Posts

Showing posts from March, 2026

पाचोरा न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय; महिला छेडछाड प्रकरणात आरोपी दोषी, शिक्षा ठोठावली

Image
राजेंद्र खैरनार(मुख्य संपादक) सत्य शोध न्युज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी) – महिलांच्या सन्मानाशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयाची ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक 204/2023 मध्ये मा. न्यायालय, पाचोरा येथील मा. जी. एस. बोरा मॅडम यांच्या न्यायासनाने आरोपीला दोषी ठरवत स्पष्ट संदेश दिला आहे. या प्रकरणात फिर्यादी सुभाष तुकाराम सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी बिस्मिल्ला इमाम मुसलमान याच्यावर भारतीय दंड विधान कलम 354(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणाची सुनावणी RCC क्रमांक 178/2025 अंतर्गत पार पडली. दि. 31 मार्च 2026 रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने CRPC कलम 248(2) नुसार आरोपीस दोषी ठरवले. तसेच आरोपीला फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून 25,000 रुपये, 1,000 रुपये दंड आणि “कोर्ट उठेपर्यंत” साधी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात एकूण 7 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून PSI अमोल पवार यांनी काम पाहिले, तर सरकारी अभियोक्ता श्री पी. बी. भावसार यांनी प्रभावी बाजू मांडली. मा. SDPO बा...

पाचोरा कृष्णापुरी वि.का. सहकारी सोसायटीची शंभर टक्के कर्जवसुली; परंपरा यंदाही कायम

Image
राजेंद्र खैरनार(मुख्य संपादक) सत्य शोध न्युज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी):पाचोरा येथील पाचोरा कृष्णापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने सन 2025-2026 या आर्थिक वर्षात मार्च महिन्यापूर्वीच बँक कर्जाची 100 टक्के वसुली करून उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली शंभर टक्के कर्जवसुलीची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात संस्थेला यश आले आहे. संस्थेचे कार्य गेल्या 28 वर्षांपासून सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेने दरवर्षी मुदतीत बँक कर्जाची परतफेड करून आदर्श निर्माण केला आहे. सभासदांशी सातत्याने संपर्क साधत, शून्य टक्के व्याजासह संस्थेकडून अतिरिक्त 2 टक्के व्याज सवलत (रिबेट) देण्याचा महत्वाचा निर्णय संस्थेने घेतला. या प्रोत्साहनपर उपक्रमामुळे सभासदांमध्ये वेळेवर कर्जफेड करण्याबाबत जागरूकता वाढली आणि सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले कर्ज नियमितपणे फेडले. परिणामी, संस्थेला बँकेचे कर्ज पूर्णपणे परतफेड करता आल...

वडगाव पान ऍसिड हल्ला : संतप्त सोनार समाज रस्त्यावर, आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची जोरदार मागणी

Image
राजेंद्र खैरनार (मुख्य संपादक) – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा : संगमनेर तालुका मधील वडगाव पान येथे सोनार समाजातील एका तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला असून, या अमानुष घटनेविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, तसेच पीडितेला लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी पाचोरा येथील सोनार समाजाने केली आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा येथील अहिर सुवर्णकार मंडळ, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळ आणि सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत निवेदन सादर केले. हे निवेदन पाचोरा येथील तहसीलदार श्री विजय बनसोडे तसेच पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित मुलीच्या उपचार व न्यायप्रक्रियेसाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे समाजात तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच...

पाचोरा तालुक्यात गुटख्याचा उच्छाद; ‘गुटखा किंग’ दिलीपवर कारवाईचा सवाल तापल...!

Image
पाचोरा : तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीने सध्या भीषण स्वरूप धारण केले असून, कायद्याला सरळसरळ धाब्यावर बसवत हा अवैध व्यवसाय खुलेआम फोफावत असल्याचे वास्तव समोर येत आहे. शासनाच्या स्पष्ट बंदीनंतरही गुटखा विक्री थांबण्याऐवजी उलट अधिकच वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘गुटखा किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप नावाच्या व्यक्तीभोवती संशयाची साखळी घट्ट होत असून, त्याच्यावर अद्याप ठोस कारवाई का होत नाही, हा प्रश्न नागरिकांच्या मनात तीव्रतेने घोंगावत आहे. तालुक्यातील अनेक चौक, सार्वजनिक ठिकाणे, तसेच शाळा व मंदिर परिसरातही गुटख्याची विक्री निर्भयपणे सुरू असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. पानटपऱ्या आणि किरकोळ दुकानांमधून बंदी असलेला गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. आरोग्यदृष्ट्या घातक असलेल्या या पदार्थामुळे कर्करोग, हृदयविकार आणि तोंडाच्या गंभीर आजारांचा धोका वाढत असताना प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. अधूनमधून होणाऱ्या छापेमाऱ्या आणि जप्तीच्या कारवाया या केवळ औपचारिकता म्हणूनच केल्या ...

