प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिर...!
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)
जळगाव :
देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती तथा खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष (सुप्रिमो) स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता
हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक चौक, प्रभात चौक, जळगाव येथे होणार आहे.
या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर) यांच्या शुभहस्ते होणार असून, डॉ. के. बी. पाटील व उदयसिंह पाटील (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रवीणसिंह पाटील
(महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना)
तसेच
प्रवीण सपकाळे
(राज्य कार्याध्यक्ष – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई / प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव)
यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांनी सौजन्य सहभाग नोंदवला असून, यामध्ये राजपूत परिवार खान्देश टीम महाराष्ट्र, महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती, विविध फाउंडेशन्सचे प्रतिनिधी, उद्योजक, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभणार असून, गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
देशसेवा, समाजसेवा व मानवतेचा संदेश देणाऱ्या या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे व गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment