पाचोरा नगरपालिकेत भाजप गटनेतेपदी सुरज वाघ यांची सर्वानुमते निवड


(राजेंद्र खैरनार |मु्ख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सुरज संजय वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीमुळे पाचोरा शहराच्या राजकारणात भाजप संघटनेला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
या निवडीप्रसंगी मा. आमदार दिलीप भाऊ वाघ, अमोल भाऊ शिंदे, वैशालीताई सूर्यवंशी तसेच संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुरज वाघ, राहुल गायकवाड, सौ. कविता विनोद पाटील, सौ. कविता उमेश हटकर, गोपाल अर्जुनदास वासवाणी, देशमुख आमरीन अब्दुल रहेमान यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमास भाजपचे जेष्ठ व सक्रिय कार्यकर्ते मधुकर काटे, सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, सचिन भोसले, भूषण वाघ, वासुदेव महाजन, विकास पाटील, शरद सुभाष पाटील, विनोद सुभाष पाटील, लकी पाटील, ॲड. अविनाश सुतार, सुनील पाटील सर, ए. बी. अहिरे, सतीश बापू शिंदे, टिपू देशमुख, बंटी हटकर, दीपक माने, स्वप्निल सोनार, ॲड. ललित सुतार, पिंटू चौधरी, जगदीश पाटील, निखिल डी. पाटील, बंटी महाजन, कृष्णा साळुंखे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
निवडीनंतर नवनियुक्त गटनेते सुरज वाघ यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे पाचोरा नगरपालिकेत भाजप अधिक संघटितपणे शहरविकासाच्या दिशेने काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..