Posts

Showing posts from March, 2025

आज दिनांक १ एप्रिल२०२५ मंगळवारी सकाळी अनिल महाजन माता-पिता,व परिवासह चारी धाम यात्रा आनंदाने पुर्ण करुन परतले घरी...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल कट्टा ( आज दिनांक १/४/२०२५ मंगळवार सकाळी) पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेले सध्या मुंबई येथे व्यवसाय निमित्ताने वास्तव्यास असलेले अनिल महाजन यांनी त्यांच्या कुटुंबासह आणि आई-वडिलांसोबत जगन्नाथ पुरी, गंगासागर ही शेवटची चार धाम तीर्थयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मागील चार वर्षापासून सुरू असलेला हा चार धाम तीर्थ यात्रेचा प्रवास १ एप्रिल ला पूर्ण झाला आहे. अनिल महाजन हे वरिष्ठ पत्रकार (मंत्रालय, मुंबई) तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष असून यांनी या यात्रेत सर्व सुख-सुविधांचा अनुभव घेतला आहे ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासनाने त्यांना मोलाचे सहकार्य केले आणि दोन्ही ठिकाणी व्हीआयपी प्रोटोकॉल अंतर्गत उत्तम दर्शनाचा लाभ मिळाला. चारधाम पैकी शेवटच्या असलेल्या एक दाम म्हणजेच पुरी आणि गंगासागर या यात्रेत प्रशासनाच्या वतीने शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच गंगासागरला जाण्यासाठी पश्चिम बंगाल प्रशासनाने विशेष बोट आणि प्रोटोकॉलची व्यवस्था करण्यात आली होती. अनिल महाजन या...

पाचोरा तालुका "कृषी विभागाचा अभिनव उपक्रम" राबवण्यात येत आहे

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) "कृषी विभागाचा अभिनव उपक्रम"     गेल्या पंधरा दिवसापासून कृषी विभाग पाचोरा यांचेमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उपक्रमांतर्गत गावोगाव बैठका,  शेतकरी मिळावे, शेतकरी प्रशिक्षण,घोंगडी बैठका, शेतकरी प्रशिक्षण,  चर्चासत्र  इत्यादींच्या माध्यमातून विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी तसेच अद्यावत कृषि तंत्रज्ञानाची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर सदरील उपक्रमांची परिणामकारकता वाढवण्यासाठी कृषी विभाग पाचोरा यांनी तालुका कृषि अधिकारी, रमेश जाधव  यांच्या मार्गदर्शनातून  सर्व  मंडळातील कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक  व कृषि सहाय्यक  यांनी गेल्या आठ दहा दिवसांत ," कृषि कीर्तन सप्ताहाच्या" माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनांसह तंत्रज्ञान यांचा प्रचार प्रसार करत सध्या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत फार्मर 'आय डी' तयार करणे व पिएम-किसान  अंतर्गत  ईकेवायसी  नोंदणी करण्याचे कामाकाज युद्धपातळीवर सुरू केलेत.  वेग...

अनिल महाजन यांचा सहकुटुंब आई वडिलासह श्री जगन्नाथ पुरी आणि गंगासागर तीर्थ यात्रा दौरा संपन्न

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) अनिल महाजन यांनी त्यांच्या कुटुंबासह आणि आई-वडिलांसोबत श्री जगन्नाथ पुरी आणि गंगासागर येथील तीर्थयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! ही तीर्थयात्रा २५ ते ३० फेब्रुवारी या कालावधीत पार पडली.  अनिल महाजन, जे वरिष्ठ पत्रकार (मंत्रालय, मुंबई) तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, यांनी या यात्रेत सर्व सुख-सुविधांचा अनुभव घेतला. ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासनाने त्यांना मोलाचे सहकार्य केले आणि दोन्ही ठिकाणी व्हीआयपी प्रोटोकॉल अंतर्गत उत्तम दर्शनाचा लाभ मिळाला. पुरी आणि गंगासागर येथे शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून देण्यात आले, तसेच गंगासागरला जाण्यासाठी पश्चिम बंगाल प्रशासनाने विशेष बोट आणि प्रोटोकॉलची व्यवस्था केली. श्री अनिल महाजन यांच्या राष्ट्रीय स्तरावरील मित्रपरिवार आणि शासकीय-राजकीय संपर्कांचा या यात्रेत मोठा उपयोग झाला. त्यांनी आपल्या सर्व मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले, ज्यांनी या तीर्थयात्रेसाठी सहकार्य केले.  ओडिशा प्रशासन आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सर...

शिवसेना जिल्हाप्रमुख, रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या आदेशाने पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील कार्यकारिणी कार्यकाळ पूर्ण,मागील तीन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी....

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, तथा विद्यमान उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना सचिव श्री.संजयजी मोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार  मा.श्री रावसाहेब मनोहर गिरधर पाटील (शिवसेना जिल्हाप्रमुख,जळगाव) यांच्या आदेशाने (पाचोरा, भडगाव व चाळीसगाव) या तीनही तालुक्यातील  शिवसेनेची शहर व ग्रामीण कार्यकारणीचा सन 2022 ते 2025 या तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याकारणाने पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यकरणी मध्ये बदल करणे क्रमपात्र आहे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अभुतपूर्व यशामध्ये मागील कार्यकारणीचे  योगदान अतुलनीय आहे. त्याबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार.                   तसेच जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची पुढील कार्यकारणी सन 2025 ते 2028 या कार्यकाळा करिता येणाऱ्या १५ दिवसाच्या आत नव्याने घोषित करण्यात येईल, याची सर्व पाचोरा,भडगाव,चाळीसगाव या तीनही तालुक्यातील शिवस...

