पाचोरा नगरपरिषद निवडणूक २०२५ शांततेत व यशस्वीपणे संपन्न.!



(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)

प्रशासन, पोलीस व कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन; नागरिकांचे सहकार्य कौतुकास्पद
पाचोरा नगरपरिषद निवडणूक २०२५ पाचोरा शहरात अत्यंत शांततामय, निर्भय व लोकशाही मूल्यांना अनुसरून वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन, सतर्कता व समन्वय अत्यंत प्रशंसनीय राहिले.
या निवडणूक कालावधीत पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. बापू रोहम, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार, एपीआय श्री. योगेश गणगे, श्री. संजय निकम, श्री.सुनील पाटील श्री कृष्णा घायाळ तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी,होमगार्ड पथक कर्मचारी यांनी रात्रंदिवस सेवा बजावत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. त्यांच्या दक्षतेमुळे कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडू शकली.
तसेच निवडणूक अधिकारी श्रीमती अर्चना मोरे मॅडम, तहसीलदार श्री. विजय बनसोडे, मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, नगरपरिषद विभाग तसेच सर्व संबंधित कर्मचारी वर्गाने अत्यंत जबाबदारीने, नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदार मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रक्रिया व प्रशासकीय समन्वय यामुळे निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह ठरली.
या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, महसूल कर्मचारी, निवडणूक यंत्रणा व सहाय्यक कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम लोकशाही बळकट करणारे असून त्यांचे कार्य सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे.
तसेच शांतता राखत प्रशासनास सहकार्य करणाऱ्या पाचोरा शहरातील सर्व जागरूक नागरिकांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
लोकशाहीचा हा उत्सव शांततेत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद