Posts

Showing posts from February, 2026

केरळमध्ये पाचोऱ्याच्या कु. चेतना हिरे यांनी मलयाळममध्ये संवाद सुरू करताच महापौर-उपमहापौर चकित झाले; महापौर उपमहापौरांसह उपस्थितांनी आवाजाच्या व टाळ्यांच्या जल्लोषात कौतुक केले.

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल केरळ राज्यातील Thrissur महानगरपालिकेत आयोजित आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवकांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांची जिज्ञासा वाढावी तसेच देशातील विविध राज्यांची परंपरा, संस्कृती, खाद्यसंस्कृती, पर्यटन, प्रशासन आणि व्यवसायातील संधी यांची ओळख व्हावी या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला महापौर ए. प्रसाद, उपमहापौर डॉ. निजी जस्टिन, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील ‘माय भारत’चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी थ्रिसूर जिल्हा युवा अधिकारी बिन्सी मॅडम व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. यावेळी  श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे यांनी आपल्या संवादाची सुरुवात “एल्लावरक्कुम नमस्कारम, एन्टे पेरू चेतना हिरे” अशी आत्मविश्वासपूर्ण मलयाळम भाषेत केली. मराठी भाषिक विद्यार्थ...

प्रल्हाद सोनवणे यांची देवाभाऊ फाऊंडेशन जळगाव लोकसभा सहसमन्वयक पदी नियुक्ती

Image
ऑटो रिक्षा चालकांचे अध्यक्ष तथा कोळी समाजाचे नेते प्रल्हाद सोनवणे यांची देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेत मुख्य समन्वयक श्री गजाननराव जोशी यांनी जळगाव लोकसभा सहसमन्वयक पदी नियुक्ती केली  प्रल्हाद सोनवणे आदिवासी कोळी महासंघ ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे याची दखल घेऊन देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश या संघटनेत जळगाव लोकसभा सहसमन्वयक पदांची जबाबदारी दिली मुख्य समन्वयक श्री गजाननराव जोशी प्रदेश सहसमन्वयक डॉ आशुतोष घोलप( संघटन) सहसमन्वयक श्री प्रवीण अलाई सहसमन्वयक श्रीकांत थिटे सहसमन्वयक विवेक देशकर सहसमन्वयक सौ वृंदाताई लाड सहसमन्वयक अँड मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाने देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या विविध कार्यात सक्रियतेने सर्व समाज व विविध घटकांसाठी कार्य करतील आणि संघटनेची विचारधारा जोपासण्यासाठी कटिबद्ध राहतील प्रल्हाद सोनवणे यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून...

"संत साहित्यातून मराठीचा गोडवा मिळतो"- वाल्मीक पाटील

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल  कोळगाव- मराठी साहित्यात लेखक कवीनी संत, परंपरा, सण,संस्कृती आणि बोली भाषेतून विपुल लेखन झालेले आहे कोकणी, तावडी, वऱ्हाडी, अहिराणी अशा भाषेतून अनेक शब्दांची भर पडत असते मराठीला अमृता समान मानले गेले आहे वांगंमय,म्हणी, श्लोक, आदिवासी गाण्यांनीही मराठीला अलंकारित केले आहे संत तुकाराम रामदास ज्ञानेश्वरच्या ओवी, अभंग,अमृतवाणी यांच्यातून मराठी भाषेचा संत साहित्यातून गोडवा मिळतो"असे मार्गदर्शन पर विचार प्रा. वाल्मीक पाटील (मराठी विभाग) यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व व विज्ञान महाविद्याल याचे प्राचार्य प्रा.सुरेश कोळी होते.यावेळी गो पू.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पवार व पर्यवेक्षिका सीमा सिसोदे होत्या         येथील कर्मवीर तात्या साहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्यातर्फे कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी वि वा शिरवाड कर माता सरस्वती व तात्यासाहेब यांच्या प्र...

पाचोऱ्यात लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार; जनतेच्या अपेक्षांचा नवा अध्याय सुरू

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा शहरात नव्या राजकीय पर्वाची नांदी ठरलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता लोकप्रतिनिधींच्या जाहीर सत्कार समारंभाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पाचोरा नगरपरिषद येथील नव निर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, गटनेते व सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार येत्या रविवारी (दि. ०१ मार्च २०२६) सायंकाळी ६ वाजता श्रीराम नगर, सिंधी कॉलनी येथे आयोजित करण्यात आला आहे. बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन व सुनिल दुध सेंटर यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहराच्या विकासाच्या नव्या वाटचालीसाठी जनतेने दिलेला कौल आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर हा सत्कार केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, तो जनतेच्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा क्षण ठरणार आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा सॉ. सुनिता किशोर पाटील, उपनगराध्यक्ष श्री. किशोर गुणवंतराव बारवकर, गटनेते सुमित किशोर पाटील तसेच सर्व नगरसेवक यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. तसेच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आम...

पाचोरा नगरपरिषदेचा २१०.३२ कोटींचा करवाढविरहित अंदाजपत्रकास हिरवा कंदील

Image
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा नगरपरिषद च्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल रु. २१०.३२ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक विशेष सभेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचे अंदाजपत्रक कोणतीही करवाढ न करता सादर करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेत आठ लाख रुपयांच्या शिलकीसह हे अंदाजपत्रक एकमताने मंजूर झाले. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरही उत्पन्नवाढीवर भर देत अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला. नगरपालिका स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विकासकामांना प्राधान्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय योजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये: महाराष्ट्र राज्यस्तर नगरोत्थान महाअभियान योजना (रस्ते प्रकल्प) महाराष्ट्र राज्यस्तर नगरोत्थान महाअभियान योजना (भुयार गटार) अमृत २.० प्रकल्प या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षात करण्यात येणार असून, पा...

स्वातंत्रवीर सावरकरांचा इतिहास, युद्धशास्त्र, चाणक्य नितीचा अभ्यास होता –सीमा शिसोदे

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल कोळगाव :  "स्वातंत्र्य वीर सावरकर म्हणजे ज्वाजल्य देशभक्ती, हिंदुत्व उच्च कोटीचे साहित्य, प्रखर बुद्धी वाद, अभ्यास पूर्ण नियोजन होय, ते समाज सुधारक, लेखक, क्रांतिकारक होते प्रथम राष्ट्र हे त्यांचे ध्येय होते त्यासाठी त्यांनी काळ्या पाण्याची अंदमानात शिक्षा भोगली, नैराश्य आले की ते स्व समुपदेशन करत क्रांती कार्य करतांना केवळ प्राणत्याग नव्हे तर विजयी वीर झाले पाहिजे, म्हणून सावरकर चाणक्य नितीने कार्य करायचे" असे प्रतिपादन गो.पु.पाटील विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सीमा शिसोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी होते. येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित गो. पु. पाटील विद्यालय व कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा मनोज पवार पाटील यांनी केले. प्रास्ताविक मनेश पाटील यांनी केले तर आभार प्रा मनीषा बोरसे यांनी मानले....

Breaking news# Pachora Municipal Councilच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा : शहरातील नागरिकांना सेवा-सुविधांची माहिती व तक्रार निवारणाची सुविधा घरबसल्या उपलब्ध व्हावी या उद्देशाने Pachora Municipal Councilने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या अत्याधुनिक सुविधेचे लोकार्पण नगराध्यक्षा सूनिताताई किशोरआप्पा पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपालिकेच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेता सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे, रेहमान तडवी, प्रियांका पाटील, मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. असा आहे एआय चॅटबॉट हा एआय-आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट नागरिकांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तरे देऊन विविध सेवा-सुविधांची माहिती उपलब्ध करून देणार आहे. तसेच शहरातील समस्यांबाबत तक्रारी नोंदविण्याची सोयही यातून होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची गरज कमी होऊन पारदर्शकता व कार्यक्षमता वाढण्यास...

थ्रिसूर येथे केरळ–महाराष्ट्र आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रमाचा शुभारंभ

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल Ministry of Youth Affairs and Sports अंतर्गत कार्यरत Mera Yuva Bharat (MY Bharat) थ्रिसूर यांच्या वतीने आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम 2025-26 (केरळ महाराष्ट्र) या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा २४ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत YMCA Chembukkav, Thrissur येथे आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभाची सुरुवात ‘My Bharat Volunteers’ यांच्या प्रार्थनेने झाली. जिल्हा युवा अधिकारी श्रीमती बिन्सी सी. यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर श्री. ए. प्रसाद होते. थ्रिसूरचे महापौर डॉ. निजि जस्टिन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मेरा युवा भारत, केरळ झोनचे राज्य संचालक श्री. एम. अनिलकुमार उपस्थित होते. एनएसएसचे जिल्हा समन्वयक श्री. रेनजित वर्गीस यांनी मनोगत व्यक्त करत युवकांनी राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. आभार प्रदर्शन श्री. ओ. नंदकुमार यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप र...