कृष्णापुरी वार्ड क्रमांक १४ मध्ये मतदार यादी पडताळणी शिबिर; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Image
राजेंद्र खैरनार(मुख्य संपादक) सत्य शोध न्युज  पाचोरा (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक १४, कृष्णापुरी परिसरातील नागरिकांसाठी मतदार यादी पडताळणीसंदर्भात महत्त्वपूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या मताधिकाराची नोंद अचूक राहावी यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्या, दि. १ एप्रिल २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत मारोती मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा येथे हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात संबंधित विभागातील सर्व बीएलओ (Booth Level Officers) उपस्थित राहून नागरिकांच्या मतदार यादीतील नोंदी तपासणार असून, आवश्यक त्या दुरुस्त्या तसेच मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. विशेषतः ज्या नागरिकांची नावे २००२ च्या मतदार यादीत होती, परंतु २०२४ च्या अद्ययावत यादीत अद्याप मॅप झालेली नाहीत, अशा नागरिकांनी या शिबिरात हजर राहून आपली नोंद पूर्ण करून घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मतदानाच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. नगरसेवक प्रदीप भगवान वाघ आणि नगरसेविका सुरेखा अशोक पाटील यांनी नागरिकांना व...

अमरावतीत शिवसेनेला नवे बळ; आमदार किशोर आप्पा पाटील संपर्कप्रमुख—संघटनशक्तीवर पक्षाचा ठाम विश्वास

Image
पाचोरा – भडगाव मतदारसंघात आपल्या प्रभावी नेतृत्वाने सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर शिवसेनेने पुन्हा एकदा मोठा विश्वास टाकत त्यांना अमरावती लोकसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्त केले आहे. पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या संघटन कौशल्याची राज्यस्तरावर झालेली ही ठळक दखल मानली जात आहे. आमदार पाटील यांनी पाचोरा – भडगाव मतदारसंघात केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभे केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनशैली ही सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारी ठरली आहे. गावागावांत जाऊन संवाद साधणे, स्थानिक प्रश्नांची तातडीने दखल घेणे आणि प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांनी जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. अमरावती लोकसभा क्षेत्र हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असताना, त्या ठिकाणी सक्षम नेतृत्वाची गरज होती. अशा परिस्थितीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नियुक्...

"थकीत कर भरा, दंडातून सुटका करा — ३१ मार्चपर्यंत शेवटची संधी; १००% शास्ती माफीसाठी पाचोरा नगरपरिषदचा कडक इशारा!”

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभावी पाऊल उचलत “अभय योजना (शास्ती माफी)” जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १९ मे २०२५ पूर्वीच्या शास्ती (दंड) रकमेवर १०० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कर थकबाकीदार नागरिकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या कालावधीत नागरिकांनी संपूर्ण थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यासच शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. अन्यथा कोणतीही सवलत लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योजनेतील अटींनुसार, मालमत्ता करासोबत पाणीपट्टी कर भरणे बंधनकारक आहे. तसेच विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे ठरते. नगरपरिषदेकडून ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विशेष कर वसुली सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 👉 एकीकडे महसूल वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, तर दुसरीकडे नागरिकांन...

उत्तर महाराष्ट्रात कामगार संघटन बळकटीकरणासाठी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा भव्य दौरा जाहीर

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल उत्तर महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना आता मैदानात उतरली आहे. शिवसेना नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्रात व्यापक संघटन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, या दौऱ्यामुळे कामगार चळवळीला नवे बळ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या दौऱ्यादरम्यान कामगारांचे प्रलंबित प्रश्न, संघटन विस्तार, तसेच आगामी लढ्यांची रणनीती यावर सखोल चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कामगारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्यावर भर दिला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यात प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण, प्रदेश संघटक श्री. नानासाहेब बच्छाव, सफाई कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष श्री. संतोष मकवाना आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. जितेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दौऱ्याची सुरुवात ५ एप्रिल रोजी जळगाव येथून होणार असून, त्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक आणि शिर्डी येथे बैठका घेण्यात य...

