जितेंद्र जैन यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी बिनविरोध निवड...!कामगार चळवळीला नवे बळ – युवकांचा बुलंद आवाज अधिक धारदार होणार


— मुख्य संपादक : राजेंद्र खैरनार
सत्यशोध न्यूज चॅनल

जळगाव–पाचोरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय व जळगाव जिल्ह्यात युवकांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले जळगाव युवा सेना जिल्हाध्यक्ष मा. जितेंद्र जैन साहेब यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ही निवड म्हणजे त्यांच्या संघर्षशील नेतृत्वगुणांवर, संघटनात्मक बांधिलकीवर व श्रमिकांच्या हक्कासाठी सातत्याने उभ्या राहिलेल्या लढ्यावरील विश्वासाची ठोस पावती मानली जात आहे. युवकांमध्ये प्रभाव असलेले मा. जितेंद्र जैन हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व कामगार प्रश्नांवर सक्रिय असून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील कामगार प्रश्नांना अधिक सक्षम, संघटित व प्रभावी नेतृत्व मिळणार असून श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा आवाज अधिक धारदार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विविध सामाजिक, राजकीय व कामगार संघटनांकडून मा. जितेंद्र जैन साहेब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..