स्कुल पाचोरा येथे आयोजित करण्यात आला. पॉकसो ऍक्ट संदर्भात माहिती रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी केले. यावेळी शाळेत रोटरी तर्फे इन्टेरेक्ट क्लब स्थापन करण्यात आला. यावेळी विधी सेवा समिती सदस्या ललिता पाटील, प्रकाश विसपुते आणि प्रा डॉ वैशाली बोरकर आणि रोटरीचे सचिव डॉ अजयसिंग परदेशी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या प्रसंगी वकील संघांचे उपाध्यक्षा सौ कविता मासरे, सदस्य अंबादास गिरी, चंचल पाटील यासोबत रोटरी क्लब चे पदाधिकारी अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, सदस्य चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, संजय कोतकर, डॉ सिद्धांत तेली, सौ अरुणा उदावंत तसेच तालुका विधी सेवा समिती सदस्य प्रा डॉ वैशाली बोरकर, सौ ललिता पाटील, प्रकाश विसपुते सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश राजपूत, पर्यवेक्षिका स्नेहल प...

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था तर्फे पाचोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचा सत्कार...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:- जय संघर्ष ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक-मालक बांधव सामाजिक कामात  पुढे असतात,सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचा सत्कार करण्यात आला   वेळी जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण वाघ सह पाचोरा तालुक्यातील वाहन चालक मालक व जय संघर्ष ग्रुप चे सदस्य पदाधिकारी श्री योगेश पवार,श्री दिपक पवार संजय पाटील,सेख शाकिर,भावडु कोळी,सचिन पाटील,आनंदसिंग जाधव,धिरज ब्राह्मणे,जगदिश पाटील, योगेश पाटील,अनिल पाटील,रविद्र कोळी,सदस्य पदाधिकारी उपस्थित होते जय संघर्ष ग्रुप अपघातग्रस्त वाहनांना,रस्त्यावर बंद पडले वाहने,मदत करत असतो,वाहन चालक मालक यांच्या न्याय व हक्का साठी नेहमी कार्यरत असते व जय संघर्ष ग्रुप चे जाळे संपूर्ण देश भर पसरले आहे

पाचोरा तालुका भाजपा तर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिमा भेट देऊन गुरुजनांचा सन्मान...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:  पाचोरा -आज गुरुवार रोजी गुरुपौर्णिमचे औचित्य साधत ज्येष्ठ व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुरुजनांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन पाचोरा तालुका भाजपा तर्फे *तालुका अध्यक्ष गोविंद चंद्रकांत शेलार* यांच्या नेतृत्वात सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम लोहठार व बाळद बुद्रुक येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपचे मा.सभापती सुभाष पाटील, प्रमोद सोमवंशी,योगेश माळी, रोहिदास मांडोळे, मधु नाना पाटील, विजुभाऊ परदेशी, जगदीश राजपूत, गौरव पाटील, दत्तात्रय पाटील, उमेश परदेशी, , दीपक पवार तसेच जि.प.शाळा लोहठार व बाळद मुख्याध्यापक  संभाजी पाटील, मुख्याध्यापिका परदेशी मॅडम , वृंदाताई महेश सोमवंशी, बंडू भाऊ सोनार,प्रमोद पाटील सर उपस्थित होते.  यावेळी खालील ज्येष्ठ गुरुजनांचा सन्मान करण्यात आला व्ही.पी.वाणी सर,व्ही.डो.वाणी,एन.आर.पाटील सर ,ऐ..बी.महाजन सर , प्रदीप सोमवंशी सर, दत्तात्रय भाऊसाहेब निकम, के. एस.पाटील. तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती विजया भालचंद्र...

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर यांच्या हस्ते पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री अमोल पाटील यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) हरे.पिंपळगाव प्रतिनिधी:-  पाचोरा येथील रंगार गल्लीतील रहिवासी श्री अमोल पाटील यांची 2013 मध्ये ठाणे शहर भरती होऊन 2021 रोजी जळगाव जिल्हा येथे बदली करून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे 2023 मध्ये येथे पोलीस भरती झाली असता त्यांना जळगाव जिल्हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे त्यांची प्रथमच पोलीस स्टेशनला नियुक्ती झाली असता त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला आपल्या बुद्धीचा कौशल्याचा वापर करून पोलीस खात्यातील वर्दीचा मान ठेवत त्यांनी उत्तम कामगिरी केली गेल्या दोन वर्षात त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे उघडकीस आणून शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने पेमेंट न देता फरार झाला होता त्या व्यापाऱ्याला अटक करून शेतकऱ्याला पैसे वापस मिळून न्याय दिला होता तसेच विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला अनेक उत्तम चांगली कामगिरी केली म्हणून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक  श्री महेश्वर रेडी साहेबांनी यांनी श्री अमोल पाटील यांचा सत्कार व सन्मान केला यावेळी अप्पर पोलीस अधीक्ष...

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते चाळीसगाव वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी श्री नरेंद्र शिंदे यांनी ट्रॅफिक पोलीस म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) चाळीसगाव प्रतिनिधी:- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब यांच्या हस्ते चाळीसगाव वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी श्री नरेंद्र शिंदे यांनी ट्रॅफिक पोलीस म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला...! पाचोराचाळीसगाव वाहतूक शाखेचे श्री नरेंद्र शिंदे यांनी वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी म्हणून अनेक बेशिस्त तसेच विना कागदपत्र ट्रिपल सीट विना लायसन तसेच अल्पवयीन मुलांवर कारवाई करून केसेस करून दंडात्मक रक्कम वसूल करून श्री नरेंद्र शिंदे यांनी जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशनला काम केलेले असून त्यांनी जळगाव शहर पाचोरा पोलीस स्टेशन चाळीसगाव शहर तसेच चाळीसगाव वाहतूक शाखेला दोन वर्षापासून असून त्यांनी अनेक मोटर वाहन चालकावर तसेच विना कागदपत्र बिना लायसन वाहक चालक तसेच अल्पवयीन मुला मुली यांच्यावर कारवाई करून त्यांना दंडात्मक रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात आली असून त्यांनी चाळीसगाव शहरातील नागरिकांना शिस्त लावून ट्रॅफिक पोलीस म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली त्यांच्या या कामगिरीची दखल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महे...