रोटरी क्लब पाचोरा–भडगावतर्फे विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ व क्षयरोग जनजागृती कार्यक्रम


(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल) 

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा–भडगाव यांच्या वतीने कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पुनगाव रोड, पाचोरा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ सेवनविरोधी जनजागृती व जागतिक क्षयरोग (टीबी) जनजागृती या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंटरॅक्ट डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. अनिल देशमुख यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगत त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. सिद्धांत तेली यांनी क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती देत प्रतिबंध, लक्षणे व उपचार यावर जनजागृती केली.

रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी रोटरी क्लबचे सामाजिक कार्य, इंटरॅक्ट क्लबची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यासोबतच विद्यार्थ्यांना रोटरी युथ एक्सचेंज कार्यक्रमाची माहिती देत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकण्याच्या व अनुभव घेण्याच्या संधींची ओळख करून दिली. यावेळी रोटरी क्लब पाचोरा–भडगावने मागील महिन्यात साकारलेल्या “युनाइट फॉर गुड” या भव्य रांगोळीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. याबद्दल शाळेच्या वतीने रोटरी क्लबचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख, तसेच पदाधिकारी भरत सिनकर, डॉ. सिद्धांत तेली, संजय कोतकर, चिंतामण पाटील उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सोमवंशी सर, सागर मॅडम, धोबी सर, टोणपे सर यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या कोतकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुशील महाजन सर यांनी मानले.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष प्रशंसेचा ठरला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..