Posts

Showing posts from November, 2024

सेवा गृप नाशिक यांच्या वतीने समाज सेवा कार्याचा वसा घेऊन 5 व्या वर्षात यशस्वी वाटचाल करून पदार्पण...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)        सेवा गृप नाशिक यांच्या वतीने समाज सेवेचा वसा घेऊन या महिण्यात दिवाळीचे मुहूर्त साधत ज्यांना दोन वेळेला जेवणाची कमतरता आहे अशा तीस (30) गरजू कुटूंबांना रेशन किट आणि मिठाई बाँक्सचे वाटप करून गरजूंचा चेहरावरचा आनंद दिसत होता तो पाहून आमचा आनंदही गगनात मावत नव्हता, जेवढा  त्यांना आनंद झाला तेवढाच आम्हालाही अन्नधान्य किट आणि मिठाई देतांना झाला. या गृपच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम राबवून आता पर्यंत शाळेत लागणारे अनेक शालेय साहीत्य वाटप, विद्यार्थ्यांना फुड्स पाँकीट वाटप, हिवाळ्यात  गरिबांना मोफत ब्लँकेट वाटप, पावसाळ्यात वृध्दांना छत्री वाटप, अबोल पशुंना चारा छावण्या, वृध्दाश्रम, अनाथाश्रमात कुठल्याही प्रकारचे साहाय्य करणे, उन्हाळ्यात झाडांना पाण्याची कमतरता पडते म्हणून वृक्षावल्ली फाऊंडेशनला पाईप देऊन त्यांना सहकार्य करणे, असे एक ना अनेक कामे सेवा गृपच्या साहाय्याने ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना साहाय्य करणे, थोडक्यात सांगायचे झाले तर ज्यांना जे काही अन्न,वस्र आणि निवारा या अशा प्रकारे एक...

गिरीश महाजन यांची सलग सात वेळा आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न.लोहारा विविध कार्यकारी चेअरमन ,संचालक मंडळ,तसेच भारतीय जनता पार्टी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचा संयुक्त उपक्रम.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते ना.गिरीश महाजन यांची सलग सातवेळा आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन,व्हा चेअरमन संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५७ रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली. यामधील १०८ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे दिनांक ४ डिसेंबरला पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजक शरद अण्णा सोनार (भाजपा लोहारा कुऱ्हाड गटप्रमुख.) यांनी दिली. या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग एन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी तपासणी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी,नाक,कान,घसा, मोतीबिंदू तसेच तिरडेपणा, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुतखडा, अशा विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांना मोफत मेडिकल गोळ्या औषधी देण्यात आले. हे आ...

पाचोरा येथील देशमुख वाडीतील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्री अंकुर अनिल झंवर यांच्या हॉस्पिटल ला सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तपासणीला आलेल्या पेशंटांना देण्यात आले गिफ्ट

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  पाचोरा येथील देशमुख वाडीतील सर्वांचे परिचित असलेले मनमिळाऊ स्वभावाचे व अत्यंत गोड बोलणारे श्री डॉक्टर अनिल झंवर यांचे वडील स्वर्गीय डॉक्टर श्री एस आर झंवर यांनी शिक्षण घेऊन 1954 यावर्षी यांनी पाचोरा भडगाव जामनेर या तीन तालुक्यातील एकमेव एमबीबीएस डॉक्टर म्हणून पदवी घेऊन तीन तालुक्याचा नावलौकिक केली होत तसेच त्यांना एम ए सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती पण त्यांची घरची साधारण परिस्थिती असल्यामुळे त्यांनी 1957 यावर्षी पाचोरा येथेच आपल्या राहत्या घरी छोटासा दवाखाना सुरू केला होता त्यांची परंपरा आज त्यांचे चिरंजीव व नातू करीत आहे चिरंजीव डॉक्टर श्री अंकुर झंवर यांनी आपले शिक्षण मुंबई येथे एमबीबीएस एमडी डीएनबी करून स्पेशल हृदयरोग तज्ञ म्हणून सेवा करण्याचा निर्धार केला त्यासाठी त्यांनी मोठ्या शहरात हॉस्पिटल न टाकता आपले आजोबा व वडील यांनी पाचोरा शहरासाठी दिलेले योगदान व सेवा या साठी त्यांनी सुद्धा पाचोरा येथेच आपल्या राहत्या घराजवळ देशमुख वाडी येथे हॉस्पिटल टाकण्याचा मानस केला व त्यांनी देशमुख वाडी येथे तीन वर्षांपूर्व...