एम एम महाविद्यालयात 'डिजील बँकिंग व गुन्हे जनजागृती ' विषयक कार्यक्रम सम्पन्न

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  दिनांक २१ मार्च : पाचोरा तलुका सहकारी शिक्षण संस्था संचालित, श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा आयोजित , वाणिज्य व व्यवस्थापन विभाग अंतरगत , 'डिजिटल बॅंकिंग व गुन्हे जनजागृती ' विषयक कर्यक्रमाचे  आयोजन संस्थचे चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.या वेळी विचारमंचावर  संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो. व्ही. टी जोशी , महाविद्यालचे प्राचार्य डॉ. शिरिष बी पाटील , उपप्रचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील , IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील व कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. सौ. जयश्री ताई वाघ (वर्मा) उपस्थित होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून श्री. परशुराम बाबासाहेब दळवी साहेब - पोलिस उपनिरीक्षक पाचोरा, श्रीमती सोनाली पवार (जाधव ) - शाखा व्यवस्थापक ,पाचोरा व श्री अनिकेत मधुकर टोंगळे साहेब लभाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नानासो व्ही. टी. जोशी यांनी भूषविले.  कार्यक्रामाचे प्राप्ताविक समन्नयिका प्रा. सौ. जयश्री ताई वाघ (वर्मा) यांनी केल...

नगरदेवळा येथे सार्वजनिक चौकात आणि स्मारक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावे यासाठी नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.

Image
सार्वजनिक चौकात आणि  स्मारक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे यासाठी नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार श्री मोरे महाराज, श्री दिनेश पाटील , तसेच सरपंच सौ प्रतिक्षाताई काटकर ,श्री  किरण काटकर सर  यांना निवेदन देण्यात आले नगरदेवळा सह परिसरात वाढत्या चोरी, अवैधता व इतर अनेक विघ्नसंतोषी कारवायांना आळा बसवण्यासाठी व याती संबंधितांवर वचक बसवण्यासाठी ग्राप. वा पोलीस भकित तातडीने गावातील विविध चौक व सर्वच स्मारकानाजवळ सी सी टी व्ही कॅमेरा बसावावे अशी नम्र विनंती  सद्यास्थितीत गाव परिसरातून कापूस, पाळीव प्राणी, शेतीजन्य माल साहित्य, मोटारसायकली, लहान मोठे दुचाकी वाहने व घरफोडीच्या भुरट्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ होत असून दररोज एक ना अनेक ठिकाणी चोऱ्या होत असल्याने सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आमच्या पोलीस बांधवा वरील ताणही कमी होईल . यासाठी अभिलाषा भिला रोकडे युवती अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निवेदन दिले त्यांच्या समवेत मुकेश राजपूत  युवासेना जिल्हा उपाध्यक्ष , गणे...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट सर्वेसर्वा तथा विद्यमान राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा शुभेच्छा संदेश महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहेबांनी पाठवल्या शुभेच्छा

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट सर्वेसर्वा तथा विद्यमान राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा शुभेच्छा संदेश महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहेबांनी पाठवल्या शुभेच्छा 💐   संविधानिक पदावर असलेल्या सर्व आमदार,खासदार राज्यातील प्रमुख संसदीय मंडळात काम केलेले मान्यवर नेत्यांचे अभिनंदन व शुभेच्छापत्र अनिल महाजन यांना प्राप्त होत आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र माळी समाज महासंघ ही माळी समाजासाठी काम करणारी  अधिकृत संघटना आहे. शरदचंद्र पवार यांनी याची प्रत्यक्ष दखल घेऊन श्री.अनिल महाजन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. धन्यवाद शरदचंद्र पवार साहेब. अनिल महाजन.  प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ.

शिवसेना युवा सेनेच्या मोफत सीईटी सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा, भडगाव : शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शास्त्र आणि विधी या शाखांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षा (Mock Test) घेण्यात आली. युवासेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल पूर्व (प्राथमिक विभाग) येथे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला 280 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षेच्या प्रारंभी शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षेनंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी उद्धव मराठे, योजना ताई पाटील, शशिकांत पाटील, सिकंदर तडवी, गजू पाटील,संतोष पाटील, डी डी पाटील, उमेश हटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ...

रमजानच्या पवित्र महिन्यात डॉक्टर आलम देशमुख व सामाजिक कार्यकर्ते हरून देशमुख यांना एका शेतकऱ्याचे हरवलेले पन्नास हजार रुपये दिले परत...! जीवंत उदाहरण कलियुगात ईमानदारी अजुनही शाबुत

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) रमजानच्या पवित्र महिन्यात डॉक्टर आलम देशमुख व सामाजिक कार्यकर्ते हरून देशमुख यांना एका शेतकऱ्याचे हरवलेले पन्नास हजार रुपये दिले परत...! जीवंत उदाहरण कलियुगात ईमानदारी अजुनही शाबुत पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी  येथील शेतकरी नवनाथ बहादुर सिंग ,पाचोरा येथील आयडीबीआय  बॅंकेत  काही कामानिमित्त पाचोराला आलेले असताना त्यांच्याजवळ असलेले पन्नास हजार रुपये ची बॅग हरवली होती योगायोगाने मागून डॉक्टर आलम देशमुख व हारून देशमुख यांना ती बॅग सापडले असता त्यांनी त्यामध्ये असलेले पन्नास हजार रुपये व कागदपत्र तसेच पिंपरी येथील शेतकऱ्याचा नावाचा कागद आढळला असता त्यांनी त्वरित जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री उद्धव भाऊ मराठे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी लगेच त्या शेतकऱ्यांना कळविले त्यामुळे दुःखा असलेले शेतकरी यांनी आपले पैसे परत मिळत असल्याचे कळताच त्यांना आनंद झाला आपल्या कष्टाचे इमानदारीचे पैसे वापस मिळत आहे तसेच रमजान महिन्याचा पवित्र सण असून या पवित्र महिनादिनी डॉक्टर आलम देशमुख व हारून देशमुख,दानिश देशमु...

एका आदिवासी कोळी समाजाच्या मुलीने शिर्डी येथे पार पडलेल्या भारत श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ज्युनियर "भारतश्री" हा मानाचा किताब मिळवुन नाव उंचावले...तीच्या हलाखीच्या परिस्थितीचा खडतर प्रवास...

