पाचोरा येथे संत जगनाडे महाराजांची ३३६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरीपालखी सोहळा व महाप्रसादाला हजारो भाविकांची उपस्थिती


(राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल)

पाचोरा : पाचोरा शहर तेली समाज व विश्वस्त मंडळाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी अत्यंत भक्तिभाव व उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी व सौ. सीमा चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व सत्यनारायणाची विधिवत महापूजा संपन्न झाली.

यानंतर विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीत संत जगनाडे महाराजांची प्रतिमा विराजमान करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली पालखी मिरवणूक पाचोरा शहर तेली समाज कार्यालयापासून जवाहर हाऊसिंग सोसायटी, परधाडे रोड, पंचमुखी हनुमान चौक मार्गे भजनी मंडळाच्या टाळ-मृदंगाच्या निनादात काढण्यात आली. मिरवणुकीत असंख्य महिलांनी फुगडीचा आनंद घेत वातावरण भक्तिमय केले. समाज कार्यालयाजवळ मिरवणूक व पालखी सोहळ्याची सांगता झाली.

यानंतर समाजातील सर्व कुटुंबांसह परिसरातील सर्व समाजातील गरजू नागरिकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ४,००० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या प्रसंगी पाचोरा तालुका तेली समाजाचे अध्यक्ष सतीश चौधरी, शहराध्यक्ष नारायण चौधरी, सचिव शांताराम चौधरी, उपाध्यक्ष डॉ. उत्तम चौधरी, सहसचिव शरद चौधरी यांच्यासह संचालक मंडळ व समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचोरा शहर तेली समाज विश्वस्त मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..