शिवजयंतीनिमित्त बांबरुड राणीचे येथे भव्य शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन; सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांची प्रमुख उपस्थिती

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल बांबरुड राणीचे (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बांबरुड राणीचे येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून शिवप्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे. हा कार्यक्रम बांबरुड राणीचे बाजारपेठ परिसरात आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, शौर्य, स्वराज्य स्थापनेचा ध्यास, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था व आदर्श नेतृत्वगुण यांचा सखोल उलगडा करण्यात येणार आहे. राहुल गिरी हे शिवचरित्राचे अभ्यासक व प्रेरणादायी वक्ते म्हणून प्रसिद्ध असून, त्यांच्या प्रभावी व ओजस्वी वक्तृत्वातून शिवरायांचे जीवनचरित्र श्रोत्यांसमोर जिवंतपणे उभे राहणार आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, शिस्त व समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गावातील छत्रपती ...

खडसे महाविद्यालयात आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन; प्रा. जयश्रीताई वर्मा वाघ यांचा संशोधन निबंध प्रभावी सादरीकरण

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे पीएम उषा योजनेअंतर्गत “एकविसाव्या शतकातील मानवविद्या व वाणिज्य क्षेत्रातील बदलते प्रवाह” या विषयावर दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले. देशभरातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ही परिषद शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरली. या परिषदेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा पालवे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी मानवविद्या व वाणिज्य शाखेतील बदलत्या प्रवाहांवर सखोल विचार मांडत शैक्षणिक संशोधनाचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. बीजभाषक म्हणून बनारस हिंदू विद्यापीठ येथील समाजविज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. बिंदा परांजपे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक संशोधन विषय, जागतिक शैक्षणिक प्रवाह आण...

धारदार तलवारीसह दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक; पाचोरा पोलिसांची गुन्हे शाखेची आठवड्यातील सलग दुसरी धडक कारवाई

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक शोध न्यूज चॅनल पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा शहरात धारदार तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने आठवड्यातील सलग दुसरी धडक कारवाई करत शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर घटना टळली आहे. जळगाव जिल्ह्यात शस्त्र अधिनियमाखालील गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी गुन्हे शाखेला विशेष पथक तयार करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, पाचोरा येथील जारगाव चौफुली परिसरात एक तरुण धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित इसम सोमनाथ वना पाटील (वय 19, रा. हनुमान नगर, पाचोरा, जि. जळगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एक धारदार लो...

पाचोरा तहसीलदार कार्यालयात लिपिक संघटनेचा शांतीपूर्ण मोर्चा

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल  पाचोरा प्रतिनिधी पाचोरा - येथील प्रशासकीय यंत्रणेचा कणा मानल्या जाणाऱ्या लिपिक संवर्गातील कर्म चाऱ्यांनी आपला न्याय व हक्कासाठी एल्गार पुकारला आहे जय महाराष्ट्र शासकीय निम शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्व खाली दिनांक 23 /2/ 2026 रोजी पासून जिल्हा परिषद अंतर्गत पाचोरा पंचायत समिती मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन करून मागण्याची पूर्तता होईपर्यंत काम बंद आंदोलन व असहकार बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलेले आहे या अंतर्गत खालील अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी आहेत ‌ प्रशांत बाळासाहेब उगले, अध्यक्ष  महेंद्र रमेश बागुल उपाध्यक्ष, सतिष भागवत पाटील सचिव  विजय शांता राम सावळे ज्येष्ठ सल्लागार, राजेश तागवले ज्येष्ठ सल्ला गार, नंदकिशोर पाटील ज्येष्ठ सल्लागार,जितेंद्र बडगुजर ज्येष्ठ सल्लागार, राकेश गोसावी सदस्य  बापू मोरे सदस्य.                  संजय पाटील सदस्य शैलेश मोहिते सदस्य, संजय पाटील सदस्य किशोर पाटील सदस्य, दीपक बडगुजर सदस्य  श्री...

संत गाडगेबाबा समानता व स्वच्छतेचे दूत होते – अनिल पवार

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल कोळगाव : देव दगडात नसून माणसात आहे अडाणी राहुल नका चमत्कारावर विश्वास ठेऊ नका, देवळात जाऊ नका शाळेत जा अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेचा ना यनाटासाठी बाबांनी जीवन खर्ची केले अपंग अनाथ याची सेवेकरी म्हणून संत गाडगेबाबा ओळखले जात, ते लोकांना फक्त उपदेश करण्यापेक्षा कोणतेही कार्य स्वतः करून दाखवले तर समाजाचे सहकार्य आपोआप मिळते. संत गाडगेबाबांनी गावातील रस्ते, मैदाने, शाळा व मंदिरे स्वतः साफ करून त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छता, समानता व समाजसेवेचा संदेश दिला. म्हणूनच त्यांना स्वच्छता दूत म्हटले जाते, असे प्रतिपादन गो. पु. पाटील विद्यालयाचे मुख्याध्या पक अनिल पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी होते. येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित गो. पु. पाटील विद्यालय व कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंच...

पाचोरा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; बसस्थानक पिकपॉकेट प्रकरणाचा पर्दाफाश, तीन महिला आरोपी जेरबंद

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील गर्दीच्या ठिकाणी विशेषतः बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुबाडणाऱ्या पिकपॉकेट टोळ्यांचा उपद्रव वाढत असताना पाचोरा पोलिसांनी मोठी कामगिरी करत एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हे शोध पथकाने तीन महिला आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.१५ ते ३.४५ वाजेदरम्यान श्रावण ताराचंद पाटील (वय ७०), व्यवसाय शेती, रा. वडगाव खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव हे पाचोरा बसस्थानक येथे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून १३,४०० रुपये लबाडीने चोरून नेले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५११/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. त्याच अनुषंगाने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी बसस्थानक परिसरात पिकपॉकेट ...

हर्षुताई ठाकूर यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने कुऱ्हाड गावात दुमदुमली शिवजयंती

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चैनल  कुऱ्हाड प्रतिनिधी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्सवानिमित्त गावात उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने हिंदुत्ववादी व्याख्यात्या हर्षुताई ठाकूर यांचे प्रभावी व प्रेरणादायी व्याख्यान पार पडले. हिंदू धर्माचे संरक्षण, त्याचे महत्त्व आणि संस्कृती जपण्यासाठी आवश्यक बाबी यांवर त्यांनी ओजस्वी शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि जाज्वल्य भाषणाने उपस्थित श्रोते अक्षरशः भारावून गेले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कुऱ्हाड गावच्या सरपंच कविता प्रदीप महाजन उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महिलांविषयीच्या आदर्श व सन्मानपूर्ण विचारांचा विशेष उल्लेख केला. शिवरायांनी स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि स्वाभिमान यांना दिलेले महत्त्व अधोरेखित करत महिलांनी स्वावलंबी, सक्षम आणि आत्मविश्वासी बनावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमासाठी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण देशभक्ती आणि शिवप्रेम...

भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करणाऱ्या काँग्रेस आंदोलनाचा युवासेनेचा तीव्र निषेध – जितेंद्र जैन

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा | प्रतिनिधी भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात केलेली प्रगती आणि तंत्रवैभव जगासमोर सादर करण्यासाठी आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण परिषदेत भारताचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न सुरू असताना, भारत मंडपममध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या असभ्य गोंधळामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी केला आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना जितेंद्र जैन म्हणाले की, “भारताची तंत्रशक्ती आणि नवकल्पनांची क्षमता जगासमोर मांडण्याचा हा सुवर्णसंधीचा क्षण असताना काँग्रेसच्या युथ विंगने केलेली घोषणाबाजी व गोंधळ ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे विदेशी पाहुण्यांसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब होते. हे देशप्रेम नव्हे, तर देशद्रोहासारखे कृत्य आहे.” राजकीय विरोधाची सैद्धांतिक मांडणी आवश्यक भारत-अमेरिका करारासंदर्भात काँग्रेसला आक्षेप असतील, तर त्यांनी लोकशाही पद्धतीने, तथ्यात्मक व सैद्धांतिक मांडणी करावी, ...

