Posts

Showing posts from April, 2025

निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी "१ मे महाराष्ट्र दिन" व "कामगार दिना"चे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलक लेखन साकारले...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी)निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन याचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर  एक सुंदर असे फलक लेखन साकारले आहे. या फलक लेखनातून एक कामगार तसेच आपला बळीराजा म्हणजेच शेतकरी भर उन्हात , पावसात तसेच कोणत्याही परिस्थितीत काम करत, मोलमजुरी , मेहनत करत आपल्या सामान्य कुटुंबाचे पालन पोषण करत असतो. कामगारांबद्दल तसेच आपल्या बळीराजाबद्दल कृदन्यता व्यक्त करण्यासाठी हे बोलके चित्र शाळेच्या फलकावर साकारण्यात आले आहे . यांतून शाळेचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी  सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . शाळेच्या  फलकाचा वापर हा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेच न देता त्यांतून विद्यार्थ्यांत सामाजिक सलोखा वाढावा तसेच सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक सण , तसेच विविध उत्सव अथवा सामाजिक विषय घेऊन फलक लेखन करत असतात. सध्या निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील  कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा ह्यांचे सामाजिक  फलक लेखन समाजात तसेच...

आज अक्षय तृतीयेच्या दिवशी पाचोरा येथे प्रांताधिकारी व तहसिलदार यांचा पाचोरा जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार बांधवांनी शाल बुके देऊन केला सत्कार..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी): 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्या बद्दल जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी (पाचोरा-भडगाव प्रांताधिकारी) माननीय भुषण अहीरे स व कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांना मा.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनांक 25 एप्रिल रोजी नियोजन भवन जळगाव येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले .... तसेच महाराष्ट्र शासन महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव"सन्मान पत्र" महसूल प्रशासनांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात फेरफार MIS अहवाल-अनोंदणीकृत नोंदी-सर्वात कमी दिवसांत फेरफार निर्गत करणे, अंत्योदय शिधापत्रिका-D1-ED1 अंतर्गत सर्वात कमी तफावत, सामाजिक अर्थसहाय्यक योजना लाभार्थ्याची डीबीटी प्रणालवर सर्वाधिक नोंदणी टक्केवारी, लोकसेवा हमी कायद्यान्वये महा-ऑनलाईन सेवा विहीत मुदती नागरीकांना पुरिविणे व E-Office प्रणालीचा वापर या विषयामध्ये उल्लेखनीय कामकाज केले बद्दल विजय बनसोडे( तहसिलदार, पाचोरा) यांना सन्मानपत्र  ...

"सन्मानाचा निरोप:मुख्याध्यापक ए.बी.आहिरे सरांचा गौरव सोहळा"

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा — पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या श्री गो. से. हायस्कूलमध्ये कार्यरत पर्यवेक्षक ए. बी. आहिरे सर यांना भडगाव मुख्याध्यापकपदाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी एक हृदयस्पर्शी आणि सन्मानाने भरलेला निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ आणि चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनाविवश वातावरणात पार पडला.    ए. बी. आहिरे सर यांची नुकतीच भडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, श्री गो. से. हायस्कूलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या शालेय समितीचे चेअरमन दादासो खलिल देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेवआण्णा महाजन, मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख एम. बी. बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, पर्यवेक्षक सौ. गोहील मॅडम, शिक्षक रहिम तडवी, संगिता वाघ मॅडम, महेश कौडी...

नागपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत असलेले मा.सचिन कदम यांनी अनेक गुन्ह्यांचा योग्य तपास केल्याबद्दल त्यांना "पोलीस महासंचालक"पदक ने १ मे रोजी गौरवण्यात येणार...!

Image
  (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  महाराष्ट्रात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना  गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे  *श्री सचिन कदम साहेब*    यांनी पाचोरा येथे कोरोना काळात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून एक महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली होती तसेच मोटरसायकल बिना कागदपत्र बिना लायसनचे ट्रिपल सीट चालवणारे व्यक्तींना त्यांनी दंडात्मक कारवाई करून शासनाला लाखोचा महसूल दंडात्मक स्वरूपात वसूल केला होता तसेच त्यानंतर त्यांची   जळगाव बुलढाणा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे.ग्रामीण पोलीस उपाधीक्षक पदी नियुक्ती झाली होती तेथेही त्यांनी  गुन्हेगारांचा योग्य तपास करून त्यांनी अटक केली होती त्यानंतर त्यांची सध्या नागपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  येथे कार्यरत आहे.   त्यांनी हिट लिस्ट वर असलेल्या  गुन्हेगारांचा योग्य तपास करून त्यांच्य...

नानासाहेब व्ही टी जोशी यांचा अमृत महोत्सव साजरा...!