Image
नमस्कार मी कविता लक्ष्मण शेवरे. मी आज ज्या क्षेत्रात आहे त्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. वडील सोबत राहत नसल्या कारणामुळे सर्वस्व  जबाबदारी ही आईवर होती. धुणी-भांडी ची कामे करून तिने आम्हाला शाळा शिकवली आमच्या गरजा पूर्ण केल्या. घरची परिस्थिती खूप हलाकीची असल्या कारणामुळे अवध्या वयाच्या अवघ्या चौदाव्या-पंधराव्या वर्षाची असताना मी आईसोबत धुणी-भांडी घासण्याची कामे करायला जाऊ लागले. मला लहानपणापासून खेळांची खुप आवड होती. शाळेमध्ये असताना मी अनेक खेळांमध्ये सहभाग घेतला.2023 पासून मी बॉडी बिल्डिंग करते. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये "नाशिक श्री" हा मानाचा किताब देखील मी पटकावलेला आहे. 2024 मध्ये ज्युनिअर महाराष्ट्र श्री. मिस्टर अँड मिस युनिव्हर्स या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत मी द्वितीय क्रमांक मिळवला. आग्रा येथील पॅराट्रूपस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्यारा जम्पिंग ऍक्टिव्हिटी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. दिल्ली येथे राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचालनासाठी माझी निवड झाली आणि  कर्तव्यपथ दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासमोर संचलन केले. इंडियन ब...

तात्यासाहेब कै.आर. ओ. पाटील (माजी आमदार) यांना संगीतमय श्रद्धांजली

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा: निर्मल सिड्स प्रा. लि. चे संस्थापक, माजी आमदार आणि कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित "संगीतमय पुष्पांजली" हा कार्यक्रम मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न झाला. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगभूत संघटनांच्या वतीने निर्मल सिड्स प्रा. लि., पाचोरा येथे हा कार्यक्रम पार पडला. तात्यासाहेबांनी केवळ राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले. 1988 मध्ये त्यांनी निर्मल सिड्सची स्थापना करून भारतीय शेतकऱ्यांसाठी उच्च उत्पादनक्षम आणि ताणसहिष्णु वाण विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे निर्मल सिड्स आज भारतभर २३ राज्यांमध्ये आपला ठसा उमटवणारी एक अग्रगण्य कृषी संस्था बनली आहे. तात्यासाहेबांचे योगदान आणि स्मरण कार्यक्रमात मान्यवरांनी तात्यासाहेबांच्या समाजकार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. "तात्यासाहेबांनी केवळ आमदार म्हणून नव्हे, तर एक समाजसेवक म्हणून शेती आणि ग्रामीण विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांचे कार्य पुढे नेणे ह...

पैसा,प्रॉपर्टी बघून लग्न करणाऱ्या व क्षणिक सुखासाठी संसार उध्वस्त करणाऱ्या महिला व पुरुषांसाठी समाजात आदर्श घडवणारी प्रेरणादायी बातमी…पाचोऱ्यातील सरला आणि मधुकरची लग्नानंतरची प्रेम कहाणी...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पैसा,प्रॉपर्टी बघून लग्न करणाऱ्या व क्षणिक सुखासाठी संसार उध्वस्त करणाऱ्या महिला व पुरुषांसाठी समाजात आदर्श घडवणारी प्रेरणादायी बातमी…पाचोऱ्यातील सरला आणि मधुकरची लग्नानंतरची प्रेम कहाणी शोध पत्रकारिता….आजारी पतीला पत्नीचा आधार! पेट्रोल पंपावर काम करून ओढतात परिवाराचा गाडा जळगाव: आपण नवरा बायकोची भांडण त्याचबरोबर नवरा बायको मध्ये अनेक वर्षे सोबत राहून वेगळे होणं,प्रॉपर्टीचे वाद असे अनेक प्रकरण बघितले असतील आणि त्या प्रकरणातून समाजामध्ये परिस्थिती किती बदलली आहे. याचे उदाहरण आपल्याला बघायला मिळते. परंतु मी आज आपल्याला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपुरा येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबाबद्दल समाजामध्ये आदर्श निर्माण करणारी बातमी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडत आहे. मित्रांनो फोटोमध्ये दिसणाऱ्या या महिला शहरातील बाहेरपुरा परिसरातील राहणाऱ्या सरलाबाई मधुकर चौधरी आहे.  या मागील अनेक वर्षांपासून आपल्या पतीसोबत संसार करीत असून त्यांना एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. संसार सुरळीत सुरू असतांना ...

चाळीसगाव पोलिस स्टेशन ला त्या वादग्रस्त वक्तव्य केलेल्या काॅमेडीयन वर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता दिले गेले निवेदन.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) शिवसेनेचे मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी चाळीसगाव शहर पोलीस यांची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना निवेदन देण्यात आले   माननीय मा.ना एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले, महाराष्ट्रात कॉमन मॅन म्हणून आपली एक वेगळी व निर्माण केली अशा लोकनेत्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने आमच्यासारख्या तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखविल्या गेल्यात भविष्यात अशी फालतुगिरी आम्ही खपवून घेणार नाही व झाल्यास यांचे तीव्र पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही तरी याबाबत दखल घेऊन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरान वर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना तर्फे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.* *यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील, युवासेना शहरप्रमुख सोमा चौधरी, शहरप्रमुख शुभम राठोड, शेखर गवळी, प्रतिभाताई पवार, मनीषा ताई महा...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचोरा तालुक्याची गरुड झेप