लोहारा येथे फॅमिली हेल्थ कार्ड सभासद नोदणी शिबिराला प्रतिसाद..समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने माणुसकी रुग्णसेवा समूह व छत्रपती शाहू महाराज संस्था यांचा स्तुत्य उपक्रम

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज) लोहारा तालुका पाचोरा येथे मजूर शेतकरी गरुड नागरिकांना फॅमिली कार्डचे सभासद नोंदणी शिबीर माणुसकी रुग्ण सेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले. शिबिराचा 250 सभासदांनी लाभ घेतला. फॅमिली हेल्थ कार्डमुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलामध्ये 20 ते 50 टक्के पर्यंत सभासदांना सूट मिळणार आहे त्यात ओपीडी,सोनोग्राफी,रक्त तपासणी,अतीदक्षता उपचार आधी समाविष्ट केले आहे.. माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गरिबांचे सिंघम म्हणून ओळख असलेले तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोहारा येथे शिबिर लावण्यात आल्याचे छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश एस आर के यांनी सांगितले.   कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती पूजनाने झाली यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व ज्येष्ठ नागरिक प्रभाकर चौधरी, आ.आ.पटेल , विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ.सागर गरुड, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ केयू...

हॅट्रीक आमदार किशोरआप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) हेट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार पाचोरा भडगाव मतदार संघात तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, राजेंद्र खैरनार, स्वप्निल कुमावत,कुंदन बेलदार उपस्थित होते.  महाराष्ट्रात पहिले आमदार किशोर आप्पा पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पाठिंबा दिला होता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशानुसार ,राज्य महासचिव विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाठिंबा देण्यात आला होता  उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, अबरार मिर्झा,भुवनेश दुसाने, राकेश सुतार, नागराज पाटील, गणेश रावळ, राजेंद्र खैरनार यांनी निवडणुकीत उत्तम कामगिरी केली ...

25नोव्हे.पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी भडगावावात प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांचे साकडे घातले. तेथे शिवसैनिकांनी महाआरती केली.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) भडगाव येथील बाजार चौकातील श्री राम मंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील यांना जनतेने भरघोष मतांनी विजयी केले.  सलग तिसऱ्या वेळेस जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विकासाठी किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेना-युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भडगाव येथील बाजार चौकातील मंदिर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी साकडे घातले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर प्रमुख बबलू देवरे, आबा चौधरी, अतुल परदेशी,जगन भोई,संतोष महाजन, दादा भोई, संभाजी पाटील, नाना हाडपे, प्रदीप महाजन, नितीन महाजन, दुर्गेश वाघ, निलेश चव्हाण नागेश वाग, आबा महाजन, मंदार कासार, रवी आहिरे, अमोल पाखले, राजू आहिरे, रवी सोनार, सुनील भोई महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रत्ना पाटील, शहर प्रमुख भारती माळी, सीमा महाजन, सुनंदा राजपूत, जय...

डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणा-या इसमाविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) दिनांक २४/११/२०२४ रोजी सकाळी ०९:२५ वाजेच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अश् गात इसमाने मोबाईल क्रमांक ७७९८८४४४९८ वरुन फोन करुन माहिती दिली को, पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे. त्यापैकी २ लोकांचा मर्डर झालेला आहे. त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे. तात्काळ पोलीस पाठवा याबाबतीत फोन आलेला होता. पाचोरा पोलीस स्टेशन कडील स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावून मिळालेल्या माहिती प्रमाणे सखोल चौकशी करता फोन केल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती. फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरुन शोध घेतला असता शैलेश रविन्द्र पाटील रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव हल्ली रा. जारगाव चौफुली पाचोरा हा मिळून आला त्यास घटनेबाबत विचारपुस करता त्याने कळवले की, मी मुददामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. तशी काही...

निवडणूक शांततेत पार पडणं हे नवीन जन्म झाल्यासारखं मला वाटतं.... निवडणूक निर्णय अधिकारी भुषण जी अहीरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व टिम, पोलिस प्रशासन चे मनापासून मानले आभार!

Image
मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) गेल्या वर्षभर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उस्फुर्त प्रतिसाद व तत्परतेमुळे विना संकट इतकी मोठी जबाबदारी शांततेत पार पाडता आली... कोणतेही गालबोट न लागता नियमात व चाकोरीबाहेर न जाता एक मोठा टास्क आज पूर्ण झाला आहे... तसे तर निवडणूक शांततेत पार पडणं हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी नवा जन्म झाल्यासारखे आहे असं आज मला वाटतंय... कितीही प्रेशर असलं तरी चांगली टीम सोबत असेल तर कोणतेही काम उत्तम रित्या पार पडते... विजयजी बनसोडे यांनी विराट कोहली सारखी प्रत्येक वेळी उत्तम बॅटिंग करून चव्हाणके साहेब यांची कधीही उणीव भासू दिली नाही तहसीलदार सोलाट मॅडम यांना दिलेल्या जबाबदारी सहित इतर वेळेवर सांगितलेले कोणतेही काम यशस्वी रित्या पार पाडले... उमेश,मयुर,जयंत (जरी शेवटी विकेट पडली असली तरी सुरुवातीला खूप मेहनत घेतली होती 😀) नकुल, दिलीप राजपूत, माने साहेब, मंडळ अधिकारी येवले यांनी उत्तम रित्या पूर्णवेळ निवडणूक शाखेत समर्पित कार्यकर्ते म्हणून काम केलं...  हिमनग सारखं काम ...