कृष्णापुरीत अश्विनी ऑटो मोबाईल च्या बाजुला ‘तिरुपती हार्डवेअर अॅण्ड प्लंबिंग’चे भव्य उद्घाटन २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील कृष्णापुरी परिसरात ग्राहकांच्या सोयीसाठी नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या “तिरुपती हार्डवेअर अॅण्ड प्लंबिंग” या दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. या शुभप्रसंगी सकाळी ११ वाजता कलशपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून, सायंकाळी ५:०० वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. दुकानाचे उद्घाटन मा. श्री. संजय हिरामण एरंडे (नगरसेवक, न.पा. पाचोरा) यांच्या शुभहस्ते होणार असून, मा. श्री. अनिल बारकू पाटील (उपसरपंच, पुनगाव ता. पाचोरा) हे प्रमुख उपस्थित म्हणून लाभणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण भारत डेअरी बस स्टॉपजवळ, अश्विनी ऑटोच्या बाजूला, कृष्णापुरी, पाचोरा (जि. जळगाव) येथे निश्चित करण्यात आले आहे. या नव्या दुकानाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दर्जेदार हार...

कष्ट, कर्तृत्व आणि कलेचा संगम : डॉ. कादंबरी महाजन यांची प्रेरणादायी यशोगाथा

Image
्  पाचोरा - येथील प्रतिष्ठित व विद्वान कुटुंबातील कन्या डॉ. कादंबरी संदीप महाजन यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि बहुआयामी गुणांच्या बळावर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक, श्री गो से हायस्कूलचे माजी उपशिक्षक, तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी संचालक, स्वातंत्र्य सैनिक तथा पाचोरा नगरपालिका माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर डी एल महाजन यांचे सुपुत्र संदीप दामोदर महाजन आणि श्री गो से हायस्कूलच्या उपशिक्षिका सौ शितल महाजन यांची कन्या असलेल्या कादंबरीने आपल्या कुटुंबीयांच्या सामाजिक व शैक्षणिक परंपरेला साजेसा मान उंचावला आहे. नुकतीच नवी मुंबई येथे Bachelor of Physiotherapy (BPT) ही पदवी प्राप्त करून तिने आपल्या व्यावसायिक आयुष्याची भक्कम पायाभरणी केली असून तिचा पुढील प्रवास अधिक उज्ज्वल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. डॉ. कादंबरी महाजन या नवोदित फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असून त्यांनी एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी नवी मुंबई येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी 8.04 इतका उत्तम CGPA मिळवत शैक्षणिक क्ष...

स्व.आण्णासाहेब अशोक हरी पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाने विनम्र अभिवादन

Image
          कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान  महाविद्यालय कोळगाव येथे 29 मार्च 2026 रविवार रोजी स्व. आण्णासाहेब अशोक हरी पाटील (संचालक कृ. भ. को. दिल्ली)  यांना प्रतिमापूजनाने विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अण्णासाहेब श्री सुरेश आनंदा कोळी प्रा प्रशांत पाटील, श्रीमती मनिषा बोरसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले आणि  सर्व सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी प्रतिमापूजन करून स्वर्गीय अण्णासाहेब यांना आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व स्व.आण्णासाहेब यांच्या कार्याची माहिती श्री एम टी पाटील सर यांनी करून दिली.

पाचोऱ्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत, जळगाव' कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली समृद्धजन फाऊंडेशन युथ क्लब द्वारा तावरे कन्या कनिष्ठ महाविद्यालय व जागृती विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. ह्यांतर्गत १५ ते २९ वयोगटातील युवक व युवतींसाठी कबड्डी, खो-खो, १०० मी धावणे, गोळाफेक ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी युवा स्वयंसेवक श्री. कमलेश सोनवणे यांनी प्रास्ताविकातून 'पाचोरा तालुक्यातील युवक-युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी' मायभारतद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सांगत आलेल्या सर्व स्पर्धकांचे स्वागत केले. जिल्हा युवा अधिकारी श्री. अभिषेक चवरे यांनी सर्व उपस्थितांना मेरा युवा भारत व्यासपीठाची ओळख करून देत यापुढेही असे उपक्रम राबविण्यात येतील, त्यात हिरीरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शनासाठी उपस्थित पाचोरा नगरपालिकेचे गटनेते श्री. सुमित दादा पाटील, श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जयंतराव पाटील, तावरे कन्या महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा. प्रताप...

