Posts

Showing posts from May, 2025

त्रिशताब्दी गौरवोत्सवात “बुद्धिजीवी संमेलन” आणि आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भव्य सत्कार..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित भव्य "बुद्धिजीवी संमेलन" आणि नव्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भव्य स्वागत सोहळ्याने पाचोरा शहरात राष्ट्रनायकांच्या स्मृतींना उजाळा देत नवसंघटनाचे आव्हान पुन्हा एकदा गगनावर पोहोचवले. भाजपा तालुक्याच्या वतीने शुक्रवार, दि. 31 मे 2025 रोजी महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अधिष्ठानाचा समरस संगम पाहायला मिळाला.     या गौरवशाली कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पणाने झाली. सद्गुण, शौर्य आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर कार्यक्रमात वारंवार अनुभवास येत होता. त्यांच्या जीवनमूल्यांपासून प्रेरणा घेत नव्या पिढीला दिशादर्शन करण्याचा संकल्प सर्व स्तरांवरून जाणवला.    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारती...

पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये आई सौ अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त फोटो फ्रेम चे पूजन व पुष्पहार घालून केली मानवंदना...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी माननीय ताईसाहेब अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या फोटो फ्रेम पूजा व पुष्पहार घालून मानवंदना केली त्यावेळी पूजन करताना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब पीएसआय श्री परशुराम दळवी साहेब पीएसआय श्री सोपान गोरे साहेब तसेच सर्व पोलीस स्टॉप व सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले उपस्थित होते.

पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ अतिशय उल्लेखनीय कामगिरी ने आज संपन्न होत आहे...त्यांनी दिला पाचोरा तालुक्यातील शेतकरी बांधवांसह सर्वांना ऋणसंदेश...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी)  ॠणसंदेश :-- दिनांक 14/9/2021 पासून ते आजतागायत एकूण 3 वर्षे 8 महिने आपल्या पाचोरा तालुक्यात अविरत काम करतांना मला खुप खूप आनंद झाल.आज दिनांक 31/5/2025 रोजी बदलीने जळगाव (जामोद), बुलढाणा येथे झाली त्या निमित्त,  ॠणसंदेश  --  यानिमित्त थोडे असे कि, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, प्रगतीची कास धरणारी व विनयशील देखील. त्याचबरोबर सर्व पक्षीय पदाधिकारी व सर्व वृत्त पत्रकार बंधू, संपर्कात आलेले व्यापारी वर्ग, व्यावसायिक वर्ग यांसह, सर्व शासकिय यंत्रणांकडून मला भरभरून साथ-प्रतिसाद मिळाला. या कालावधीत तालुक्यात अनेक शेतकर्‍यांसंबंधीत विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध कृषि क्षेत्रातील कंपन्या, प्रामुख्याने निर्मल सीड कंपनी, ईफको, आरसीएफ, विद्यापीठ यांच्यासोबत विविध शेतकरीभिमुख उपक्रम राबविण्याची मिळालेली अविस्मरणीय संधी, त्याला तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देणारी प्रसार माध्यमे, प्रगतशील शेतकरी,विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्यासोबतची जवळीकता मनसुकावणारी होती.त्यात सर्वार्थाने ओतप्रोत भरलेले सर्व ...

पाचोऱ्यातील बंद पडलेली बँक एटीएम सेवा नियमितपणे करण्याकरिता पत्रकार, बँक व्यवस्थापक आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी) शहर तसेच तालुक्यामधील अनेक बँकांच्या एटीएम सेवा नियमित होण्यासाठी ग्राहकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि नागरिकांना अत्यावश्यक त्या बँकिंग सुविधा वेळेमध्ये, सुरक्षित व सुलभ पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने दिनांक 30 मे 2025 रोजी उपविभागीय कार्यालय, पाचोरा येथे एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस पाचोरा तालुक्यामधील अनेक पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक वृत्तपत्रांचे आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक आणि प्रतिनिधी, व सर्व संबंधित बँकांचे व्यवस्थापक किंवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषविले. उपविभागीय अधिकारी (SDO) पाचोरा भाग यांच्या प्रमुख उपस्थिती देऊन ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. पत्रकारांनी 29 मे 2025 रोजी दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला आमदार किशोर आप्पा पाटील व उपविभागीय अधिकारी यांचे उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि बँक व्यवस्थापकांच्या वतीने स्वाग...

