खमताने प्रकरणाला न्याय – पाचोरा नाभिक समाजाचे तहसील कार्यालयात निवेदन...!



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा : सटाणा तालुक्यातील खमताने येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचारप्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात तातडीने चालवून आरोपीला कठोरतम शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पाचोरा नाभिक समाजाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस निरीक्षक, पाचोरा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.

या घटनेने संपूर्ण समाजमन संतापले असून, न्याय प्रक्रियेला गती मिळावी आणि पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा, अशी सामूहिक मागणी या निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

निवेदन देताना पाचोरा नाभिक समाजाचे अध्यक्ष रमेश चुडामण जाधव, सचिव विकास शिरसागर, कृष्णराव वाघ, प्रदीप गायकवाड, प्रमोद सन्नांसे, भगवान बिडकर सर, मोहित जाधव, कैलास आहिरे, रतन अहिरे, संदीप अहिरे, जगन्नाथ सोनवणे, राहुल जाधव, गणेश जगताप, योगेश न्हावी, सोपान सोनवणे, राजेश वखरे, शंकर पवार, सुनील अहिरे, ज्ञानेश्वर वाघ, वाल्मीक वाघ, किशोर सोनवणे, संदीप सोनवणे सर, गणेश जगताप, नारायण महाले, लखन जगताप, किरण श्रीवास, संतोष महाले, प्रकाश मानकरे, हर्षल जाधव व सौ. शोभा जाधव तसेच पाचोरा शहर व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

न्यायाची अपेक्षा, गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही सामूहिक भूमिका महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..