Posts

Showing posts from August, 2026

सोयगाव शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी तर्फे आयडियलस्टडी ॲप चे वितरण

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध‌ न्युज  सोयगाव.....  रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे सोयगाव  येथील कै बाबुराव काळे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी ॲप चे वितरण नुकतेच करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक  निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रमाला रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट सेक्रेटरी डॉ. प्रशांत सांगडे, असिस्टंट गव्हर्नर भरत सिनकर, सेक्रेटरी एन्क्लेव्ह डॉ. मुकेश तेली, ज्येष्ठ रोटेरियन चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक तथा माजी क्लब अध्यक्ष प्रा. डॉ.पंकज शिंदे, उप मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस,  योगेश काळे, अंजली कथलकर, आशा पंडित, सागर पाटील, प्रणय कुलकर्णी, संजय डापके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत येथील दहावीच्या ४० विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त आयडियल स्टडी ॲप मोफत वाटप करण्यात आले.   याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोटरी क्ल...

विद्यार्थिनींच्या स्वनिर्मित राख्यांचे सादरीकरण

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज  पाचोरा (प्रतिनिधी ) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा  विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पकतेने व कलाकौशल्याने तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थिनींनी विविध रंग, धागे, मोती, सजावटीच्या वस्तू यांचा वापर करून सुंदर व नाविन्यपूर्ण राख्या तयार केल्या होत्या. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला व कल्पनाशक्तीला वाव मिळाला. तसेच ‘स्वनिर्मिती, स्वावलंबन आणि बंधुभाव’ या मूल्यांचा सुंदर संदेश विद्यार्थिनींना मिळाला. सर्व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांच्या कलाकृतींचे कौतुक करण्यात आले. त्यांना कलाशिक्षक प्रमोद पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक एन. आर.पाटील. पर्यवेक्षिका अंजली गोहिल, महेश कोंडीन्य, प्रीतमसिंग पाटील, सुबोध कांतायन, ज्योती पाटील मॅडम.यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे   कौतुक केले.

जि.प.प्रा.शाळा मोंढाळे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज ​मोंढाळे (प्रतिनिधी):  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोंढाळे येथे रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात आणि स्नेहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ​समारंभा दरम्यान शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या विद्यार्थी बंधूंचे औक्षण करून आणि पूजा करून त्यांच्या मनगटावर प्रेमाचे प्रतीक असलेली राखी बांधली. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी भावा-बहिणीच्या पवित्र नात्याची जपवणूक करत आपुलकीचा संदेश दिला. ​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि सर्व उपशिक्षक बंधू-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

जि.प.प्राथमिक शाळा, मोंढाळे ता. पाचोरा जि. जळगाव येथे स्वच्छत्ता अभियानात पालकांचा सक्रिय सहभाग.

Image
पाचोरा -येथील पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये शनिवारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गट विकास अधिकारी के बी अंजने, गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शना शाळा स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.                                                                                        केंद्र प्रमुख-श्री.अनिल वराडे, मुख्याध्यापक श्री.सुनिल पाटील, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रा.पं. चे स्थानिक पदाधिकारी, शिक्षण प्रेमी नागरिक, उत्साही तरुण वर्ग यामध्ये सहभागी झाले. जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्वतः हाती झाडू घेऊन सफाई केली.

ए.टी.डी. द्वितीय वर्षात कु.भूमी मनोज पाटील राज्यातून प्रथम;...‘माँ से बेटी सवाई’ उपक्रमांतर्गत लिनेस क्लब पाचोरा तर्फे सत्कार

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज बालपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासत, वडिलांकडून मिळालेल्या कलेच्या वारसाला मेहनत, जिद्द आणि चिकाटीची जोड देत कु. भूमी मनोज पाटील हिने ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, तिच्या यशाचा गौरव म्हणून लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत तिचा सत्कार करण्यात आला. भूमीचे माध्यमिक शिक्षण श्री. गो से हायस्कूल, पाचोरा येथे पूर्ण झाले. शालेय जीवनापासूनच तिच्या अंगी असलेली चित्रकलेची आवड आणि कलागुण तिने जोपासले. विशेष म्हणजे, लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या फिनिक्स अकॅडमीची भूमी विद्यार्थिनी होती. विद्यार्थीदशेपासूनच तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. भूमीला चित्रकलेचा वारसा तिचे वडील पेंटर मनोज पाटील यांच्याकडून मिळाला. तिचे वडील साईन बोर्ड पेंटर असल्याने बालपणापासूनच ती त्यांची पेंटिंगची कला जवळून पाहत होती. सुरुवातीला कार्टून व स्केच काढण्यापासून तिच्या चित्रकलेच्या प्र...