युवा शेतकरी" कुषी संवाद मेळावा हा पाचोरा तालुक्यातील मौजे.राजुरी संपन्न यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) "युवा शेतकरी ", कृषी संवाद मेळावा,  हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पाचोरा-भडगाव मतदार संघातील पाचोरा तालुक्यातील मौजे राजूरी येथे  मोठ्या संख्येने संपन्न करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित तरूण शेतकर्‍यांना मार्गदर्शन केल्यानंतर पाचोराभडगाव चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.किशोर आप्पासाहेब पाटील  यांनी कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांच्या हस्ते तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव  यांचा जाहीर सत्कार केला.याप्रसंगी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचे उपस्थित शेतकर्‍यांना यावेळी मार्गदर्शन लाभले. पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचोरा शहरातील प्रभाग क्र. 8 मध्ये बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न....!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा, ता. 30 मे 2025 – आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 8 मध्ये बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट आणि गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटपासाठी मोफत ऑनलाईन नोंदणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात सुमारे 140 ते 150 बांधकाम कामगारांनी नोंदणी केली. याआधी पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील वरखेडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे किट वाटप सुरु होते. मात्र, पाचोरा शहरातील कामगारांची नोंदणी संख्या पाहता दोन ते तीन दिवसांत सर्वांना नोंदणी करून वाटप करणे शक्य नसल्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय नोंदणी करून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर प्रभाग क्रमांक 8 मध्ये दिनांक 29 मे 2025 रोजी गुरुवार, सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत, शिवतीर्थ, जय किसान कॉलनी, पाचोरा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात कामगार भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. पूर्वी वरखेडी येथे नोंदणीदरम्यान कामगारांची मोठी गर्दी आणि तणावपूर्ण घटना घडत असल्याने तिथ...

जमिनीत रुजून आभाळाला गवसणी घालणारा माणूस!!

Image
भडगाव प्रतिनिधी      डोक्यावर ओझं घेऊन स्टॅंडवर उभा असलेल्या सर्वसामान्य चेहऱ्याच्या, रापलेल्या वर्णाच्या एका माणसाचा फोटो सोशल मीडियावर बघायला मिळाला, तुम्ही म्हणाल यात काय विशेष?? सर्वसामान्य माणसाचं जीवन असच तर असतं!! पण थांबा... मत व्यक्त करायची घाई करण्याआधी थोडं गुगल सर्च करून बघा.. की वर्ड वापरा... 'चैत्राम पवार'!!    लाखो मोटिवेशन स्टोरीज ज्याच्या कर्तृत्वापुढे फिक्या पडतील असे 'पद्मश्री चैत्राम पवार'!! या पद्मश्री विजेत्याची सत्यकथा सुरू होते धुळे जिल्ह्यातील 'बारीपाडा' या अतिदुष्काळी गावतून... गाव म्हणावं तर गावात वस्ती कायम स्वरूपी नाही, पाण्याची वानवा, रोजगार नाही, शिक्षण नाही, सततचे शोषण या दुष्टचक्रात अडकेलला कोकणा भिल्ल या आदिवासी समाजाची ही कथा.  असह्य परिस्थिती, साधारण पाऊस थांबला की ऊसतोडणी किंवा मिळेल ते काम करत पिढ्यानपिढ्या फक्त 'जिवंत' राहण्यासाठी केलेला संघर्ष, पोटाची भ्रांत त्यात शिकणार कुठून? गावात तर शाळा सुद्धा नव्हती!!      या सगळ्या परिस्थितीवर मात करणारा तारणहार या ठिकाणी जन्माला आला... चै...