वडिलांच्या हस्ते मुलीचा शिवविवाह; गाळण बुद्रुकमध्ये रूढींना छेद देत पाटील परिवाराचा आदर्श सोहळा

Image
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल गाळण बु.:अलीकडच्या काळात विवाह सोहळ्यांमध्ये वाढत चाललेली उधळपट्टी, दिखाऊपणा आणि अनावश्यक खर्च ही चिंतेची बाब ठरत असताना, पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील परिवाराने या प्रवाहाला छेद देत एक आदर्श निर्माण केला आहे. गाळण बुद्रुक येथील शिवसेवक व शिवप्रचारक तसेच पाचोरा एसटी डेपोचे हेड मेकॅनिक राजेंद्र पाटील यांनी आपल्या उच्चशिक्षित कन्या पल्लवी हिचा विवाह माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील उच्चशिक्षित युवक नवनाथ अनपट यांच्याशी अत्यंत साध्या, संस्कारप्रधान आणि शिवविवाह पद्धतीने संपन्न केला. या विवाह सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वडिलांनीच स्वतः आपल्या मुलीचा संपूर्ण विवाहविधी पार पाडला, जे अत्यंत दुर्मिळ व प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. विवाह निश्चितीपासून ते प्रत्यक्ष सोहळ्यापर्यंत सर्व विधी मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत, अनाठायी खर्च टाळून पार पडले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही दिखाऊपणाला पूर्णपणे नकार देत साधेपणाचा मार्ग स्वीकारण्यात आला. विवाह मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज...

पाचोरा तहसिलदार बनसोडे कुटुंबाचा दुहेरी आनंदोत्सव; लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था,पाचोरा येथे अनाथ विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल  पाचोरा, दि. २८ मार्च २०२६ – पाचोरा तालुक्याचे तहसिलदार मा. श्री. विजयजी बनसोडे साहेब यांच्या कन्या कु. तेजू हिचा १३ वा वाढदिवस आज लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा येथे अनाथ विद्यार्थ्यांसोबत अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. “हरी विठ्ठल”च्या जयघोषात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्यांना रुचकर असे भोजन देण्यात आले. या कार्यक्रमासाठी तहसिलदार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये महेंद्र पाटील, आर. डी. पाटील, राहुल पवार (पुरवठा निरीक्षक), महादेव फड भाऊसाहेब, योगेश व्यास, तातेराव सपकाळ, नकुल काळकर, अमोल शिंदे, निखिल बळी, लोकराम हिंगे, ललित पुजारी, विश्वेश आदी कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केले. बनसोडे साहेबांचा संपूर्ण स्टाफ यावेळी एकत्र सहभागी झाल्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. तसेच आदरणीय रमेशजी भाऊ मोर यांच्यासह ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर यांनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्...

"प्रशासकीय व्यस्ततेतूनही मानवतेचा ध्यास — तहसिलदार बनसोडे साहेबांचे कानबाई मातेच्या दर्शनाला उपस्थिती”

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी) दि. २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी, पाचोरा तालुक्याचे मा. तहसिलदार श्री. विजयजी बनसोडे साहेब यांनी आपल्या प्रशासकीय व्यस्त कामातून वेळ काढत एका गरीब कुटुंबाच्या निमंत्रणाला मान देत तारखेडा बु. येथे कानबाई मातेच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. त्यांच्या या साधेपणातून आणि संवेदनशीलतेतून समाजातील सर्व स्तरांशी जपलेला स्नेहभाव अधोरेखित झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल आबा येवले, तसेच पत्रकार श्री. राजेंद्र खैरनार यांनीही उपस्थित राहून कानबाई मातेचे दर्शन घेतले. मा. तहसिलदार साहेब हे आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यापातही धार्मिकतेला आणि मानवी मूल्यांना तेवढेच महत्त्व देतात. सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध जपणे ही त्यांची कार्यशैली विशेष उल्लेखनीय आहे. तसेच कोणत्याही कामाच्या बाबतीत ते कायदेशीर प्रक्रियेला प्राधान्य देत, प्रत्येक काम नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडले जाईल यासाठी कटिबद्ध असतात. एक जबाबदार अधिकारी म्हणून ते सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडूनही शिस्तबद्ध आणि योग्य पद...

पाचोरा बसस्टॅण्डवर धुमाकूळ घालणारी चोरीची टोळी जेरबंद; पाचोरा गुन्हे शाखेची दमदार कारवाई

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल  पाचोरा | प्रतिनिधी पाचोरा बसस्थानक परिसरात नागरिकांना लक्ष्य करत धाडसी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने अखेर जेरबंद करत प्रभावी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींसह एका विधीसंघर्ष बालकाचा या कारवाईत समावेश असून, पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्कतेचा ठसा उमटवला आहे. जळगाव जिल्ह्यात बसस्टॅण्ड परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी कडक सूचना देत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने वेगाने तपास सुरू केला. दिनांक 24 मार्च 2026 रोजी सुभाष विठ्ठल भावसार (वय 70, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरी विक्री करून मिळालेली 50 हजार रुपयांची रक्कम घेऊन बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय ...