पाचोरा तालुक्यात शाळा स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न...! दीडशे जिल्हा परिषद शाळांसह सत्तर खाजगी शाळांचा उत्स्फूर्त सहभाग...!

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज पाचोरा -येथील पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये शनिवारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गट विकास अधिकारी के बी अंजने, गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख, विशेष शिक्षक, गट साधन केंद्र कर्मचारी यांचेसह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, शिक्षण प्रेमी नागरिक, उत्साही तरुण वर्ग यामध्ये सहभागी झाले. गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी बांबरुड राणीचे गावात माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू आणि मराठी शाळा येथे स्वतः हाती झाडू घेऊन सफाई केली.पाचोरा तालुक्यातील खाजगी शाळांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.जि प शाळांमधील उपलब्ध भौतिक सुविधाचा आढावा घेण्यात आला असून एकत्रित अहवाल जिल्हा परिषद जळगाव कडे देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा विभागाचा निर्धार असून स्पेलिंग बी स्पर्धा, शिष्यवृत...

🇮🇳जवानांच्या मनगटावर राखी; राष्ट्रसेवेला माणुसकीचा मानाचा मुजर....! सबला उत्कर्ष फाउंडेशनचा अनोखा रक्षाबंधन सोहळा; एनसीसी जवानांना राखी बांधून मिठाईचे वाटप

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज छत्रपती संभाजीनगर : देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सबला उत्कर्ष फाउंडेशन, पडेगाव यांच्या वतीने रक्षाबंधन दिनानिमित्त एनसीसी जवानांना राखी बांधून व मिठाई खाऊ घालत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. मीरा नगर, पडेगाव येथे झालेल्या या उपक्रमातून राष्ट्रसेवेला सलाम करत जवानांप्रती असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सबला उत्कर्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री राहुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महिला सदस्यांनी ५० MH, ५-१-५७, NCC भवन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहून एनसीसी जवानांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. यावेळी सुभेदार मेजर गिरीशचंद्र साहिब, नायब सुभेदार उमेद साहिब, माजी सुभेदार बशीर साहिब, माजी सुभेदार इंगळे साहिब, माजी हवालदार गणेश ढेपळे साहिब तसेच लिपिक मयूर कुलकर्णी यांना राखी बांधून मिठाईचे वाटप करण्यात आले. उपस्थित जवानांना रक्षा...

दिव्यांगांचे अनुदान बंद होण्यामागे नेमके कोण जबाबदार? कागदपत्रांतील त्रुटी तपासा; अफवांवर विश्वास ठेवू नका!संजय गांधी कार्यालयाला दोष देण्यापूर्वी आधार, बँक खाते, UDID, KYC आणि हयातीचा दाखला तपासा; दिव्यांग मित्र परमेश्वर भाऊंचा स्वानुभवातून महत्त्वपूर्ण संदेश

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज पाचोरा : पाचोरा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांचे संजय गांधी निराधार अनुदान गेल्या चार, सहा, आठ महिन्यांपासून किंवा काहींचे वर्षभरापासून बंद असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र, अनुदान बंद झाले म्हणून थेट संजय गांधी कार्यालयाला दोष देण्याऐवजी संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची व बँक खात्याची स्थिती तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर भाऊ यांनी केले आहे. शासकीय योजनांचे अनुदान DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने आधार, बँक खाते, NPCI, UDID, दिव्यांग प्रमाणपत्र, KYC तसेच इतर कागदपत्रांमध्ये तफावत असल्यास अनुदानाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. अनुदान अडकण्याची संभाव्य प्रमुख कारणे लाभार्थ्यांनी खालील बाबी तपासून घेणे आवश्यक आहे— आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणे. बँक खाते आधारशी लिंक अथवा NPCI/DBT सक्रिय नसणे. UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्राशी आवश्यक आधार/मोबाईल तपशील अद्ययावत नसणे. UDID संबंधित KYC प्रलंबित असणे....

“रक्षण मागणारी बहीण नव्हे, रक्षण करणारी बहीण व्हायचंय!”; खाकी वर्दीतील ‘राखी’चं एपीआय कल्याणी वर्मा मॅडम यांचं भावस्पर्शी वचन...