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचोरा तालुक्याची गरुड झेप प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची योजना असून त्यातून दरमहा दोन हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी स्वरूपात मिळतात. त्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी ई-केवायसी करणे बंधनकारक असते. पाचोरा तालुक्यात एकूण १२९ गावे असून एकूण योजनेची लाभार्थी ३३२४२ एवढे आहेत. त्यापैकी प्रलंबित असलेल्या लाभार्थीना हप्ते नियमित मिळण्यासाठी ई-केवायसी नियमित करून घेण यासाठी कृषी विभागामार्फत वर्षभर प्रयत्न सुरू होते. तथापि १०० टक्के खातेदारांनी ई-केवायसी करुण घेणे अडचणीचे काम होते, अशा परिस्थितीत पाचोरा कृषी विभागाने "कृषी कीर्तन सप्ताहाची" विशेष मोहीम हाती घेऊन तालुक्यातील संपूर्ण गावागावात छोट्या-मोठ्या गाव बैठका, शिवार फेरी, शेतकरी प्रशिक्षण इत्यादी घेऊन तालुका कृषी अधिकारी पाचोरा श्री आर.एन.जाधव यांच्या    मार्गदर्शनाखाली कृषी सहायकांनी जनजागृती...

पाचो-याची आण-बाण शान व गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल चे मुख्य संपादक अनिल महाजन यांची आज आई-वडीलांसह "श्री जगन्नाथ पूरी दर्शन यात्रा संपन्न"--- चारधाम यात्रा पूर्ण करून सार्थक केले जीवन.!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी) पाचो-यापाचो-याची आण-बाण शान व गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल चे मुख्य संपादक अनिल महाजन यांची आज आई-वडीलांसह "श्री जगन्नाथ पूरी दर्शन यात्रा संपन्न"--- चारधाम यात्रा पूर्ण करून सार्थक केले जीवन.! २६ मार्च २०२५: आज अनिल महाजन यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. गेल्या चार वर्षांत त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी सहकुटुंब चारधाम यात्रेचे स्वप्न साकार केले. बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका आणि आज श्री.जगन्नाथ पुरी येथील दर्शनाने त्यांनी चौथा धाम पूर्ण केला. आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवस्थेतून वेळ काढून आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद अनिल ,त्यांच्या पत्नी स्वाती, मुलगा सिद्धेश यांनी व्यक्त केला. अनिल महाजन यांनी सांगितले, "माझ्या आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवून आणणे हे माझे स्वप्न होते. गेल्या चार वर्षांत मी हे ध्येय पूर्ण केले. आज श्री.जगन्नाथ पुरी येथे दर्शन घेऊन चौथा धाम पूर्ण झाला आणि मला माझ्या जीवनाचे खरे सार्थक झाल्यासारखे वाटते. आई-वडिलांची सेवा करण्याची...

पाचोरा येथे शिवसेना, युवासेना शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वादग्रस्त कुणाल कामरानच्या पुतळ्याचे दहन व पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेबांना देण्यात आले निवेदन.!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी)कुणाल कामरानच्या त्या गाण्याचा पाचोरा शिवसेना शहर प्रमुख श्री सुमित सावंत व युवा सेना शहरप्रमुख संदीप राजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुणाल कामरानच्या पुतळा जाळून जाहीर निषेध केला पाचोरा येथील शिवसेनेचे शहर प्रमुख श्री सुमित सावंत व युवा सेनेचे शहर प्रमुख श्री संदीप राजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी श्रीराजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कुणाल कामरान याने वादग्रस्त गायलेले गाणे त्या गाण्याचा निषेध म्हणून पाचोरा शिवसेना युवा सेना यांच्यातर्फे असंख्य कार्यकर्त्यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्पे त्या कुणाल कामरानचा पुतळा जाळून त्याचे निषेध केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली

पाचोरा शिवसेना शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची महत्त्वपुर्ण बैठक... बैठकीला उपस्थितीचे आव्हान

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा शिवसेना शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची महत्त्वपुर्ण बैठक... बैठकीला उपस्थितीचे आव्हान करण्यात आले आहे.        मा कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील* यांच्या प्रमुख उपस्थितीत *पाचोरा तालुका शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व अंगिकृत संघटनेची संघटनात्मक महत्वपूर्ण* बैठकीचे *उद्या दिनांक 27 मार्च 2025 गुरुवार दुपारी 1.00 वाजता शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा* येथे आयोजन केलेले आहे तरी जिल्हासमन्वयक,संघटक, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुकासमन्वयक,   संघटक,उपशहर प्रमुख,उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख,गणप्रमुख, उपगण प्रमुख,तसेच मा.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक न. पा. पाचोरा, सभापती उपसभापती व संचालक मंडळ कृ उ बा समीती पाचोरा, व्हॉ. चेअरमन, शेतकी संघ पाचोरा, सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,चेअरमन व्हॉ चेअरमन व संचालक मंडळ,शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,बूथ प्रमुख व शिवसेना अंगीकृत संघटना यांनी या बैठकीला आवर्जुन उपस्थित रहावे उपस्थितीचे आवाहन *जिल्हाप्रमुख...

पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरिकांना विविध योजनेची माहिती व मदत गावागावात जाऊन शिबिराद्वारे देण्यात येणार आहे आमदार किशोर आप्पा पाटील

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) प्रतिनिधी पाचोरा  ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती नसल्याने त्याच्या उपयोग करता येत नाही त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा भडगाव मतदार संघ विविध योजनांची माहिती चे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयामध्ये माहिती व मदत आलेल्या नागरिकांना करण्यात येणार आहे यामध्ये तहसील कचेरीत पुरवठा विभागात रेशन कार्ड साठी लागणारी मदत तसेच पंचायत समितीमध्ये विविध योजनांची माहितीसाठी मदत  यामध्ये बाल संगोपन श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार आयुष्यमान भारत कार्ड आ भा कार्ड  नवीन मतदान कार्ड दुरुस्ती करणे इतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजनांची माहिती व मदत करण्यात येणार आहे तरी वरील योजना संदर्भात आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्याला संपर्क साधावा शिबिराला प्रभाग क्रमांक आठ मधून सुरुवात करण्यात आलेली आहे यावेळेस यांनी काम पाहिले जनसेवक बंडू भाऊ केशव सोनार प्रताप हटकर  शुभम बागुल ...