“ज्यांनी आयुष्याला दिली दिशा… त्या स्वाती पाटील मॅडम ग्रेडेड मुख्याध्यापक; विद्यार्थिनीच्या भावनांतून उमटला कृतज्ञतेचा जिव्हाळा”

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल शब्दांकन : कु. चेतना रणदीप हिरे पाचोरा (प्रतिनिधी) : शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो, याची प्रचिती स्वाती अमृतराव पाटील मॅडम यांच्या कार्यातून येते. त्यांच्या ग्रेडेड मुख्याध्यापकपदी झालेल्या नियुक्तीने केवळ त्यांचा सन्मान झाला नसून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या भावनांना नवा उन्मेष मिळाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोजे येथे ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या पाटील मॅडम या उपक्रमशील, समर्पित आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणाऱ्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. मर्यादित साधनसंपत्ती आणि विविध अडचणींवर मात करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि मूल्यांची जपणूक केली. त्यांच्या या यशाच्या निमित्ताने त्यांच्या माजी विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी ठरत आहेत. “त्या माझ्या वर्गशिक्षिका नव्हत्या, पण त्यांनी मला आयुष्याचे खरे धडे दिले. आज मी जे काही आहे...

लहान वय, मोठी कला; पाचोऱ्याच्या विधान वाघ-लक्ष्मी वाघ यांची चित्रे ‘शिक्षक ध्येय’मध्ये प्रकाशित

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा : वयाच्या अगदी कोवळ्या टप्प्यातच आपल्या कल्पनाशक्तीच्या रंगांनी कागद सजवणारे विधान कोमल वाघ (वय ४ वर्षे) आणि लक्ष्मी कोमल वाघ (वय ५ वर्षे) हे चिमुकले कलाकार सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोणताही चित्रकलेचा क्लास न लावता, केवळ स्वतःच्या कल्पनेतून त्यांनी साकारलेली चित्रे पाहणाऱ्यांना थक्क करणारी आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये निरागसता, रंगांची सुरेख उधळण आणि वेगळी कल्पकता दिसून येते. या चिमुकल्या कलेची दखल ‘शिक्षक ध्येय’ या साप्ताहिकाने घेत त्यांच्या चित्रांचे प्रकाशन केले आहे. इतक्या लहान वयात मिळालेली ही संधी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठी पायरी ठरत आहे. विधान वाघ आणि लक्ष्मी लक्ष्मी  हे सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथील विद्यार्थी असून शाळेतही त्यांच्या कलेचे विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, त्यांची आई प्रा. सौ. जयश्रीताई वाघ या स्वतः फाईन आर्ट्समध्ये टॉपर असून, वडील श्री. कोमल वाघ यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. कलेची ही परंपरा आणि घरातून मिळणारे प्रोत्साहन यामुळेच या चि...

वनस्पती निसर्ग व मानव यांच्यात समन्वय साधते -प्रा. जे बी पाटील यांचे प्रतिपादन.

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल कोळगाव - वनस्पती या मानवास उपयुक्त असून ऑक्सिजन सावली, अन्न ,वस्त्र व  निवारा  या मूलभूत गरजा सदैव पूरवत असतात  तसेच ऑक्सिजन,सावली व इतर अनेक गरजा भागवत मानवी जीवन सुखकर करण्याचा सदैव प्रयत्न करतात.परंतु हल्ली मानव मोठ मोठया वृक्षाची तोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत आहेत .वृक्ष सदैव मानवास उपयुक्त असून दरवर्षी वृक्षरोपण करतो परंतु योग्य ती काळजी घेऊन संगोपन करत नाही म्हणून उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतात.जागतिक तापमान वाढीचा परिणाम भोगतोय तसेच कमी पर्ज्यन्यमान व पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे म्हणून मानवाने जास्तीत जास्त वृक्षारोपण  करावे व संवर्धन केले पाहिजे तर पुढच्या पिढीसाठी फायदेशीर ठरेल"असे मार्गदर्शन पर विचार वनस्पतीशास्त्राचे   प्रा जे. बी. पाटील, राणी लक्ष्मीबाई  महाविद्यालय पारोळा यांनी मांडले ते येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव येथे वनस्पती शास्त्र विभागातर्फे "पर्यावरणाचा निसर्गा वरील परिणाम" या विषयी बोलत...