निकाल जाहीर होण्याअगोदरच आमदार किशोर आप्पा पाटील हॅट्रीक करणार, शुभेच्छा बॅनर लागलेत भडगाव शहरासह बाळद बुद्रुक गावात

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणुकीत एकुण १२ उमेदवार उभे असून यापैकी खरी लढत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील, महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. वैशालीताई सुर्यवंशी, अपेक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व अमोल भाऊ शिंदे यांच्यामध्ये चुरशीची होतांना दिसून येत असतांनाच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी ऐनवेळी घुमजाव केल्यामुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील वातावरणात कमालीचा संताप व्यक्त केला जात होता. याच चढाओढीत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता कोण निवडून येईल याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. यात काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमदार किशोर आप्पा पाटील हेच आघाडीवर असल्याचे तर काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अमोल भाऊ शिंदे हेच बहुमताने निवडून येतील अश्या बातम्या सगळीकडे फिरत आहेत. मात्र या दोघांच्या चढाओढीत कदाचित सौ. वैशालीताई सुर्यवंशी या बाजी मारुन जातील अशीही शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी मात्र निवडणूक निकाल लागण्याआधीच काही उत्साही कार्यकर्त्यांनी गावात आमदार किशोर आप्पा पाटील यांना चक्क ...

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने १८ पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी प्रक्रिये बद्दल निवडणुक अधिकारी यांच्या कडून २३नोव्हे. मतमोजणी संदर्भात तातडीची पत्रकार परिषद संपन्न -वाचा निवडणुक अधिकारी भुषण जी अहीरे साहेबांनी काय-काय दिली माहिती

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने १८ पाचोरा विधानसभा मतदार संघातील, दैनिक वृत्त संपादक/प्रेस रिपोर्टर/वार्ताहर यांची आज दिनांक २१/११/२०२४ रोजी ३-३० वाजता निवडणुक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत दि.२३/११/२०२४ रोजी होणाऱ्या मतदान मोजणी पूर्व तयारी कामी निवडणूक निर्णय अधिकारी १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालयातील बैठक हॉल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम सर्व उपस्थितीत पत्रकार वार्ताहर यांचे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी स्वागत केले, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक च्या पार्श्वभुमीवर दिनांक-२०/११/२०२४ रोजी १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत दिनांक-२०/११/२०२४ रोजी मतदानाची सुरुवात हि सकाळी ७.०० वाजेपासून सुरु होवुन काही मतदान केंद्रावर दुपारी ०४.०० वाजे नंतर मतदारानी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सदरील मतदान केंद्रावर रात्री ११.०७ ...

पाचोरा तालुक्यातील तसेच शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत पोलिस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेवून नागरिकांना केले सहकार्य

Image
(राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया झाले असून पाचोरा शहरात व तालुक्यात निवडणुकीची प्रक्रिया झाली असून नागरिकांनी दुपारी तीन नंतर उत्साहाने मतदानाला निघाले व शांतते मार्ग सर्वत्र मतदान झाले असून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर मॅडम डी वाय एस पी श्री धनंजय वेरुळे साहेब पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी एपीआय श्री दिनेश बदाने पीएसआय श्री प्रकाश चव्हाण पीएसआय श्री योगेश गणगे पीएसआय श्री परमेश्वर दळवी पीएसआय श्री सुनील पाटील तसेच आपले पोलीस कर्मचारी होमगार्ड पथक कमांडो पथक या सर्वांची प्रत्येक बुथवर नेमणूक करून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी श्री डी वाय एस पी धनंजय येरुळे साहेब व पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व सर्व अधिकारी यांनी पाचोरा तालुक्यात व शहरात फिरून बंदोबस्त चोख ठेवला तसेच सर्व नागरिकांना मतदारांना त्यांनी शांततेने मतदान करण्यासाठी सहकार्य केले

रांगोळी कलाकार, आणि सौ.सा.प.शिंदे शाळेतील शिक्षिका सौ.सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी स्वताच्या घरी रांगोळी काढून केली मतदान जागृती*

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा:-(19-11-2024) सार्वत्रिक निवडणुका 2024च्या अनुषंगाने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये 100% मतदानासाठी जनजागृती होण्यासाठी  रांगोळी कलाकार तसेच सौ.सा.प. शिंदे शाळेतील शिक्षिका सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी स्वतःच्या घरी मतदान जनजागृती रांगोळी काढून, आपल्या रांगोळीतून लोकांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचा दिला संदेश, सौ. सुवर्णा पाटील या नेहमी अनेक सामाजिक विषयांवर रांगोळ्या काढून समाजिक संदेश आपल्या रांगोळीतून देत असतात व समाजात जनजागृती करुन समाजकार्य करत असतात, यासाठी त्यांना  अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे, यासाठी त्यांना त्यांचे परिवाराचे तसेच मित्रपरिवाराचे सहकार्य प्रोत्साहन लाभते.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024च्या अनुषंगाने 18/11/2024 सायंकाळी 6.00 वा. पासुन) ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत (दि.21/11/2024 रात्री 12.00 वा. पावेतो) पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर एकत्रितपणे वावरण्यावर याव्दारे प्रतिबंध करण्यात येत आहे.-जिल्हाधिकारी जळगाव