Image
 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (नागरी सत्कार व गौरव ग्रंथाचे प्रकाशन)  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी यांचा अमृत महोत्सव रविवार दिनांक 27 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.  पीटीसी शिक्षण संस्था , एम एम महाविद्यालय व नानासाहेब व्ही टी जोशी अमृत महोत्सव समिती यांच्या वतीने एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात अमृत महोत्सवी सत्कार व गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी , नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे , पीटीसी अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ , सेवानिवृत्त कुलगुरू डॉ के बी पाटील , पीटीसी चेअरमन संजय वाघ , शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संजय गरुड , विद्यापीठ सिनेट सदस्य दिलीप पाटील , प्र कुलगुरू एस टी इंगळे , कुलसचीव विनोद पाटील , लेखा अधिकारी रवींद्र पाटील , महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे डॉ शामकांत देवरे ,विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे अमो...

पाचोरा शहरात पाचोरा नगरपरिषद तर्फे श्वान निर्बीजीकरण मोहीम सुरू...! नागरिकांना मिळणार भटक्या कुत्र्यांपासुन सुटकेचा श्वास...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी ):-  पाचोरा शहरात दिवसेंदिवस वाढणारी श्वान संख्या लक्षात घेता,भविष्यात श्वान संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पाचोरा नगरपरिषद मार्फत श्वान निर्बीजीकरण सुरू करण्यात आले आहे.या संदर्भात मा.जिल्हाधिकारी, जळगाव यांनी सदर मोहीम घेण्याबाबत नगरपालिकांना सूचना दिल्या होत्या. शहरातील भटके श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे व परत त्याच परिसरात सोडणे हे काम नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था,नंदुरबार यांना देण्यात आलेले आहे.शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरण व लसीकरण सदर संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.निर्बीजीकरण व लसीकरण केलेल्या श्वानांना विशिष्ठ मार्किंग करण्यात येणार आहे.आतापर्यंत शहरातील बाहेरपुरा,संभाजी नगर,भाजीपाला मार्केट,देशमुखवाडी, रसूल नगर,बहिरम नगर,भारत डेअरी,सिंधी कॉलनी या विविध भागातून आतापर्यंत 125 श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे काम सदर संस्थेने सुरू केले आहे.आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल व आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारु यां...

जळगाव येथील प्रल्हाद सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (जळगाव प्रतिनिधी ) प्रल्हाद सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार  सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशन तफेऀ जळगाव येथील  प्रल्हाद सोनवणे अनुसूचित जनजाती  वंचित आदिवासी कोळी जमातींसाठी करीत असलेले समाजकार्य तसेच ऑटोरिक्षा व विद्यार्थी वाहतुक चालकांच्या विकासासाठी करीत असलेले  कार्य  त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम याची दखल घेऊन  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मीताई कुमावत यांनी २०२५ चा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार  दिला प्रल्हाद सोनवणे आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी  अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄति समिती महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष आक्रमक सामाजिक संघटना सचिव अशा विविध सामाजिक ...

आज दि पाचोरा पिपल्स बॅंकेने मागील पाच‌ वर्षाचा आर्थिक लेखा जोखा दिला पत्रकार परिषदेत..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी):-आज पत्रकार परिषद घेऊन आपणास सर्वाशी हितगुज करण्यासाठी मुख्य कारण की, आत्ताच आपले आर्थिक वर्ष संपलेले असुन बँकेचे सद्यस्थिती, होणारा नफा व इतर आर्थिक बाबी आपणा मार्फत सर्व सभासद व इतरांना माहिती व्हावी. बँकेचे 31 मार्च 2025 अखेर 3 कोटी 41 लाख इतका नफा झालेला असुन ग्रॉस एन.पी.ए.चे प्रमाण 3.62% व नेट एन.पी.ए. सतत तिस-या वर्षी 0% राहीलेला आहे. तसेच संचालक मंडळाने 10% लाभांश देण्याचे शिफारस केली आहे. बँकेने मागील पाच वर्षात केलेला लेखा जोखा खालिलप्रमाणे. दि पाचोरा पिपल्स को ऑप बँक लि. पाचोरा तुलनात्मक माहिती नविन संचालक मंडळाने पदभार स्वीकारला त्यावेळी रिझर्व्ह बँकेने SAF (Supervisory Action frem Work) बँकेवर लादलेले होते. नविन संचालक मंडळ पदभार स्वीकारला त्यावेळी बँकेत कालबाह्य सॉफ्टवेअर अस्तीत्वात होते. बँकेतर्फे दिल्या जाणा-या आर.टी.जी.एस./एन.ई. एफ. टी सेवा ह्या आधी मेल व्दारे आलेल्या फाईल्स या मॅन्युअली जमा कराव्या लागत होत्या, आय. एम. पी. एस सेवा अस्तीत्वात नव्हती. बँकेत या आगोदर ...