महाराष्ट्रात घटस्फोटांचे वाढते प्रमाण : नात्यांच्या तुटकाव्यावर एक चिंतन - सौ शितल महाजन

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) महाराष्ट्रात घटस्फोटांचे वाढते प्रमाण : नात्यांच्या तुटकाव्यावर एक चिंतन - सौ शितल महाजन नुकतीच एक धक्कादायक बातमी वाचनास मिळाली देशभरातील सर्व घटस्फोटांपैकी तब्बल 18.7 टक्के घटस्फोट केवळ महाराष्ट्रात होत आहेत. हे प्रमाण सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक असून एक गंभीर सामाजिक चिंता व्यक्त करणारे होतेच त्यासोबत चिंतन करणारे होते कारण   भारतीय समाजव्यवस्थेत विवाह ही एक केवळ सामाजिक रचना नव्हे, तर ती एक भावनिक, सांस्कृतिक आणि नैतिक बांधिलकी मानली जाते. विवाहसंस्था ही आपल्या जीवनातील स्थैर्याचा केंद्रबिंदू मानली गेली आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीत, आधुनिकतेच्या नावाखाली झपाट्याने बदलणाऱ्या मूल्यव्यवस्थेमुळे आणि भावनिक गुंतवणुकीच्या कमतरतेमुळे ही संस्था आज मोठ्या संकटात आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे 'कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेला एक संशोधनात्मक अहवाल, ज्यामध्ये भारतात घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे स्पष्ट केले आहे. या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देशभरातील सर्व ...

सारोळा(पाचोरा) येथील शनीधाम उत्साहाला दि. २६ पासुन सुरुवात...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा (प्रतिनिधी) - पाचोरा शहरातील जवळ असलेल्या सारोळा ते मोढांळा रस्त्यावरील प्रसिद्ध असलेल्या शनीधाम मंदीराच्या यात्रोत्सव उत्साहाला आज दि. २६ पासुन सुरुवात होत असुन तयारी पुर्ण झाली आहे* *शनीधाम मंदीराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि. २६ पासुन ते २९ पर्यंत किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात दि २६ रोजी ते २९ पर्यंत सकाळी ११ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत जेवणरुपी प्रसाद त्यानंतर रात्री ८ ते १० किर्तनाचा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रोज नवीन प्रसिद्ध किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. २६ रोजी सार्वेकर ह.भ.प. सुरेश महाराज यांचा कार्यक्रम होणार आहे तर दि.२७ रोजी दोंडाईचाकर ह. भ. प.रविकिरण महाराज, दि. २८ रोजी कंचनपुर चे ह.भ. प . दिनेश महाराज, दि. २९ सकाळी किर्तनाचा कार्यक्रम असुन सकाळी ९ ते ११  वरसाडेकर ह. भ. प.गजानन महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसाद दुपारी १२ ते ३ होणार आहे. याच दिवशी यात्रोत्सव होणार आहे*. *दि. २९ रोजी सकाळी ११ ते...

पाचोरा येथील पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केली मोहीम...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. रात्री गस्त घालताना एका चक्रीवर अचानकपणे छापा टाकला असता ४० हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले. चक्रीचालक घटनास्थळावरून फरार झाला. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.या घटनेबाबत वृत्त असे की, येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे २३ मार्च रोजी रात्री पावणेआठला राजीव गांधी टॉउन हॉलमागे एक इसम हा दुकानात टेबलवर संगणकाच्या साहाय्याने एलईडी स्क्रीनवर १ ते १० अंक असलेल्या चक्रीवर पैसे लावत होता. या ठिकाणी पोलीस पथकाने अचानक छापा टाकला. तेव्हा नागरिकांनी पळ काढला. पोलिसांनी दुकानातील ४० हजार रुपये किमतीचे २ कंपनीचे स्मार्ट एलईडी टीव्ही व २ सीपीयू जप्त करण्यात आले आहेत.या घटनेबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चक्रीचालक आरोपी अविनाश खंडू सूर्यवंशी (रा.पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवारांसह पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस...

कर्तृत्वाची शिदोरी — मुख्याध्यापक सुकदेव गिते यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा

Image
मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) कर्तृत्वाची शिदोरी — मुख्याध्यापक सुकदेव गिते यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचे बीज पेरून त्यांचे भविष्य उज्ज्वल करतो. शिक्षणाच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नसतात, तर मूल्यसंस्काराचे दीपस्तंभही असतात. अशाच एका कर्मयोगी शिक्षकाचा सेवापूर्तीचा प्रसंग म्हणजे त्यांच्या कार्याचे गौरवगान आणि समाजाचा कृतज्ञताभाव व्यक्त करण्याची एक सन्माननीय संधी असते.     गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा संचलित कै. परशराम कोंडिबा शिंदे माध्यमिक विद्यालय, पुनगाव रोड, पाचोरा येथे अशाच एका गौरवशाली शिक्षकाच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. सुकदेव विठ्ठल गिते हे नियत वयोमानानुसार ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती सत्कार सोहळा हा त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळातील कर्तृत्वाला अभिवादन करण्याचा एक प्रेरण...

अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे शालेय साहित्य व फल वाटप करण्यात आले......

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) सामाजिक न्याय व संघटन साठी स्वतः चे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे कै आ. अण्णासाहेब पाटील - विश्वास पाटील अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील ढेकु सिम येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले,..  अंमळनेर तालुक्यातील जि.पःशाळा ढेकूसिम येथे गरीब  व गरजू विद्यार्थ्याना  शालेय साहित्य करण्यात आले. समयी सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले,  त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे  स्वागत करून,  अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची कार्याची माहिती देण्यात आली  या समयी उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. बी बी भोसले सर  यांनी मुलांना अण्णासाहेब पाटील याच्या कार्यविषयीं मार्गदर्शन केले, त्यानंतर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील सर यांनी कै आ. अण्णासाहेब पाटील याची जीवन कथा सांगत यांची सामाजिक  बांधिलकी व संघटन विषयी माहिती दिली,  समाजाला न्याय न मिळाल्य...

लंगडी भवानी येथील आदर्श हायस्कुल येथे विद्यार्थांना सायकली वाटप!

Image
  (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) लंगडी भवानी येथे आदर्श हायस्कूलमध्ये मानव विकास मिशन योजनांतर्गत शाळेतील ज्या विद्यार्थिनी शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर वास्तव्यास आहेत. त्या निकष पात्र विद्यार्थिनींना मोफत सायकली वाटप समारंभ विद्यार्थिनींचे ज्येष्ठ पालक श्री. पटलेदादा यांचे अध्यक्षतेखाली व न्यासाचे दाते तथा आधारवड ॲडव्होकेट श्री. गोविंदभाई विठ्ठल पाटील यांचे विशेष उपस्थितीत आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच न्यास सेवेतून निवृत्त मुख्याध्यापक श्री. किशोर बाबुराव चित्ते अंगणवाडी सेविका सौ. साळुंखा मोते सर्व शिक्षक- शिक्षकेतर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र देविदास मेटकर कवळीथ शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वजीत पुष्पलाल क्षीरसागर, माजी पोलीस पाटील श्री. रामदास डेमा चव्हाण यांची पत्नी व अन्य विद्यार्थिनींचे बहुसंख्य पालक यांच्या उपस्थितीत सर्व उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले ✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*

श्री राधा रमण मंदीराचा 25 वा वर्धापनदिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  आज दिनांक 23/03/2025, वार-रविवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्व . खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथील विद्यार्थ्यांना दोंडाईचा शहरातील व्यापारी मा .श्री सुदामशेठ माखीजा , त्यांचा संपूर्ण माखीजा परिवार , यांनी सिंधी कॉलनी दोंडाईचा येथे उभारलेल्या श्री राधा रमण आणि श्री स्वामी लीला शहा ह्या मंदिराच्या 25 व्या वर्धापन* *दिनानिमित्ताने ,शाळेतील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना आमंत्रित करून उत्सव साजरा करण्यात आला .25 वा वर्धापन  दिन साजरा करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर दोंडाईचा येथील दीदीं,सिंधी समाजाचे अध्यक्ष मा .श्री गिरधारी लाल रूपचंदानी ,आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि त्यांचे टीचर माननीय श्री बालकृष्ण गुप्ता ( पप्पु भैय्या )आणि सर्व सिंधी बंधू भगिनी यांना आमंत्रित करण्यात आले होते . शाळेचे संस्था अध्यक्ष माननीय श्री .शिवाजीराव साळुंके पाटील साहेब , मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम,आणि शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि व...

पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील शेतकर्याच्या पशुधनावर बिबट्याचा हल्ला.....!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) बांबरुड राणिचे येथील शेतकर्याच्या पशुधनावर बिबट्याचा हल्ला केला. पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):- पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील शेतकरी अशोक ओंकार डांबरे यांच्या शेततील गोऱ्हावर बिबट्याने हल्ला केल्याने गोऱ्हा मरण पावला. बांबरूड राणिचे येथील शेतकरी अशोक ओंकार डांबरे यांच्या खड़की शिवारातील तेली बडल्ली जवळील गट नंबर ५१ मध्ये २ बैल,३ गाई, ५ वासरे व ३ गोऱ्हा शेतात होते,त्यामधील ३ वर्षाचा गोऱ्हा बिबट्याने दि,१९ मार्च रोजी रात्री ८.३० सुमारास हल्ला केला,दि,२१ मार्च रोजी वन्य विभाग अधिकारी यांना घटनेची माहीती दिली अस्ता वन्य विभागाचे कर्मचारी व शिपाई यांनी येऊन पचंनामा केला व पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी पी.एम रिपोर्ट दिला.अशोक डांबरे यांचे पशुधनाची हानी झाली असुन शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करते आहे.

राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) राष्ट्रीय  हिंदी निबंध लेखन स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक पाचोरा दि. 23 -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव  भाषा अध्ययन प्रशाळा व संशोधन केंद्र, हिंदी विभाग आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21/03/2025 रोजी 'राष्ट्रीय निबंध लेखन प्रतियोगिता' व 'स्वतंत्र काव्यपाठ प्रतियोगिता' घेण्यात आली.      या स्पर्धेत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे (द्वितीय वर्ष - साहित्य) हिने काव्यवाचन स्पर्धेत 'उठो द्रोपदी शस्त्र उठा लो' ही कविता सादर करुन प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. सायमा शफी सैयद (प्रथम वर्ष - साहित्य) या विद्यार्थिनीने राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत 'एकता और सांस्कृतिक गौरव की वैश्विक आवाज' या विषयावर निबंध लिहून तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.     या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी...

पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे रमजान ईद निमित्त शहरात शांतता राहावी यासाठी डी.वाय.एस.पी. श्री.धनंजय येरुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मोठ्या संख्येने संपन्न.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे रमजान ईद निमित्त पाचोरा शहरातील पोलिसांनी रूट मार्च काढून शहरात शांतता राहावी यासाठी सर्वांना शांततेचे आवाहन केलेले असून हिंदू व मुस्लिम बांधवांनी सलोख्याने राहावे यासाठी प्रयत्न करावे आपले शहर आपले गाव व आपलेच सर्व असून आपण एकमेकाला सहकार्य केले पाहिजे तसेच रमजाननिमित्त हिंदू मुस्लिम बांधवांची पोलीस स्टेशनला बैठक घेण्यात आली यावेळी असंख्य मुस्लिम बांधव व हिंदू बांधव उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सी एन चौधरी सर श्री सचिन सोमवंशी श्री रसूल शेठ श्री अजहर खान श्री मौलाना तसेच या कार्यकर्त्यांनी आपले भाषण करताना सूचना केल्या की सर्वांनी शांतताने नांदावे यासाठी प्रयत्न करा तसेच यावेळी पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांनी जात धर्म न पाहता फक्त आपण सर्व एकच आहोत याची सर्वांनी काळजी घ्यावी यावेळी शहरातून असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते यानंतर आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रोजाचा उपास सोडण्यासाठी फळ फ्रूट देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सी एन चौधरी सर यांनी केले तर आलेले स...