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय, जळगाव (गृह शाखा) आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, ता.जि. जळगाव- 425 001 Email-homebranchialgaon@gmail.com दूरध्वनी क्र. 0257-2220152 फैक्स नं. 0257-2220500 वाचले :- 1) भारत निवडणुक आयोग यांचेकडील पत्र क्र.No.ECI/PN/149/2024 दि.15/10/2024 2) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 क्रमांक/दंडप्र/1/कावि/2024/02 दिनांक: 18/11/2024 आदेश ज्या अर्थी, मा. भारत निवडणुक आयोगाने दि. 15/10/2024 रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. व या दिनांकापासुन आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जळगांव जिल्हयातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जळगांव जिल्हयाकरिता मतदानपुर्वीच्या पुर्वीच्या आदल्या दिवसापासून (दि. 18/11/2024 सायंकाळी 6.00 वा.पासुन) ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत (दि.21/11/2024 रात्री 12.00 वा. पावेतो) पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्...

किशोर आप्पा मतदारसंघातील जनतेसाठी सावलीचे झाडच - डॉ ज्योती वाघमारे

Image
 दि.18 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) आमदार किशोर आप्पा पाटील हे विकास कामांमध्ये अग्रेसर तर आहेतच मात्र मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे नेतृत्व असून सर्वांना आपल्या अडीअडचणीच्या काळात त्याचे सावलीचे झाड जणू ते वाटावेत असे त्यांचे व्यक्तिमत्व असल्याचे भावोद्गार शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने केले.           पाचोरा शहरातील आठवडे बाजार भागात शनिवारी संध्याकाळी 7 वाजता झालेल्या प्रचार सभेत मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला असून आगामी डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना पंधराशे नव्हे तर तब्बल 2100 रुपये मिळणार असून शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा करण्याचे अभिवचन महायुती शासनाच्या वतीने या ठिकाणी जनतेला देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. वैशाली सूर्यवंशी यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या की,त्या महिला असून महिलांच्या भावनांची खिल्ली उडवणाऱ्या वैशाल...

पाचोरा पोलिस स्टेशन ची उत्कृष्ट कामगिरी.....सार्वत्रिक विधानसभा निवडणुक* २०२४ च्या अनुषंगाने ड्राय डे जाहीर करण्यात आला असता काल अवैध देशी दारू चे ५० खोके जप्त,तरी पोलिस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की,१८/११/२०२४ ते २३/११/२०२४ कुणीही मद्याची वाहतूक व विक्री करु नये!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा पोलीस स्टेशन दिनांक १८/११/२०२४ पो.हे.को./१२३० योगेश सुरेश पाटील वय ३८ धंदा नोकरी नेमणूक पाचोरा पोलीस स्टेशन, जिल्हा जळगाव, मी.क. ७५५८८वे चे हजर राहुन सरकारतर्फ फिर्यादी होवून फिर्याद लिहून देतो की, मी पाचोरा पोलीस ठाणे संविधान की अन मध्यान्हें प्रकटीकरण साधत काम करीत आहे. आज दिनांक १८/११/२०१५ क्रमांक ००५/०६.०५ पासून मी तसेच पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार, पोहें.को.०६२ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकों/२६५८ रणजित  पाटील असे पाचोरा शहरात विधानसभा निवडणुक २०१४ अनुषंगाने खाजगी वाहनाने रवाना होत असतांना पेट्रोलींग करीत असतांना आम्ही जारगाव चौफुली ते जळगाव चौफुली असे जात आम्हाला एक चारचाकी ओमनी गाडी ही जळगाव चौफुली कडे जाताना दिसली. सदर पांढ-या रंगाच्या ओमनी गाडीमध्ये एक हिरव्या रंगाच्या कपड्यात झाकलेला होता. सदर गाडीचा आम्हाला संशय आल्याने आम्ही त्यांना भारत डेअरी  रिक्षा स्टॉप पाचोरा येथे ०६.२० वा. थांबविले. सदर ओमनी चालकास त्याची ओमनी गाडी ही  उजव्या बाजूस लावण्यासाठी सांगीतले पो.नि./श्री. अशोक पवार यांनी व आम्ह...

पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी बजावला मतदानाचा हक्क

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी बजावला मतदानाचा हक्क विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर दिनांक-20/11/2024 रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकामी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना आपले मतदानाचे हक्क बजाविता यावे याकरीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा या ठिकाणी टपाली मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत दिनांक-17/11/2024, 18/11/2024 व दि.19/11/2024 रोजी या तिनही दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत टपाली मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. सदर वेळेत निवडणुकामी नियुक्ती केलेल्या विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतदान करता येणार आहे. त्या अनुषंगाने टपाली मतदानाचा पहिल्याच दिवशी म्हणजेच दिनांक-17/11/2024 रोजी महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा ...

गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार आहे. पाचोरा भडगाव मतदार संघ हा विकासाचे एक पॅटर्न मला करायचा आहे. पुढच्या पाच वर्षात राज्यात 'पाचोरा-भडगाव पॅटर्न' नावाजेल हा माझा शब्द आहे. असे मत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. -----------------

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा/ भडगाव ता.17: गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार आहे. पाचोरा भडगाव मतदार संघ हा विकासाचे एक पॅटर्न मला करायचा आहे. पुढच्या पाच वर्षात राज्यात 'पाचोरा-भडगाव पॅटर्न'    नावाजेल हा माझा शब्द आहे. असे मत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.  ----------------- पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनतेने  माझ्यावर सलग दोन टर्म प्रचंड विश्वास दाखवत मला विधानसभेत पाठविले. मी ही मतदारांच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. मी मायबाप जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्याने शंभर टक्के तिसऱ्यांदा मला ही ज...

पाचोरा तालुक्यातील तमाम शेतकरी,आडतदार व्यापारी बांधवांना कळविण्यात येते की,"सार्वत्रिक निवडणुका 2024" च्या अनुषंगाने दि.19/11/24 ते 20/11/2024 या दोन दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद राहील.!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी,आडतदार, व्यापारी यांना भारतीय निवडणूक आयोग दिल्ली,तसेच जिल्हाधिकारी यांच्या कडुन सुचित करण्यात येते ते वाचा खालील प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा (मुख्य मार्केट यार्ड, पाचोरा जि. जळगांव (४२४२०१) मुख्य कार्यालय : (०२५९६) २४५३३२, २४५८४३ सभापती: (०२५९६) २४५५१९, सचिव : (०२५९६) २४४४९३ जा.क्र. २७६/२०२४-२५) दि.१६/११/२०२४ जाहिर सूचना कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे शेतीमाल खरेदी विक्रीसाठी येणारे तमाम शेतकरी, आडतदार, खरेदीदार व्यापारी यांना सूचित करण्यात येते की, भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांचे निर्देश व मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत 18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील निवडणुकी करिता मतदान कर्मचारी पथकांना मतदान केंद्रावर पोहचवणे कामी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दि.१९/११/२०२४ ते २०/११/२०२४ रोजी बसेस लावण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा मध्ये मोकळी जागा उपलब्ध करून देणेबाबत उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा तथा न...

अमोल शिंदेच्या घोषणा : परिवर्तनाचा दावा,पाचोरा शहरात शेतकरी पुत्राची हवा..

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडीतराव शिंदे (क्र.७ निशाणी- शेतकरी) यांनी आज पाचोरा शहराच्या पश्चिम भागातील कॉलनीमध्ये प्रचार दौरा केला. यावेळी शहराच्या कान्या कोपऱ्यात शेतकरी पुत्र अमोल पंडीतराव शिंदे यांच्या घोषणांनी वसाहती दणाणून गेल्या. नवीन नागरी वसाहती भागात परिवर्तनाच्या घोषणेला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.  पाचोरा -भडगाव चे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहरातील कैलादेवी मंदिरापासून आज दिनांक 16 रोजी प्रचार रॅली ला सुरुवात झाली. शिवतीर्थ, एम एम कॉलेजच्या पाठीमागील नागरी वसाहती, जिजामाता कॉलनी, दुर्गा नगर, विवेकानंद नगर, पाटील नगर इत्यादी नागरी वसाहतींमधून जनतेला अभिवादन करीत ही प्रचार रॅली संपन्न झाली. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी माता भगिनींनी अमोल शिंदे यांचे औक्षण केले. यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद अमोल पंडितराव शिंदे यांना मिळाले. अनेक ठिकाणी जनतेने  रॅलीचे उस्फूर्त स्वागत करत स्वागत करत अमोल शिंदे यांच्याशी हस्तांदोलन करत वार्तालाप के...

अभिनेता गोविंदाच्या रोडशोला पाचोर्‍यात नागरिकांचा उदंड प्रतिसादप्रकृती अस्वस्थाने रॅली अर्धवट सोडत गोविंदा मुंबईकडे रवाना....

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा ता.16: पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा व भडगाव शहरात अभिनेता गोविंदा यांच्या जाहीर रोड शोचे आयोजन करण्यात आले होते, मात्र अचानक छातीत वेदना होऊन त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने  रॅली अर्धवट सोडत ते तात्काळ मुंबईकडे रवाना झाल्याने चहात्यांचा मात्र हिरमोड झाला. ----------- पाचोरा शहरात महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेता गोविंदा हे पाचोर्यात दाखल झाले होते. हेलीपॅड वर डॉ.प्रियंका पाटील व महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षण करत आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पाचोरा व भडगाव शहरात त्यांच्या भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पाचोरा शहरात एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात हेलिपॅड ची व्यवस्था करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्रांगणाच्या सभोवताली अभिनेता गोविंदा व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या चाहत्यांनी गराडा घालत मोठी गर्दी के...