ट्रॅव्हलमधून मोबाइल चोरणा-यास अवघ्या दोन तासात पाचोरा पोलिसांनी घेतले जाळ्यात.... कौतुकास्पद कामगिरी...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी: शर्मा ट्रॅव्हल्समधून प्रवाशाचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह दोन तासात पोलिसांनी अटक केली. बारा तासात संशयिताविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांच्या या धडक कारवाईचे प्रवाशांमधून कौतुक करण्यात येत आहे. 26 में सोमवारी  रात्री 9:00 सुमारास फिर्यादी कौस्तुभ सुनील शिंपी (वय २२, रा. कृष्णापुरी, पाचोरा) हा त्याच्या मित्रासह शर्मा ट्रॅव्हल्सने कल्याणहून पाचोरा येण्यास निघाला. प्रवास करताना 27 में मंगळवारी  सकाळी 4:15 ते 6:30 दरम्यान शर्मा ट्रॅव्हल्समधून सीट क्र.5 आणि क्रं.6 येथून शिंदे इंटरनॅशनल स्कूलसमोर, पाचोरा येथे फिर्यादी व त्याचा मित्र यांचा 80 हजार रुपये किमतीचा आयफोन व 60 हजार रुपये किमतीचा मोबाईल, असे एकूण एक लाख 40 हजार रुपये किमतीचे मोबाईल हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवले. यासंबंधीची फिर्याद पाचोरा पोलिसात दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच अवघ्या 2 तासात आरोपी अन्वरखान माजीद खान (वय वर्षं 21,...

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युवा शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी)  पाचोरा आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व्हावे तसेच शेतीमध्ये उदासीनता आलेल्या तरुण शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळावी,त्यामधून कृषी उद्योजक निर्माण व्हावा तसेच शेतकरी कृषी प्रक्रिया उद्योगच्ची निर्मिती व्हावी या हेतूने पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने युवा शेतकरी कृषी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे.शुक्रवार दि.३० मे २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता तालुक्यातील राजुरी येथे हे कृषी विषयक चर्चासत्र संपन्न होणार आहे.यामध्ये पेरणीपूर्व तयारी पिकांची निवड,मशागत, काढणी,साठवण व विक्री आदी बाबींवर मार्गदर्शक चर्चा यावेळी होणार आहे. विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांचे युवा शेतकऱ्यांना उद्देशून बहुमूल्य मार्गदर्शन होणार असून वाडी शेवाळे येथील शेतीनिष्ठ शेतकरी सुनील रंगराव पाटील यांचे कृषि विषयक चर्चासत्र तसेच उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण पाटील, उपक्रमशील शेतकरी समाधान मालकर मयूर वाघ यांचे अनुभव कथन प्रसंगी होणार आहे.कृषी क्षेत्र...

शहादा वाहतूक नियंत्रण आगार तर्फे श्री नितीन सुदाम कोळी यांना "समाजसेवक पुरस्कार" जाहीर...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (शहादा प्रतिनिधी) जय जिजाऊ जय शिवराय 🚩 श्री.नितीन सुदाम कोळी वाहतूक नियंत्रण शहादा आगार "समाजसेवक पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🌸 *वीर शिवछत्रपती संघटना व एस.आर एन.फिल्म प्रोडक्शन विदर्भ गौरव पुरस्कार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, तसेच समाजसेवा क्षेत्रातील योगदानासाठी प्रदान केला जातो. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाची आणि समाजातील योगदानाची पोचपावती आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! "आपले कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरो!"🌟