काल पाचोरा येथे लोकन्यायालयात हजारों च्या संख्येने प्रकरणांचा निपटारा...

Image
मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल  पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च रोजी विधी सेवा समितीचे प्र.अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर जी. एस बोरा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी बी औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण 166 इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात 2 कोटी 4 लाख 14 हजार 583 रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व 892 प्रकरणांचा निपटारा होवून यात 2 कोटी 14 लाख 26 हजार 892 रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. एकूण 4 कोटी 18 लाख 41 हजार 475 रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. यावेळी दहा वर्षे जुने चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. तसेच व्हर्च्युअल पद्धतीने दोन प्रकरणे निकाली काढले, तसेच कौंटूंबिक वाद मधील 20 प्रकरणे निकाली निघाले.    यावेळी पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती जी.एस.बोरा तसेच विधी सेवा समिती सदस्य ललिता पाटील ...

तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ग्रामीण रुग्णालययाची दुरुस्ती करणे बाबत मंत्री महोदयांना दिले गेले सुचना पत्र.!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री व वाशिम पालकमंत्री सूचना पत्र माननीय नामदार मंत्री महोदय माननीय  प्रकाशराव आबिटकर आणि कुटुंब कल्याण यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येणार आहे. तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ग्रामीण रुग्णालययाची दुरुस्ती करणे बाबत. आम्ही ग्रामस्थ आपणास विनंती करतो की तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची दूरव्यवस्था झाली आहे. रुग्णाची गैरसोय होते आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी हॉस्पिटलची वाट पकडावी लागत आहे. खाजगी हॉस्पिटलचा खर्च करणे गोरगरीब रुग्णांना शक्य होत नाही. तरी सदरहू ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती होऊन सोयी सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, दिपक भोई जिल्हाध्यक्ष जळगाव, सौ मथुरा सुरजुसे, अमरावती शहर कार्याध्यक्ष उद्योग विभाग, चोपडा तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्यासमवेत भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर लवकरच माननीय नामदार श्री अजित दादा पवार स...

कृषी विभागातील विविध योजनांची गाव निहाय प्रशिक्षण मोहीमेला नंदीचे खेडगाव येथुन प्रारंभ...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज) कृषी विभागातील विविध योजनांची गाव निहाय आणि मंडळ प्रमाणे तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्याची विशेष मोहीम दिनांक 20/03/25 ते 25/03/25 पर्यंत राबवण्यात येत आहे त्याची सुरवात पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथून झाली ग्रामपंचायत कार्यालय यांच्या सहकार्याने सायंकाळी 6वाजता हा मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम असंख्य गरजू शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला  या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावातील प्रतीष्टीत शेतकरी श्री. अशोक आबा हे होते. तर सुत्रसंचालन  विभागाचे श्री. कैलास कुमावत व श्री. रविंद्र पाटील यांनी केले. या कार्यक्रमात. मा. तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश जाधव साहेब यांनी पुढील काही  महत्वाच्या योजनाबद्दल मार्गदर्शन केले. 1)पी एम किसान- या  योजनेची अंतर्गत ई केवायसी 2) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ....फळ झाडे आणि शेवगा लागवड तंत्रज्ञान 3) सूक्ष्म सिंचन योजना- अर्ज प्रक्रिया, योजनेचे फायदे, अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन 4) PMFME - अर्जप्रक्रिया ते प्रकरणास बँक मंजुरी मिळणे बाबत 5) जलयुक्त शिवार अभियान 2...

पाचोरा तालुक्यातील तीस वर्षाच्या मतिमंद युवकावर शेतात अत्याचार व अनैसर्गिक कृती केल्याच्या प्रकरणी फरार असलेले संशयित यास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री संदीप राजपूत व श्री समीर पाटील यांनी सापळा रचून केले जेरबंद

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा तालुक्यातील एका गावात ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यातील घडला.संशयित ६७ वर्षांचा आरोपी या घटनेनंतर फरार आहे. ६७ वर्षाच्या वृद्धाने गावातील एका मतिमंद युवकाला गावाजवळील शेतात नेले.तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना शेतात मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली. त्यांनी त्या वृद्धाला पकडले मात्र तो पसार झाला. ही घटना समोर आल्यानंतर पीडीत मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुला सोबत झालेल्या अतिप्रसंग कथन केला. व्हिडिओ काढणारे युवकही पोलिस ठाण्यात हजर झाले. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. लागलीच वेळेची पर्वा न करता तात्काळ तक्रार चालू असतानाच पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांनी तात्काळ एक पोलिसांची टीम तयार केली त्यामध्ये श्री संदीप राजपूत व पोलीस ड्रायव्हर श्री समीर पाटील यांनी सापळा रचून त्याची गुप्त माहिती घेऊन त्याला अटक केले

पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील संवेदनशील गुन्हातील आरोपीस तात्काळ जेरबंद केल्याने 2 पोलिस अधिका-यांचा पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेबांनी केला तात्काळ सत्कार...

