गावाच्या प्रेमातून देशसेवेचे बळ मिळते; लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांचा परधाडेत नागरी सत्कार
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज पाचोरा (प्रतिनिधी) : "माझ्या गावातील नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद आणि माझ्या परिवाराची साथ हीच माझी खरी ताकद आहे. गावाची ताकद माझ्या व माझ्या परिवारामागे असल्यानेच आम्हाला देशासाठी लढण्याचे आणि कर्तव्य पार पाडण्याचे बळ मिळते," असे प्रतिपादन भारतीय सैन्य दलातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांनी केले. पाचोरा तालुक्यातील परधाडे येथील सुपुत्र विनय पाटील यांची नुकतीच भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती झाल्याने गावातील नागरिकांच्या वतीने शनिवार (दि. 30 मे) रोजी त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, देशसेवा हे केवळ कर्तव्य नसून ती एक राष्ट्रभक्तीची भावना आहे. सैन्यातील प्रत्येक जवान आणि अधिकारी देशाच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असतो. अशा वेळी गावकऱ्यांचे प्रेम, कुटुंबाची साथ आणि समाजाचा विश्वास हीच सर्वात मोठी प्रेरणा ठरते. परधाडेकरांनी दिले...