धरणगाव तालुक्यातील नांदेड गावातील तरुणावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील नांदेड गावातील तरुणावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल...* याबाबत सविस्तर वृत्त असे की धरणगाव तालुक्यातील नांदेड या गावी दिनांक 5 मे 2025 रोजी रात्री 11.30 वाजता आदिवासी कोळी मल्हार जमातीच्या महिलेवर शिवीगाळ लज्जास्पद वागणूक व जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली असा प्रकार आरोपी  हर्षल प्रकाश पिंपळकर व मंगलबाई प्रकाश पिंपळकर यांच्याकडून करण्यात आला.  झालेला प्रकार आदिवासी महिलेने गावातील पोलीस पाटील यांना सांगितला त्यावेळी पोलीस पाटील यांनी सांगितले की आपण पोलीस स्टेशनला जाऊन योग्य ती तक्रार दाखल करा ..  याबाबत 6 मे 2025 रोजी धरणगाव पोलीस स्टेशन येथे येऊन आरोपीने माझ्याबरोबर केलेली लज्जास्पद वागणूक संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल केला सदर गुन्हा  भा.न्या.स. कलम ७४,७८,२९६,३५१(१),३५१ (२), ३५२,११५ (२) सह अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चा सुधारीत अधिनियम सन २०१५चे कलम ३ (१) (r),३(१) (s), ३(२) (v-a),३(१) (W) आदिवासी कोळी महिलेला त्रास दिल...

पाचोरा पत्रकारांच्या पुढाकाराने जनतेच्या समस्या ऐकल्या; आ. किशोरआप्पा पाटील यांच्या आदेशाने उद्या सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी — पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा आणि दैनंदिन गरजांशी निगडित असलेला विषय म्हणजे एटीएम सेवा आणि बँक व्यवहारांतील सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणी. या गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा शहरातील पत्रकारांनी पुढाकार घेतला असून, दिनांक 29 मे रोजी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांचे प्रतिनिधी व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.     या निवेदनाची दखल घेत, आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तत्काळ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने कृती सुरू केली आहे. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात उद्या दिनांक 30 मे रोजी पाचोरा शहरातील सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत बँक व्यवस्थापक यांच्यात थेट संवाद साधून समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.   सध्याची परिस्थिती पाहता, ...

ए.टी.एम. बंद मुळे शेतक-यांसह सामान्य नागरीक त्रस्त,पत्रकार तात्काळ सुरू करण्यासाठी आंदोलनाच्या मार्गावर...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) आजच्या प्रगत युगात सगळीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून आर्थिक व्यवहारात ए. टी. एम. हे महत्त्वाचे साधन मानले जात आहे. कारण आजच्या परिस्थितीत वाढत्या चोऱ्या, लुटमार, खिसे कापणारांची संख्या वाढल्याने यापासून बचाव करण्यासाठी सोपा आणि साधा उपाय म्हणजे खिशात पैसा न बाळगता पाहिजे तिथे, पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध करुन देणारे साधन म्हणजे ए. टी. एम.‌ म्हणून आजच्या परिस्थितीत धनदांडग्या पासून तर सर्वसामान्य नागरिक आता ए. टी. एम. चा वापर करायला लागले आहेत. असे असले तरी हे ए. टी. एम. स्वयंचलित यंत्र असल्याने कधी, कधी तांत्रिक बिघाड होतात. परंतु असे बिघाड झाल्यास संबंधित बॅंकानी तातडीने ए. टी. एम. मशिनची दुरुस्ती करणे वेळेवर पैसे भरणे इत्यादी गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील ज्या, ज्या ठिकाणी ए. टी. एम. मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्या पैकी काही ठिकाणचे ए. टी. एम. मशिन बऱ्याचशा दिवसांपासून बंद पडले आहेत. यामुळे ए. टी. एम.‌ चा वापर करणाऱ्या सर्वच नागरिकांना मोठी अडचण ...