चारधाम यात्रा पुर्ण करुन झाल्याचा शुभ कार्यक्रम, पाचोर्यात गंगापुजन,वास्तुपुजन, वही तुला सोहळा होणार संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) भक्ती, श्रद्धा तसेच कृतज्ञतेचा मेळ साधणाऱ्या पाचोऱ्यामधील शिवनेरी नगर येथे दिनांक 4 मे 2025 रोजी एक आगळावेगळा, अभूतपूर्व आणि पाचोरा तालुक्यात,पंचक्रोशीतमध्ये नव्हे तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होणारा पावन सोहळा संपन्न होत आहे. गंगापुजन, वास्तुशांती तसेच पुस्तक तुला या तीन गोष्टींच्या संगमाने हा कार्यक्रम एक नविन अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अध्यायाचा आरंभ ठरणार, दादासो. अरुण मोतीराम पाटील तसेच आईसो. सरुबाई अरुण पाटील यांनी आपल्या जीवनामधील एक महत्त्वाचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, द्वारका, गंगासागर, जगन्नाथपुरी, काशीविश्वेश्वर, रामेश्वरम्, बद्रीनाथ, केदारनाथ, आणि नेपाळ मधील पशुपतिनाथ मंदिर अश्या सर्व पवित्र स्थळांची चारधाम यात्रा त्यांनी पूर्ण केली. या यात्रेचा सफल, निर्विघ्न समारोप करण्यासाठी आणि भगवंत कृपेप्रती   कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता गंगापुजनाचा शुभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चारधाम यात्रेच्या निमित्ताने गंगेचे पूजन करून पवित्रतेचा म...

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिद्धार्थ लेझीम मंडळ नागसेन नगर पाचोरा यांच्यातर्फे समाजासाठी शव पेटी आज लोकार्पण करण्यात आली..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा= नागसेन नगर पाचोरा येथील सिद्धार्थ लेझीम मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नागरिकांसाठी शव पेटी अर्पण करण्यात आले सदरचा कार्यक्रम आज 26 एप्रिल 2025 रोजी नागसेन नगर येथील ग्राउंड वर संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक पृथ्वीराज लोंढे माजी नगरसेवक काँग्रेस नेते एडवोकेट अविनाश भालेराव माजी नगरसेवक अविनाश साबळे आरपीआय नेते भालचंद्र ब्राह्मणे समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे आरपीआय अध्यक्ष शशिकांत मोरे माजी नगरसेवक महेंद्र खेळकर सिद्धार्थ लेझीम मंडळाचे अमोल पवार लखन वाघ जयंती मंडळाचे अध्यक्ष गौतम बागुल खजिनदार आकाश बनसोडे सचिव चंदू सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी व सिद्धार्थ लेझीम मंडळाचे पदाधिकारी अनिल जोगडे रवींद्र सोनवणे अशोक गायकवाड विकास शेजवळ शुभम तांबे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर जय सपकाळे संतोष खैरनार भैया बाविस्कर सागर खरे निलेश जाधव राजू दाभाडे वाल्मीक गायकवाड भैया गायकवाड दादा भिवसने मुकु...

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यां करिता 'करिअर कंपास' हा कार्यक्रम संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) दिनांक 26 एप्रिल 2025 शनिवार रोजी जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यां करिता 'करिअर कंपास' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस एस एम एम  महाविद्यालयाचे उपप्राचार्य मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.वासुदेव  वले सर हे उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.वासुदेव वले सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की करिअर मार्गदर्शन ही योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेता यावा म्हणून लहान वयातच करिअरच्या उद्दिष्टांची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे. आपले रोजचे दैनंदिन नियोजन, अभ्यास नियोजन तसेच परीक्षेचे नियोजन आधीपासून कसे करावे,परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत प्रा. डॉ.वासुदेव वले सर  यांनी वि...

आज ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्क अकॅडमी पाचोरा येथे आज पाचोरा भडगावचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्क अकॅडमी पाचोरा येथे आज दिनांक 26/4/2025 रोजी पाचो-याचे कार्यसम्राट आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांनी मा. किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार केला. यावेळी पाचोरा माजी नगराध्यक्ष मा. संजय गोहिल, माजी लोकनियुक्त जवखेडे सीम सरपंच दिनेश बापु आमले,  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सायबर सेक्युरिटी प्रोफेशनल बेसिक ऑनलाईन कोर्स चे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन हि संस्था 2010 सालापासून पाचोरा शहर व ग्रामीण भागात काम करत आहे. संस्थे आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती गोकुळ सोनार यांनी दिली. . महिलांना  विविध उद्योग व्यवसाय प्रशिक्षण संस्था घेत असते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर, पिक विमा योजना,माती पाणी परीक्षण, फार्मर्स क्लब तसेच शेतकरी अभ्यास दौरा असे विविध प्रकारचे ट्रेनिंग संस्था राबवित असते. सॅनिटरी नॅपकीन मॅन्युफॅक्चरींग युनिट या ...