पाचोऱ्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरपी शिबिर; ४५ विद्यार्थ्यांना थेरपी, पालकांना मार्गदर्शन समावेशक शिक्षण उपक्रमाला बळ – विशेष शिक्षकांच्या नियोजनातून यशस्वी आयोजन

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेले फिजिओथेरपी शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले. दिनांक २३ मार्च २०२६ रोजी गट साधन केंद्र, शिक्षण विभाग, पंचायत समिती पाचोरा यांच्या समावेशक शिक्षण उपक्रमांतर्गत हे शिबिर पार पडले. सदर शिबिराचे आयोजन डॉ. चेतन पाटील यांच्या हेल्थ पॉईंट फिजिओथेरपी धन्वंतरी क्लिनिक अँड रिहॅब सेंटर, पाचोरा येथे करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. चेतन पाटील, डॉ. राहुल पाटील व त्यांची टीम, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे ४५ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी सेवा देण्यात आली, तसेच पालकांना थेरपी पद्धती, वर्तन समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे सुयोग्य नियोजन केंद्रस्तरीय विशेष शिक्षक टीमने केले. उद्घाटनप्रसंग...

अफवांना थारा नाही! जळगावात इंधन मुबलक — प्रशासनाचे स्पष्ट आवाहन पेट्रोल टंचाईची चर्चा फोल; नागरिकांनी घाबरू नये, साठेबाजी टाळा सोशल मीडियावरील अफवांपासून सावध रहा; प्रशासनाची नागरिकांना सूचना

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गोंधळ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने स्पष्टिकरण देत सांगितले आहे की, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू आहे आणि संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. तरीही अफवांमुळे काही पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच भीतीपोटी इंधनाचा साठा करू नये. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल किंवा डिझेल खरेदी टाळावी, अन्यथा परिस्थिती विनाकारण ताणली जाऊ शकते. याशिवाय, पेट्रोल पंपांवर गर्दी टाळून वाहतूक कोंडी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही प्रशासना...

कोळगाव महाविद्यालयात 'शहीद दिन' उत्साहात साजरा

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल कोळगाव (ता. भडगाव): कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय आणि गो. पू. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथे २३ मार्च 'शहीद दिन' अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. नानासाहेब प्रतापराव पाटील आणि सचिव श्रीमती पूनमताई पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.  प्राचार्य सुरेश कोळी यांनी आपल्या मार्गदर्शनात शहीद दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचा वारसा जपण्याचे आवाहन केले.आदर्श शेतकरी रावसाहेब प्रवीण पाटील यांनीही या प्रसंगी शहिदांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचा लन प्रा. प्रशांत पाटील यांनी प्रभावी पणे केले, तर उपस्थि तांचे आभार प्रा. मनोज पवार यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी म...

प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार जाहीर

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल पाचोरा : श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका सौ. जयश्रीताई ओमप्रकाश वर्मा वाघ यांना ‘महाराष्ट्र रत्न’ हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या बहुआयामी, प्रेरणादायी व समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ या कला, क्रीडा, रेकीआचार्य, अध्यात्म, शैक्षणिक, सामाजिक, समाजप्रबोधन, प्रभावी व्याख्यान तसेच आकाशवाणीवर त्यांच्या झालेल्या मुलाखतीचे प्रसारण झाले असून, त्या माध्यमातून मानसिक आरोग्य व सकारात्मक ऊर्जा याविषयी त जनजागृती , अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञान, संस्कार, सेवा व सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे व जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन समाजमनावर सकारात्मक ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे, त्या अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात दीप...

ईदच्या गोडीत पाचोऱ्यात उमटला बंधुभावाचा झंकार; शिरखुर्म्याने घट्ट झाले स्नेहबंध

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज पाचोरा (प्रतिनिधी) : ईदच्या पावन निमित्ताने पाचोरा येथे एका आपुलकीच्या भेटीतून स्नेह आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देण्यात आला. कादर पठान आणि आलम पठान यांनी आपल्या घरी मित्रपरिवाराला आमंत्रित करून पारंपरिक शिरखुर्म्याचा आस्वाद देत आदरातिथ्याची उबदार झलक दाखवली. या खास भेटीत पत्रकार नंदकुमार शेलकर, पत्रकार प्रविण बोरसे, न्यू सेंट्रल पॉइंट मोबाईल शॉपचे मालक श्याम पवार तसेच त्यांचे सहकारी उज्वल जैन सहभागी झाले होते. उपस्थितांचे मनापासून स्वागत करत पठान बंधूंनी सणाच्या आनंदात सर्वांना सामावून घेतले. शिरखुर्म्याच्या गोडीतून रंगलेल्या या छोटेखानी मैफिलीत सणाचा खरा अर्थ—आपुलकी, सन्मान आणि जिव्हाळा—याचा अनुभव सर्वांनी घेतला. अशा साध्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या भेटींतूनच समाजात स्नेहाचे बंध अधिक घट्ट होतात, अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