सर्वत्र हवशी ट्रेंडच्या काळोखात,एक 'आदर्श' प्रकाश..,!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) संपूर्ण महाराष्ट्रात लग्न,हुंडा,विवाहितेला आर्थिक मागणीमुळे छळ,कर्मकांड रूढी परंपरेत अडकून घरातील नवीन मुलीवर अनाठायी परंपरेच्या नावाने मनुवादी साखळदंड अश्या बातम्या ऐकू येत असतांनाच. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एक चांगली बातमी कानी पडते आणि समाजात ऊर्जा देऊन जाते. "उच्चशिक्षित तरुण तरूणीचा आदर्श असा शिवविवाह" पुरोगामी विचारांचा पगडा असलेला तरुण अभियंता वर तेजस मंगेश पाटील (देवरे) रा.बोरणार ह.मु. पाचोरा आणि वधू M.Sc B.ed झालेली प्राध्यापिका तरुणी प्रियंका पद्माकर चौधरी (भदाणे) रा.कळमसरा ता.पाचोरा. लग्न कार्यात अनाठायी गरज नसलेले खर्च टाळून व इवेंट न करता सुद्धा साधा सरळ पारिवारिक सोहळा करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. महात्मा ज्योतिबा  फुले सवित्रिमाई फुले यांच्या सत्यशोधक विवाहपद्धती प्रमाणेच मराठा सेवा संघाने सांगितलेल्या शिवधर्मानुसार शिव विवाह संपन्न झाला. यात विशेष म्हणजे कुठलाच प्रकारचा हुंडा नको ही अट ठेवली जाते ती मुलाकडून.आणि आदर्श विवाह असल्याचे मुख्य कारण मुलीचा आधी घटस्फोट झालेला असतांन...

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये दिमाखात प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला, पाचोरा-भडगाव राजकारणात नवा सत्ताबदलाचा सूर...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पाचोऱ्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवलेले प्रतिष्ठित नेते दिलीपभाऊ वाघ यांनी आज मंगळवार दिनांक २७ मे रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांना नव्याने कलाटणी दिली. महाराष्ट्रातील भाजप मुख्यालयात झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्याला भाजपचे वरिष्ठ   भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन , विधानसभा सभापती राम शिंदे , रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री , आमदार मंगेशदादा चव्हाण ,जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.    दिलीपभाऊ वाघ यांच्या या प्रवेशाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले असून राजकीय चर्चांना आणि अपेक्षांना नवे वळण लाभले आहे. गेल्या काही महि...

काल २७ मे मुंबईत माजी आमदार दिलीप वाघ यांचा प्रचंड कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश, पाचोरा-भडगावमध्ये राष्ट्रवादीचा गड नाहीसा झाला...?

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) मुंबई, २७ मे : गेल्या अनेक महिन्यांपासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपात जाणार असल्याचे चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. दरम्यान, आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून दिलीप वाघ यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, विधानसपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दिलीप वाघ भाजपमध्ये दाखल – माजी आमदार दिलीप वाघ यांनी मुंबईत जाऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. दरम्यान, आज मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयत त्यांचा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, माजी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांच्यासह, अभिमन्यू पाटील, राजेंद्र पाटील, भागवत महालपुरे, रणजित अभिमन्यू पाटील, सूचिता वाघ, ज्योती वाघ यांच्य...

दोंडाईचा येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा शैक्षणिक उपक्रम....!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल (दोंडाईचा प्रतिनिधी) दोंडाईचा येथील कृपा शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय विधायक सेवा समिती द्वारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने शहरातील इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत व विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या संपूर्ण शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील 75 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.  सदर कार्यक्रम हा 25 मे 2025 वार रविवार रोजी सकाळी दहा वाजता हस्ती पब्लिक स्कूल च्या भव्य सभा मंडपात ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हस्ती पब्लिक स्कूलचे व हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन हे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शहरातील हृदयरोग तज्ञ डॉ. अनिकेत मंडाले, स्री रोग  तज्ञ डॉ. दिलीप पाटील गटशिक्षणाधिकारी डी एस सोनवणे, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पीआय श्रीकृष्ण पारधी, क्रांतीज्योती सावित्रीबाई शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्रसिंह गिरासे, कार्याध्यक्ष गजेंद्र कानडे, धुळे जिल्हाध्यक्ष  जे पी पवार ,संभाजीनगर जिल...