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकासा कामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असुन पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष मधुकर काटे व विधानसभा संयोजक अमोल पाटील यांनी सांगीतले.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा ता.16: आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकासा कामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असुन पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष मधुकर काटे व विधानसभा संयोजक अमोल पाटील यांनी सांगीतले.  --------------- पाचोरा-भडगाव तालुक्यात आमदार किशोर  आप्पा पाटील यांनी जवळपास तीन हजार कोटीचे विकास  कामे केली आहेत.प्रत्येक गावात त्यांनी कोट्यावधीची विकास  कामे केली आहेत. तर पाचोरा व भडगाव शहराचे रूपच बदलविण्याचे काम त्यांनी केले आहे. महायुतीच्या अडीच वर्षाच्या शासनाच्या काळात त्यांनी मोठ्याप्रणात नीधी खेचून आणला हे विषेश! पाचोरा तालुक्यात 'विकास' बोलतोय! आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा शहरासह तालुक्यात मोठ्याप्रणात विकास कामे केले आहेत. शहरात व्यापारी संकुल, हिवरा नदिवरील पुल,भूमिगत गटार योजना, ओपनस्पेस चा विकास, तारखेडा, माहेजी येथे झालेले 33/11 केव्ही सबस्टेशन, प...

गेल्या दहा वर्षात पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला आहे. रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न लोकसोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर पाचोरा व भडगाव शहरात झालेले विकास कामे आश्वासक आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा ता.15:गेल्या दहा वर्षात पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला आहे. रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर पाचोरा व भडगाव शहरात झालेले विकास कामे आश्वासक आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.  ------------- पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रचंड विकास कामे केले आहे. विरोधक त्याबद्दल बोलू  शकत नाही. त्यामुळे इतर काही मुद्दे नसल्याने ते 'विकास' वरून निवडणुक इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करत आहे. पण मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे ते विकासाच्या बाजूने म्हणजेच किशोरआप्पा पाटील यांना मतदान करतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.  'गिरणे' वरील पुल अंतिम टप्प्यात  भडगाव शहरात जुन गाव ते पेठ भागाला जोडण्यासाठी बर्याच दिवसापासून पूलाची मागणी होती. त्या अनुशंगाने सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश...

अभिनेता गोविंदा 16नोव्हे. रोजी पाचोऱ्यात ; आ. किशोरअप्पा पाटिल यांच्या च्या प्रचारार्थ बाईक रॅली

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा १६ रोजी पाचोऱ्यात ; आ. किशोरअप्पा पाटिलांच्या प्रचारार्थ बाईक रॅली* पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आरपीआय (आठवले गट)पिआरपी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांची भव्य बाईक रॅलीचे शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी पाचोरा दु. 3 वा.  व भडगाव दु. 4 वा. करण्यात आले आहे.तरी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यात 227 वयोवृध्द व दिव्यांग मतदार यांनी केले गृह मतदान

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वयोवृध्द (85+) व दिव्यांग (PWD) मतदार त्यांच्यासाठी मतदानापासून वंचित राहू नये या करीता गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत PWD-55 व 85+-187 असे एकूण 242 मतदार यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दिनांक-14/11/2024 व 15/11/2024 या दोन दिवशी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार दिनांक-14/11/2024 रोजी घेण्यात आलेल्या 223 गृह मतदानापैकी दिव्यांग (PWD)-50 व वयोवृध्द (85+)- 161 यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व उर्वरित शिल्लक 12 मतदारापैकी 7-मयत, 03 बाहेरगांवी, 1 नकार व 1 दवाखान्यात दाखल आहे. तसेच दिनांक 15/11/2024 रोजी घेण्यात आलेल्या 19 गृह मतदानापैकी दिव्यांग (PWD) - 05 व वयोवृध्द (85+)- 11 असे एकुण 16 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला उर्वरित 03 मतदार मयत आहेत. म्हणजेच 242 पैकी 172 वयोवृध्द (85+) व दिव्यांग (PWD) 55 अश्या एकूण 227 मतदार यांनी सदर काला...

आज दिनांक 15/11/2024 रोजी सकाळी 7:30 वाजता मॅरेथॉन "election run" चे आयोजन करण्यात आले यावेळी प्रशासनाचे सर्व अधिकारी,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा श्री भूषण अहिरे श्री विजय बनसोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पाचोरा श्री मंगेश देवरे मुख्य अधिकारी नगरपालिका पाचोरा श्री विनोद कुमावत निवासी नायब तहसीलदार श्री अमोल पाटील नोडल अधिकारी मीडिया सेल श्री समाधान पाटील गटशिक्षणाधिकारी पाचोरा सर्व महसूल अधिकारी महसूल सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद  जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक माध्यमिक  सर्व नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी, तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते

पाचोरा येथे मतदान यंत्रे सिलींग सेंटींगचे कामकाज पुर्ण !