Image
पाचोरा पोलीस ठाण्यात  दिनांक 21/ 03 /2025 रोजी  अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 कलम 92 (ब)(ड)(इ) तसेच BNS  कलम 115,133,351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   सदरचा गुन्हा संवेदनशील असल्याने पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तात्काळ पोलीस  पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत  व पोलीस हवालदार समीर पाटील यांना  आरोपीचा शोध   घेऊन हजर करण्यास सांगितले असता दोघांनी आरोपी यांचा  कसोशीने  शोध घेऊन सदर आरोपीस पुढील कारवाई करीता पाचोरा पोलीस ठाण्यात हजर  केले आहे.  त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच पाचोरा पोलीस ठाण्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सोहळा दोंडाईचा येथे संपन्न

Image
 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) दोंडाईचा येथील सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छ.संभाजीनगर संचालित,खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय,दोंडाईचा येथे संस्था अध्यक्ष  शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दोंडाईचा येथील सुवर्णकार भवन येथे उत्साहात पार पडला.* *कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष प्रवीणभाऊ महाजन, संस्थेचे  अध्यक्ष  शिवाजीराव साळुंके पाटील   सचिव छायाताई साळुंके,संस्थेचे उपाध्यक्ष सत्यम साळुंके ,सौ कोमल  साळुंके,राष्ट्रवादी महिला धुळे जिल्हाध्यक्षा पूजाताई खडसे, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अवनी पाटील,दोंडाईचा शहर व ग्रामीण मराठी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र टाटीया जितेंद्रसिंग गिरासे,अख्तर शाह या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि* *दीपप्रज्वलन करण्यात आले नंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली .सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी,व्यसनमुक्तीपर नाटिका , राम आयेंगे गीत, क्या कहना हे आनंद दर्शवणा...

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व पोलीस कर्मचारी यांची आगामी सणवार उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून पायी पेट्रोलिंग...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी रमजान निमित्त तसेच येणारे सण निमित्त पाचोरा शहरात कायदा व सुव्यवस्था सुरक्षितता राहावी याकरिता पाचोरा शहरातून रोज संध्याकाळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी आपले पोलीस अधिकारी व कर्मचारी होमगार्ड पथक यांना सोबत घेऊन पाचोरा शहरात रोज पायी पेट्रोलिंग चालू केली असून यावेळी त्यांनी ट्रिपल सीट मोटरसायकल वाहनधारक अल्पवयीन मोटरसायकल वाहनधारक तसेच विना कागदपत्र वापरणारे गाडी चालक यांच्यावर कारवाई केलेली असून पायी फिरून त्यांनी शहरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी नागरिकांना काही सूचना केलेले असून बेशिस्त पार्किंग गाड्या करणाऱ्या वाहनावर सुद्धा कारवाई केली तसेच शहरातील जामनेर रोड आठवडे बाजार पंचमुखी हनुमान चौक मच्छी बाजार गांधी चौक कृष्णापुरी सिंधी कॅम्प या भागात पाई फिरून पेट्रोलिंग सुरू केलेली असून त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे यावेळी पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहे...

अँटी करप्शन बोर्ड दिल्ली तर्फे नासिक सिन्नरला सौ. राजश्री चौधरी यांना "महाराष्ट्र भूषण पुरस्कार"

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) अँटी करप्शन बोर्ड दिल्ली तर्फे नासिक सिन्नरला सौ. राजश्री चौधरी यांना "महाराष्ट्र भूषण पुरस्कार"  देऊन झाला सत्कार.  व अँटी करप्शन बोर्ड च्या वतीने डिव्हिजन वाईस प्रेसिडेंट छत्रपती संभाजीनगर च्या पदावर नियुक्ती ... औरंगाबाद ( राहुल परदेशी): नाशिक मधील सिन्नर येथे काल दि .19 मार्च 2025. रोजी बॅक्वेट हॉल, फाइव स्टार हॉटेल , संस्कृती घोटी रोड,सिन्नर येथे सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रातील अतुलनिय कामगीरी बद्दल  दिल्ली व महाराष्ट्रच्या पहिल्या महिला पत्रकार म्हणून,ज्यांनी उंच भरारी घेऊन समाजातील, अंधश्रद्धा ,अत्याचार , भ्रष्टाचार, बुवाबाजी, हुंडाबळी, महिलांवरील अत्याचाराला  विश्वजगत,  साप्ताहिक सबला उत्कर्ष वृत्तपत्र दिल्ली & महाराष्ट्र वृत्तपत्रामधून  आपल्या लेखणीने वाचा फोडली, पॉझिटिव्ह बातम्या आणि सामाजिक लेख यांच्या माध्यमातून समजाप्रबोधन केले. औरंगाबाद येथील सबला उत्कर्ष फाउंडेशन च्या वतीने सामाजिक कार्यातही भर दिला. आतापर्यंत राजश्री चौधरी यांना 35 पुरस्कार दिल्ली व म...

पाचोरा वकील संघाच्या उपाध्यक्षा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्ष यांचे चि.रुद्र रायसाकडा यांचा वाढदिवस एक विस्मरणीय आठवणी सोबत.....!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा,२१मार्च २०२५) पाचो-या तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणजेच दुसरे मिनी पंढरपूर....  श्री गोविंद महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरे. पिंपळगाव(पाचोरा)  आषाढी एकादशी दिवशी  रात्री बारा वाजता श्री गोविंद महाराज यांच्या मंदिराचा घंटा आपोआप निनांदतो येथे दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रा भरते पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त येथे पायी दर्शनाला येतात असे हे नावाजलेल्या तीर्थक्षेत्र हरे. पिंपळगाव या  संत भुमीच्या गावात मतीमंद निवासी कर्णबधिर विद्यालय आहे. त्या विद्यालयात  पाचोरा वकील संघाचे नुतन उपाध्यक्षा व प्रख्यात विधी तज्ञ ॲड.सौ.कविता मासरे( रायसाकडा) मॅडम व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नुतन प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांचे चिरंजीव कु.रूद्रराजे रायसाकडा यांचा आज दिनांक २१ मार्च २०२५ शुक्रवार रोजी "जन्म दिवस" ह्या "२१मार्च" ला  दरवर्षी  अविस्मरणीय क्षणात किशोर रायसाकडा हा साजरा करत असतात. याच शुभ दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मतीमंद व  कर्णबधिर मुलांसाठी ...