उद्या दिनांक 27 मे रोजी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे भाजप प्रवेशाचे मुहूर्त निश्चित...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) उद्या दिनांक 27 मे रोजी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे प्रवेशाचे मुहूर्त निश्चित झाले माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होताच संपूर्ण राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींनी हा निर्णय राजकीय गरज म्हणून पाहिला, तर काहींनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून झालेला बदल मानला. काही राजकीय निरीक्षकांनी याला स्वार्थ म्हणून हिणवले, तर काही समर्थकांनी याला राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याची गरज असल्याचे मान्य केले. परंतु, या निर्णयामागील वस्तुस्थिती, राजकीय समीकरणे आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेतल्यास, तो केवळ एक राजकीय तडजोड नसून पुढील राजकीय प्रवास सुसह्य करण्यासाठीचा रणनीतिक विचार असल्याचे स्पष्ट होते.माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावरून अनेकांनी आपापल्या परीने विश्लेषण सुरू केले. काहींना आश्चर्य वाटले की, एका समाजवादी कुटुंबातून आलेले आणि कधीही हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंध नसलेले दिलीपभाऊ भाजपमध्ये कसे सामील होऊ शकतात? काहींनी त्याचा अर्थ स्व...

तिरंगा रॅली🇮🇳 द्वारे भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम भारत माता की जय च्या घोषणांनी पाचोरा नगरी दुमदुमली...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:-  कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या हल्ल्याबद्दल मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांच्या झालेल्या घटना भारतीय सैनिकांनी सडेतोड जवाब देऊन भारतही कमजोर नाही हे सिद्ध करून दाखविले त्यांच्या या चांगल्या कर्तुत्वावर भारतातील नागरिकांनी अनेक ठिकाणी तिरंगा🇮🇳 रॅली काढून त्यांच्या समर्थासाठी पाचोरा शहरातून भारत डेअरी स्टॉप येथून भव्य अशी तिरंगा🇮🇳 रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये  जवळजवळ 1000 ते 2000 फूट असा तिरंगा ध्वज🇮🇳 घेऊन पाचोरा शहरातील तरुण वर्ग यांनी तसेच महिला यांनी तिरंगा ची रॅली कृष्णापुरी ,आठवडे बाजार, रथ गल्ली,गांधी चौक, जामनेर रोड,श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हुतात्मा स्मारक येथे त्याचा समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील, माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्यश्री पदम बापू पाटील एडवोकेट जेडी काटकर एडवोकेट प्रवीण पाटील पिटीसी चेअरमन श्री संजय नाना वाघ शिव...

पाचोरा पिपल्स बॅंकेच्या ATM चे जनतेत महत्वपूर्ण स्थान...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)      (वरखेडी प्रतिनिधी दिलीप पाटील)  मागील १५-२० वर्षापासून प्रतिक्षीत असलेले ATM मागील एक-दीड वर्षापासून सुरू झाले व थोड्याच दिवसात जनतेत सर्वात लोकप्रिय झाले. जिथे इतर ATM सतत रोखीच्या अभावी बंद असतात तिथे पाचोरा पिपल्स बॅंकेचे ATM कायम सुरु राहते. त्यामुळे मागील ७-८ दिवसात जेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळे ATM बंद होताच प्रत्येकाला अडचण निर्माण झाली. वास्तविक ATM व AC हे वारंटी मध्ये असल्याने कंपनी कडून पार्ट यायला उशीर होत असतो व ते जरी स्वाभाविक असले तरी लोकांच्या अपेक्षा बॅंकेकडून वाढलेल्या असताना अडचणीचे ठरते. असो. कालपासून बॅंकेकडून ATM सेवा पूर्ववत सुरू झाली असून पाचोरा पिपल्सबॅंकेने पाचोरा व्यतिरिक्त शेंदुर्णी, नगरदेवळा व नाशिक येथे सुद्धा ATM सुविधा सुरु केली आहे व जामनेर व जळगाव येथे देखील लवकरच ATM सुरू होणार आहे . बॅंकेची मोबाईल बॅंकिंग व IMPS सेवा सुरू झालेली असून UPI व QR CODE चे टेस्टिंग सुरू आहे.  बॅंकेने वरील सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून जिल्ह्यातील ईतर अग्रसर असलेल्या बॅंकेच्या तुलन...