Image
राजेंद्र खैरनार  मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज पिंपळगाव हरे.(पाचोरा तालुका) : रक्षाबंधन म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि संरक्षणाचं अतूट नातं. मात्र, या नात्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत “रक्षण मागणारी बहीण न राहता, रक्षण करणारी बहीण व्हायचंय”, असा हृदयस्पर्शी संदेश पिंपळगाव-हरेश्वर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिला आहे. रक्षाबंधन हा केवळ रक्ताच्या नात्यांचा सण नसून, विश्वास, माणुसकी, आपुलकी आणि परस्पर संरक्षणाच्या भावनेने माणसांना जोडणारा पवित्र धागा आहे, अशी भावना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केली आहे. लहानपणी राखी पौर्णिमेला भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्याकडून संरक्षणाचे वचन घेणारी बहीण मोठी झाल्यावर समाजातील वास्तवाकडे पाहते आणि तिच्या मनात एक वेगळीच जाणीव निर्माण होते. “रक्षण मागणारी बहीण न राहता, रक्षण करणारी बहीण व्हायचे,” ही भावना मनात घेऊन खाकी वर्दीच्या माध्यमातून समाजसेवेची जबाबदारी स्वीकारल्याचे कल्याणी वर्मा यांनी आपल्या संदेशातून अधोरेखि...

नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात; जळगाव जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
संपादक : राजेंद्र खैरनार, सत्य शोध न्यूज, पाचोरा जळगाव : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक व नागरिक तेथे अडकले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्या वतीने माहिती संकलनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची अचूक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी तातडीने संबंधित ऑनलाइन लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. रोहन घुगे यांनी केले आहे. 🔗 माहिती नोंदविण्यासाठी लिंक https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांची माहित...

🌙 ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ : सेवा, प्रेम आणि माणुसकीचा संदेश 🌙

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज आज सहारा फाउंडेशन, पाचोरा यांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ च्या मुबारक प्रसंगी कालिंदीबाई मतिमंद विद्यालयात एक सुंदर आणि माणुसकीने भरलेला उपक्रम राबविण्यात आला. पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद ﷺ यांच्या विलादत-ए-मुबारकच्या आनंदानिमित्त आज मतिमंद आणि गतिमंद विद्यार्थ्यांसोबत काही वेळ घालविण्यात आला. विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या खाण्या-पिण्यासाठी आवश्यक असलेल्या काही वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या प्रसंगी सहारा फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. हजरत मुहम्मद ﷺ यांनी आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या लोकांना मदत करणे, अनाथ आणि गरजूंची काळजी घेणे, गरीबांना मदत करणे तसेच शेजारी उपाशी असेल तर त्याला जेवण देणे, अशी माणुसकीची शिकवण दिली आहे. याच पवित्र शिकवणींवर अमल करत आज या निरागस विद्यार्थ्यांसोबत काही वेळ घालविण्याची संधी मिळाली. हे विद्यार्थी आपल्या प्रेमाचे, आपलेपणाचे आणि जिव्हाळ्याचे खरे हक्कदार आहेत. ❤️ जात-पात, धर्म आणि लिंग यापलीकडे जाऊन माणुसकीची सेवा करणे हेच खऱ्या अर्थाने नेक आणि चांगले कार्य आहे....

आमदार किशोर आप्पांच्या कार्याची भुरळ; चिमुकल्यांनी घेतली आमदारांची आवर्जून भेट..

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा  मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विविध विकासकामांची आणि जनसंपर्काची चर्चा मतदारसंघात सातत्याने होत असताना, त्यांच्या कार्याची भुरळ आता चिमुकल्यांनाही पडल्याचे भावनिक चित्र नुकतेच पाहायला मिळाले. पाचोरा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती श्री. प्रमोद सोनार यांच्या कन्या युक्ता प्रमोद सोनार व मुक्ता प्रमोद सोनार, तसेच प्रसिद्ध डॉक्टर श्री. दिनेश सोनार यांचे पुत्र श्रीराज दिनेश सोनार व दिग्विजय दिनेश सोनार यांनी आप्पासाहेब श्री. राजाराम नागो सोनार यांच्या नातवंडांसह आमदार किशोर आप्पा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चिमुकल्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांचे स्वागत केले. या भेटीमुळे उपस्थितांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा, नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष आणि मतदारसंघातील जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याबद्दल नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाल्याच...

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न....! खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या पालक मेळाव्यात पालक भावुक...!