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार 18- पाचोरा विधानसभा मतदार संघासाठी 355 मतदान केंद्रासाठी दिनांक 11/11/2024 रोजी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा येथे 18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील 354+1 मतदान केंद्राकरीता SYMBOL UPLOADING व BU. CU PAIRING चेक कामकाज करण्यात आले. श्री. भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पायोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा, श्री. विजय बनसोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पाचोरा, श्रौमती शितल सोलाट, तहसिलदार भडगांव श्री. रणजित पाटील, नायब तहसिलदार (निवडणूक) व उमेदवार प्रतिनिधी यांचे समक्ष दिनांक- 11/11/2024 रोजी सकाळी 9.50 वाजता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा येथील स्ट्रॉग रुम व्हिडीओ चित्रीकरण करुन उघडण्यात आला. SYMBOL UPLOADING व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कार्यान्वित करणे (उमेदवार निश्चिती) (EVM COMMISSIONING) साठी स्ट्र...

महाराष्ट्र शासन निवडणूक निर्णय अधिकारी, 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा"मतदानाइतके अमुल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकारी आम्हीप्रति, सर्व विभागप्रमूख, पाचोरा व भडगाव तालुका. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, मतदान जनजागृती साठी मॅरेथॉन रन मध्ये सहभागी होणे बाबत..( म.मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे दि.5 नोव्हेंबर 2024 रोजीचे पत्र,)वरीलप्रमाणे शासन पत्रान्वये कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहिर झाली असून दि.20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करण्याकरीता मतदारांमध्ये जनजागृती होण्याकरीता मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.सदर स्वीप कार्यक्रमांतर्गत 18, पाचोरा विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून एम एम कॉलेज चौक, पाचोरा असा - मॅरेथॉन इलेक्शन रन आयोजीत करण्यात आला आहे. या मॅरेथॉन मध्ये आपल्या विभाग / कार्यालय मधील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी होण्यासाठी आपले स्तरावरुन अवगत करावे व सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित राहतील याची खात्री करावी. मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी पांढरा टि शर्ट / शर्ट / पोशाख परिधान करणे आवश्यक राहील याची दक्षता घ्यावी.(भूषण अहिरे)निवडणूक निर्णय अधिकारी,18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा

Image
महाराष्ट्र शासन निवडणूक निर्णय अधिकारी, 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा "मतदानाइतके अमुल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकारी आम्ही प्रति, सर्व विभागप्रमूख, पाचोरा व भडगाव तालुका.  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, मतदान जनजागृती साठी मॅरेथॉन रन मध्ये सहभागी होणे बाबत.. ( म.मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे दि.5 नोव्हेंबर 2024 रोजीचे पत्र,) वरीलप्रमाणे शासन पत्रान्वये कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहिर झाली असून दि.20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करण्याकरीता मतदारांमध्ये जनजागृती होण्याकरीता मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर स्वीप कार्यक्रमांतर्गत 18, पाचोरा विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून एम एम कॉलेज चौक, पाचोरा असा - मॅरेथॉन इलेक्शन रन आयोजीत करण्यात आला आहे. या मॅरेथॉन मध्ये आपल्या विभाग / कार्यालय ...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर आप्पा पाटील निवडून आले तर हा मतदारसंघ दत्तक घेण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाची चिंता करू नका. कारण मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात. येथील एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन ही ही यानिमित्ताने आपल्याला देतो असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी केले.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) भडगाव ता.13: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर आप्पा पाटील निवडून आले तर  हा मतदारसंघ दत्तक घेण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाची चिंता करू नका. कारण मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात. येथील एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन ही ही यानिमित्ताने आपल्याला देतो असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी केले.  -------------- ते महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणात आयोजित सभेत बोलत होते.  डाॅ.श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यावर साडेसात हजार रूपये टाकण्यात आले आहेत. यामाध्यमातून महीलांना सक्षम करण्याचे काम मुख्यमंत्र्यानी केले आहे. या लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात भावा बहीणीच एक वेगळ नात निर्माण झाल आहे. विरोधकांकडून या योजनेची टिंगल करण्यात येत होती. मात्र ज्यांना फक्त 'माझ कुटुंब आणि माझी जबाबद...

मतदार राजानों....सावधान... आपले मत देण्यासाठी केंद्रावर जातांना मोबाइल घरीच ठेवून जा..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) मतदार राजानों....सावधान... आपले मत देण्यासाठी केंद्रावर जातांना मोबाइल घरीच ठेवून जा..! झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांवर गुन्हे दाखल केले लेले आहेत------------------------------------------ लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करताना काहींनी मोबाइलवर ईव्हीएमचे चित्रीकरण केले होते. ते व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग केला गेला होता. असे प्रकार परत होऊ नयेत, याकरिता विधानसभा निवडणुकांमध्ये. मतदान केंद्रावर मतधारकांना  मोबाइलसोबत  प्रवेश बंधनकारक केला गेला आहे.निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याकडे नजरचुक केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काही मतदान स्ळांवर मतदार थेट ईव्हीएमपर्यंत मोबाइल घेऊन गेले होते. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते व्हे. व्हिडीओ व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवले होते. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी भरपूर जणांवर गुन्हा दाखल केला होता. मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आल...

पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जुणू समीकरण असल्याचे मत माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी व्यक्त केले आहे.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा ता.4: पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जुणू समीकरण असल्याचे  मत माजी नगराध्यक्ष संजय गोहिल 1aयांनी व्यक्त केले आहे. पाचोरा शहर हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात गतीने विकसित होणारे शहर बनले असून ते विकासाचे एक मॉडेल ठरेल असा दृष्टिकोन समोर ठेवून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने आम्ही शहराला देखणी रूप देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी सांगितले.  *शहरातील रस्ते DPR  साठी १४६ कोटी*  उत्तर महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पाचोरा शहराची ओळख निर्माण झाली आहे  नगरपरिषद हद्दीतील व नव्याने विस्तारलेल्या शहरातील कॉलनी व वस्ती भागातील रस्त्यांची  काँक्रिटीकरण करण्यासाठी पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून दोन टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला यात पहिल्या टप्प्यातील 42 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून नुकताच पुन्हा 104 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली ...

श्री बालाजी मंदीर संस्थान**रथगल्ली, पाचोरा जि. जळगांव पाचोरा येथील श्री. बालाजी महाराज यांची रथाची यात्रा दिनांक १४.११.२०२४ येत्या गुरुवारी संपन्न होत आहे

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) सांस्कृतिक उत्सव हे आपणांस वैभवशाली इतिहासाचे स्मरण करुन देतात त्यात यात्रा हे उत्सव महत्वाचे असतात आपण उत्सवात सहभागी होतो तेव्हा कळत नकळत आपल्या परंपेरची जोपासना करीत असतो व या सांस्कृतिक परंपरेचा वारसा एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे जात असतो. पाचोरा येथील सुमारे १९० वर्षाची परंपरा असणारा श्री बालाजी महाराजांचा रथयात्रा उत्सव कार्तिक शुध्द चतुदर्शी म्हणजे वैकुंठ चतुदर्शीला असतो या वर्षी सदर रथयात्रा व मिरवणुक उत्सव दिनांक १४.११.२०२४ रोजी गुरुवारी आयोजित केला आहे. श्री बालाजी महाराज यांची मुर्ती रथात बसवुन ढोल ताशे लेझीम यांचे निनादात मिरवणुक ही रथगल्ली विठठल मंदीर रोड तलाठी कार्यालय जामनेर रोड, महात्मा गांधी रोड व परत रथगल्ली अशी काढली जाते. रथ मिरवणुक दुपारी २.०० वाजता सुरु केली जाते व ती रात्री १०.०० वाजता संपते श्री बालाजी महाराजांचा रथ हा दोर बांधुन लोकसमुहाद्वारे श्री बालाजी महाराज की जय या घोषणेच्या निनादात ओढला जातो. मिरवणुकीत शहरातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात या उत्सवाच्या निमित्ताने गांधीचौक,...

लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावू असे म्हणणार्‍या महाविकास आघाडीचा लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. तर आपले महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहीणींना 1500 वरून 2100 रूपये प्रति महीना देऊ असे वचन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा ता.12: लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावू असे म्हणणार्‍या महाविकास आघाडीचा लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. तर आपले महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहीणींना 1500 वरून 2100 रूपये  प्रति महीना देऊ असे वचन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.  -------- ते महायुतीचे पाचोरा-भडगाव मतदार संघाचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत 'विजयी निर्धार' सभेत बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आमच्याकडे देना बँक आहे तर विरोधकांकडे फक्त लेना बँक आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मात्र विरोधक फक्त बोलतात कृतीत आणत नाही..त्यामुळे तुमच्या योजना बंद पाडू असे म्हणणार्‍यांना आपण निवडून द्याल का? असा सवाल त्यांनी केला. याशिवाय लाडक्या बहीणींचा  डिसेंबरचा हप्ता आपले सरकार आल्याबरोबर पुढच्या महीन्यात खात्यात जमा करू. महायुतीने शेतकऱ्यांना वीज बील मोफत केले आहे..तर मुख्यमंत्री सन्मान निधी 6 हजार रूपये देऊन बळीराजाचा सन्मान केला आहे. तर लाडका भाऊ योजनेतून तरूणां...