शिक्षण क्षेत्रात नवा मापदंड! पाचोर्यात ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा ज्ञानोत्सव २०२६; अत्याधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणाची हमी

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, या ध्येयाने कार्यरत असलेल्या किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित नर्मदा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई. प्रस्तावित), पाचोरा यांच्या वतीने ‘ज्ञानोत्सव – नॉलेज फेस्टिव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ प्रवेश प्रक्रियेपुरता मर्यादित नसून, शिक्षणातील नवे तंत्रज्ञान, मूल्याधारित शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया घालणारा ठरणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलक्षणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. भाईजी राधेश्यामजी चांडक उपस्थित राहणार आहेत. तसेच पाचोरा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गणेश शिंदे मार्गदर्शन करणार असून, कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार श्री. किशोर आप्पा पाटील आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. संजय पाटील (मुंबई), श्री. सुमित किशोर पाटील (गटनेता तथा नगरसेवक, पाचोरा) तसेच डॉ. प्रियंका पियु...

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची कनिष्का महाजनची आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये "सुवर्ण कामगिर"; तीन गोल्ड मेडल्सची कमाई!

Image
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा : नुकत्याच पार पडलेल्या SOF (Science Olympiad Foundation) द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कनिष्का राहुल महाजन हिने दैदिप्यमान यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता दुसरी (इंग्रजी माध्यम) मध्ये शिक्षण घेत असलेल्या कनिष्काने आपल्या बुद्धिमत्तेची आणि अभ्यासू वृत्तीची झलक दाखवत तब्बल तीन सुवर्णपदके (Gold Medals) पटकावली आहेत. विषयानुसार तिची कामगिरी लक्षणीय ठरली आहे— सामान्य ज्ञान (General Knowledge) : ९८.४६% गुण (Distinction) – शाळेत प्रथम, सुवर्णपदक गणित (Mathematics) : ८९.७५% गुण – शाळेत प्रथम, सुवर्णपदक विज्ञान (Science) : ८२.६९% गुण – शाळेत प्रथम, सुवर्णपदक कनिष्काच्या या अष्टपैलू यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबाबत शाळेचे प्राध्यापक प्रेम कुमार शामनानी यांनी तिचे विशेष कौतुक करत सांगितले की, “कनिष्काचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या कामगिरीमुळे शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.” क...

ज्ञान, संस्कार आणि आधुनिकतेचा संगम : पाचोऱ्यात ‘ज्ञानोत्सव 2026’चे आयोजन

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल पाचोरा-भडगाव परिसरात शिक्षण क्षेत्रात नवे पर्व उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नर्मदा इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा तर्फे “ज्ञानोत्सव 2026 (Knowledge Festival)” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अंतुर्ली फाटा जवळ, भडगाव रोड येथे हा प्रेरणादायी समारंभ पार पडणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सर्वांगीण विकासाची जाणीव निर्माण होणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला ‘ज्ञानोत्सव’ हा उपक्रम शिक्षणाला नवे दिशा देणारा ठरणार आहे. ज्ञानसाधना, भारतीय संस्कृती व आधुनिक शिक्षणपद्धती यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक स्तुत्य प्रयत्न मानला जात आहे. या कार्यक्रमास पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आ...

अवैध खननावर प्रशासनाची कडक कारवाई; ट्रॅक्टर-डंपर लिलावात

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा प्रतिनिधी: पाचोरा तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणांवर प्रशासनाने अखेर कडक भूमिका घेतली असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करत जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अवैध खनन करणाऱ्या घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तहसिल कार्यालय पाचोरा यांच्या वतीने दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता जप्त ट्रॅक्टर, ट्रॉली आणि डंपर वाहनांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. संबंधित वाहन मालकांना यापूर्वीच दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी दंडाची रक्कम शासनाकडे जमा करण्यास टाळाटाळ केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 176 ते 184 अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत जप्त वाहनांना “जमीन महसूल थकबाकी” म्हणून घोषित करून त्यांचा लिलाव करण्यात येणार असून, लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या मार्फत वाहनांचे मूल्यांकन करून त्यांची “हातची किंमत” निश्चित...