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज  पाचोरा( प्रतिनिधी)   पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,श्री. गो.से.हायस्कूल,पाचोरा येथे 24 ऑगस्ट सोमवार रोजी येथील कलादालन येथे सकाळी दहा वाजता मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा  उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेतील शिक्षक रुपेश पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात ईशास्तवानाने केली. पर्यवेक्षक महेश कौडिण्य यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना गतवर्षात शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम सांगितले तसेच विद्यार्थी गुणवत्ता विकास व्हावा म्हणून पालकांच्या सहभागाची देखील अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एन. आर. पाटील. यांनी शाळेतील विविध उपक्रम,स्पर्धा परीक्षा यांची माहिती देताना "माझी  शाळा, सुंदर शाळा" उपक्रमात  विद्यालयाने तालुक्यातून प्रथम बक्षीस मिळवले  असल्याचे सांगितले. पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे  आवाहन त्यांनी केले. व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक महेश कौं...

महागाईच्या झळा; रोजंदारी वाढविण्याची मागणीकामगारांना ७५०, कंत्राटी कामगारांना ९०० रुपये रोज देण्याची मागणी

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज पाचोरा : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे. तेल, साखर, धान्य, गॅस, कपडे, शैक्षणिक साहित्य, आरोग्य व प्रवासाचा खर्च वाढल्याने गोरगरीब कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. या पार्श्वभूमीवर महागाईला तोंड देण्यासाठी कामगारांच्या रोजंदारीत वाढ करण्याची मागणी पाचोरा येथील गणेश जनार्दन शिंदे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. किराणा, कापड, फर्निचर, हॉटेल, मॉल, गॅरेज, सफाई, घरकाम, बांधकाम, हमाली यासह विविध असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांना आठ तासांच्या कामासाठी किमान ७५० रुपये रोजंदारी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांसाठी किमान ९०० रुपये रोजंदारी निश्चित करावी. तसेच कामगारांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळण्यासाठी पीएफ आणि ईएसआयची सुविधा कायमस्वरूपी लागू करावी, अशी मागणीही करण्य...

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल; ए.व्ही. जाधव यांना महाराष्ट्र इन्स्पायर अवॉर्ड २०२६

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा  मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज पाचोरा : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य करून कृषी विकासासाठी योगदान देणारे पाचोरा येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. अशोक विश्राम जाधव (ए.व्ही. जाधव) यांचा राष्ट्रीय स्तरावरील ‘महाराष्ट्र इन्स्पायर अवॉर्ड २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. नाशिक येथे १९ ऑगस्ट २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, शेतकऱ्यांसाठी केलेले मार्गदर्शन तसेच कृषीविषयक उपक्रमांमध्ये दिलेले योगदान याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सेवानिवृत्तीनंतरही कृषी क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ कायम ठेवत शेतकरी व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ते कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री मा. सौ. स्मिता प्रभू, कृषी संचालक (सेवानिवृत्त) फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय, पुणे, मा. डॉ. कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक, मा. श्री. रविंद्र माने, प्रकल्प संचालक आत्मा, नाशिक, मा. श्री. अभि...

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा या विद्यालयात निसर्गोपचार व विपश्यना संबंधी मार्गदर्शन

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज  पाचोरा( प्रतिनिधी)  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा या विद्यालयात दिनांक -22 /8/ 2026 वार शनिवार रोजी, मुख्याध्यापक एन.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. , उप मुख्याध्यापक  आर. एल. पाटील पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल  पर्यवेक्षक आर. बी. बाठिया पर्यवेक्ष .एम.टी. कौडिण्य ज्येष्ठ क्रीडाशिक्षक एस.पी. करंदे श्रीमती. एस.एस. पाटील यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार व विपश्यना संबंधी मार्गदर्शन हेल्थ केअर सेंटर कुर्ला (मुंबई) चे संस्थापक डॉ.श्री. गिरीश जैन यांनी केले. डॉ.जैन यांनी मधुमेह, उच्च व कमी रक्तदाब, लठ्ठपणा,संधिवात, ऍसिडिटी, डोके दुखणे,एलर्जी व कर्करोग इत्यादी आजारांवर निसर्गोपचार पद्धतीने इलाज केल्यास ते मुळासकट बरे होतात असे मार्गदर्शन केले. श्री. सु.भा.पाटील विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सारिका पाटील यांनी विपश्यना ही दुःख मुक्तीची साधना आहे ही मनाला निर्मळ  करणारी साधना आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर. बी.बोरसे सर यांनी केले व आभार श्री...

सिंधी कॉलनीत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज पाचोरा : आरोग्य वर्धिनी केंद्र, सिंधी कॉलनी यांच्या वतीने सोमवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता शिव मंदिर, दशहरा मैदान, सिंधी कॉलनी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३० वर्षांवरील नागरिकांची BP, मधुमेह (डायबिटीस) तसेच कॅन्सर संदर्भातील प्राथमिक तपासणी करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील गवळी, स्टाफ नर्स प्रतीक्षा, आरोग्य सेवक प्रांजल पाटील यांनी नागरिकांची तपासणी केली. यावेळी वार्डातील गोपालदास वासवानी व नगरसेविका सौ. कविताताई व उमेश (बंटी भाऊ) हटकर यांची प्रमुख उपस्थिती होते. नागरिकांना शिबिराची माहिती मिळावी व अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी नगरसेवक गोपालदास वासवानी व बंटी भाऊ हटकर यांनी परिसरात प्रत्यक्ष संपर्क साधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली. शिबिरामध्ये नगरसेवक श्री. गोपालदास वासवाणी, बंटी भाऊ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गवळ...

‘वृक्षारोपण’पुरते न थांबता संवर्धनाचा आदर्श! काकनबर्डी येथे २४० रोपांना ठिबकद्वारे पाणी

Image
राजेंद्र खैरनार  मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज काकनबर्डी : दि. १५ ऑगस्ट रोजी काकनबर्डी येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील रोपांचे संगोपन करण्यासाठी दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सामाजिक बांधिलकीतून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. जवळपास २४० रोपांपर्यंत ठिबक सिंचनाद्वारे पाणी पोहोचावे, यासाठी पाइपलाइन टाकून ठिबकच्या दोऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे वृक्षारोपणानंतर रोपांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीतून पुढाकार घेण्यात आला आहे. हा उपक्रम खंडेराव देवस्थान, काकनबर्डी, ओझर क्षत्रिय ग्रुप पाचोरा, अरमान फाउंडेशन पाचोरा, एम.के. अ‍ॅग्रो प्रा. लि. नाशिक, ग्रीन अर्थ फाउंडेशन पाचोरा, नंदकिशोर पाटील इलेक्ट्रिकल्स खेडगाव, गोतावळा ग्रुप, जन औषधी मेडिकल (कासार), शारदाई गोविंद समर्थ, खेडगाव-ओझर ग्रामपंचायत ग्रुप तसेच ओझर व अंतुर्ली विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. वृक्षारोपण करून केवळ फोटो काढण्यापेक्षा लावलेल्या रोपांचे पुढील काळात संगोपन करणे आवश्यक असते. हीच जाणीव ठेवून २४० रोपांना ठिबकद्वारे नियमित पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष...

### 🚌 एस. एस. एम. एम. कॉलेज पाचोरा आणि सरपंच सौ. कविता महाजन यांच्या पाठपुराव्याने पाचोरा–कुऱ्हाड खुर्द बससेवा सुरू

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज  **पाचोरा :** विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी **एस. एस. एम. एम. कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा** आणि **पाचोरा परिवहन मंडळ** यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले असून, सरपंच **सौ. कविता प्रदीप महाजन** यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे **पाचोरा–कुऱ्हाड खुर्द बससेवा दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता सुरू करण्यात आली.** एस. एस. एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष **आदरणीय संजय ओंकार वाघ** यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुविधेसाठी महाविद्यालयाने पाचोरा आगाराकडे सातत्याने पाठपुरावा केला. कुऱ्हाड खुर्द परिसरातून पाचोरा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज अनेक विद्यार्थी ये-जा करतात. मात्र दुपारच्या वेळेत बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन सरपंच **सौ. कविता प्रदीप महाजन** यांनी आगार प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. महाविद्यालयाच्या प्रयत्नांना **पाचोरा परिवहन मंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत सहक...

पाचोर्‍यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड.अंकुश कटारे यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बापू सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न...

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज प्रतिनिधी: जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन एसी विभागाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अंकुश कटारे यांनी जिल्हा दौरा पाचोरा येथे दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी पाचोरा येथील शासकीय निवासस्थानात प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावली होती त्या बैठकी पाचोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बापू सोनार यांनी जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार करून जिल्हा दौऱ्यात त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल कौतुक केले व काँग्रेस पक्षाला अनुसूचित जाती विभागाच्या पाचोर्‍यातून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांनी प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.अविनाश भालेराव यांचे आभार मानले तर नूतन जिल्हाध्यक्ष ॲड .अंकुश कटारे यांनी जिल्ह्यात काँग्रेस सोबत अनुसूचित जातीतील सर्व समावेशक असे संघटन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पाचोरा शहर अध्यक्ष शकील शेख, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदू भाऊ सोनार , अनिरुद्ध साळवे,जुलाल भाऊ गायकवाड आनंद बागुल, राजू भोसले, ॲड.प्रदीप सूर्यवंशी, ॲड .सुनील सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उ...