मतदार यादी पुनरिक्षण : नाव टिकवायचं असेल तर सजग राहा! -प्रांताधिकारी भुषण अहीरे

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल लोकशाही व्यवस्थेचा कणा म्हणजे निवडणूक प्रक्रिया, आणि त्या प्रक्रियेचा पाया म्हणजे अचूक व अद्ययावत मतदार यादी. त्यामुळेच पाचोरा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणारा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम हा केवळ शासकीय उपक्रम नसून प्रत्येक नागरिकाच्या सहभागाची कसोटी ठरत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू होणाऱ्या या उपक्रमासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घराघरात जाऊन माहिती संकलन करत आहेत. विशेष म्हणजे २००२ व २०२४ या दोन मतदार याद्यांतील नावे पडताळून पाहण्याचे काम अत्यंत बारकाईने सुरू आहे. यामागील उद्दिष्ट स्पष्ट आहे — मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणे. या प्रक्रियेत प्रशासनाइतकीच जबाबदारी मतदारांचीही आहे. ज्या नागरिकांचे नाव २००२ च्या यादीत नाही, त्यांनी आपल्या कुटुंबातील जुने दस्तऐवज शोधून देणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील टप्प्यात फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून आपल्या मतदानाच्या हक्काशी थेट संबंधित आ...

पाचोरा येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न

Image
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक पंचायत महाराष्ट्र दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम पाचोरा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विनोद कुमावत होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुकाध्यक्ष शांताराम चौधरी यांनी आपल्या भाषणात ग्राहक चळवळीचे जनक ग्राहक तीर्थ श्री. बिंदू माधव जोशी यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक चळवळीने घेतलेली गती, तिची ध्येय-धोरणे यावर प्रकाश टाकला. पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी ग्राहकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी सजग व जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. फसवणूक...

अवघ्या ४ तासांत मोटारसायकल चोरीचा उलगडा; आरोपीस ताब्यात घेत चोरीची दुचाकी जप्त – १२ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा शहरात घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेचा पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चार तासांत छडा लावत आरोपीला ताब्यात घेत चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली. विशेष म्हणजे या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही अवघ्या १२ तासांच्या आत मा. पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. फिर्यादी प्रशांत शंकर वाघ (वय ४२, व्यवसाय शेती, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.३७ वाजता जामनेर रोडवरील राधास्वामी पेट्रोलपंप येथे त्यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो, लाल रंगाची मोटारसायकल (क्र. MH-19 BR-4211) पार्क करून ठेवली होती. मात्र काही वेळातच अज्ञात इसमाने सदर मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपी तुषार लक्ष्मण आघाडे (वय २७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये दिनांक १४ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पाचोरा ...

नंदुरबारच्या मातीतून उमलतोय चिमुकला क्रीडातारा : चि. ध्येय वीरल मेहताची क्रीडाक्षेत्राकडे वाटचाल

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल नंदुरबार शहरातील पीजी प्ले स्कूल नंदुरबार येथील विद्यार्थी चि.धैर्य वीरल मेहता हा आपल्या लहान वयातच क्रीडाप्रेम आणि उत्साही स्वभावामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या सातव्या वर्षीच खेळांविषयी असलेली त्याची ओढ आणि मैदानावर दिसणारी चपळता पाहून शिक्षक, पालक आणि मित्रमंडळी त्याचे कौतुक करत आहेत. फुटबॉल, क्रिकेट, रनिंग आणि सायकलिंग अशा विविध खेळांमध्ये ध्येयला विशेष रस आहे. शाळेत किंवा मोकळ्या वेळेत तो नेहमी मैदानावर खेळताना दिसतो. प्रत्येक खेळात सहभागी होत आपली क्षमता सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. खेळताना दिसणारी त्याची जिद्द, वेग आणि उत्साह यामुळे तो इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. शाळेत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये ध्येय नियमितपणे सहभागी होतो. या स्पर्धांमध्ये तो उत्तम कामगिरी करत अनेकदा क्रमांक मिळवत असल्याने शिक्षक आणि पालकांकडून त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. लहान वयातच खेळांविषयी असलेली त्याची चिकाटी आणि सरावाची तयारी भविष्यातील यशाची चिन्हे मानली जात आहेत. ...

चेट्रीचंद्र व गुढीपाडवा निमित्त पाचोर्‍यात रक्तदानाचा सामाजिक उपक्रम; २० मार्च रोजी झुलेलाल मंदिरात भव्य रक्तदान शिबिर

Image
राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा प्रतिनिधी : सिंधी समाजाचे ईष्टदेव भगवान झुलेलाल यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा चेट्रीचंद्र तसेच हिंदू नववर्ष गुढीपाडवा या दुहेरी पर्वाचे औचित्य साधत पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत असून अनेक गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः थॅलेसेमिया सारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासत असल्यामुळे अशा रक्तदान शिबिरांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजोपयोगी कार्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हे रक्तदान शिबिर दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाचोरा येथील झुलेलाल मंदिर, सिंधी कॉलनी येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी रेड क्रॉस ब्लड बँक, जळगाव यांचे सहकार्य लाभणार असून रक्त संकलनाची संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या वैद्यकीय पथकाद्वारे...