५ वर्षीय अफीफाचा पहिला रोज़ा; श्रद्धा, संयम आणि बालमनातील ईश्वरनिष्ठेचा भावनिक संगम

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल रावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांनी दिली माहिती.... पाचोरा प्रतिनिधी: रमजान हा मुस्लिम समाजासाठी आत्मसंयम, श्रद्धा आणि इबादतीचा अत्यंत पवित्र महिना. या पवित्र महिन्यात रोज़ा ठेवून अल्लाहची इबादत केली जाते आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला जातो. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील मिल्लत नगर परिसरातील मोहम्मद अझहर खान फरीर खान यांची कन्या अफीफा मोहम्मद अझहर खान (वय ५) हिने आपल्या जीवनातील पहिला रोज़ा पूर्ण करून कुटुंबासह संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे. पहाटे सुमारे ५ वाजता सहेरी करून चिमुकली अफीफाने रोज़्याची सुरुवात केली आणि सायंकाळी ६.३० वाजता इफ्तार करून रोज़ा पूर्ण केला. एवढ्या लहान वयात उपवासाचा संयम पाळत, श्रद्धा आणि धैर्याचे दर्शन घडवत तिने अल्लाहप्रती आपली भक्ती व्यक्त केली. देशात शांतता, एकता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी तिने निरागस मनाने दुआ मागितल्याने उपस्थितांची मने भावूक झाली. अफीफाच्या या प्रेरणादायी कृतीबद्दल आजी-आजोबा, शिक्षक, मित्रमंडळी व नातेवाईकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धार्मिक संस्...

जि. प. प्राथमिक शाळा, नाचणखेडा येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
✍️ राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल नाचणखेडा (ता. पाचोरा) प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाचणखेडा येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार, नाटिका, देशभक्तीपर गीते, समूहगायन तसेच मनोरंजक सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.  प्रमुख मान्यवरांची उपस्थिती मुख्य अतिथी म्हणून ▪ श्री. किशोर आप्पा पाटील (आमदार, पाचोरा) ▪ सौ. वैशाली ताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी (चेअरमन, निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा) प्रमुख अतिथी म्हणून ▪ श्री. रावसाहेब जिभाऊ पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) ▪ श्री. मधुकरभाऊ पाटील काटे (माजी जिल्हा परिषद सदस्य) ▪ श्री. सुभाषभाऊ पाटील (माजी पंचायत समिती सभापती) ▪ श्री. शितलदादा सोमवंशी (माजी नगरसेवक) विशेष अतिथी म्हणून ▪ श्री. विजय पवार (गट शिक्षण अधिकारी...

"नगरपरिषद आपल्या दारी” मोहिमेने पाचोरात प्रशासन नागरिकांच्या दारात; प्रभाग १४ मध्ये तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल  पाचोरा (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिन व संत गाडगे बाबा जयंतीचे औचित्य साधून पाचोरा नगरपरिषदेकडून नागरिकाभिमुख प्रशासनाचा नवा उपक्रम “नगरपरिषद आपल्या दारी – स्वच्छता व तक्रार निवारण मोहीम” सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी समस्या थेट नागरिकांकडून ऐकून तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आ. किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा मा. नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील व उपनगराध्यक्ष श्री. किशोर गुणवंत बारवकर यांच्या संकल्पनेतून ही अभिनव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांसाठी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मारोती मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा येथे करण्यात आले आहे. या शिबिरात पाणीपुरवठा, घंटागाडी व कर्मचारी समस्या, झाडू व आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारी, स्ट्रीट लाईट व सोलर लाईट बिघाड, भुयारी गटार अडथळे, प्रॉपर्टी चेंबर जाम होणे, फवारणी तसेच इतर नागरी समस्या यावर थेट निवारण करण्यात येणार आहे. न...

दिव्यांगांच्या ५% निधीवर पडदा का? ग्रामपंचायतीकडून लेखाजोखा जाहीर करा – प्रहार संघटनेची ठाम मागणी

Image
  राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल बांबरुड (राणीचे) प्रतिनिधी | दिनांक : २० फेब्रुवारी २०२६ बांबरुड (राणीचे) गावातील दिव्यांग बांधवांसाठी शासन नियमानुसार राखीव असलेला ५ टक्के निधी तात्काळ वितरित करण्यात यावा तसेच सन २०२० ते २०२५ या कालावधीतील निधीचा सविस्तर लेखाजोखा सार्वजनिक करावा, अशी ठाम मागणी प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीला निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष रवीभाऊ पाटील, पारोळा अध्यक्ष पंकज सोनार, कुरंगी अध्यक्ष विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दिव्यांग हक्क कायद्याची आठवण Rights of Persons with Disabilities Act, 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना समान संधी, संरक्षण व सक्षमीकरण देणे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर बंधनकारक आहे. मात्र स्थानिक पातळीवर दिव्यांगांसाठी आवश्यक साधने, आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा व पुनर्वसनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याची गंभीर बाब संघटनेने निवेदनातून निदर्शनास आणून दिली आहे. प्रहार संघटनेच्या प्रमुख मागण्...

पाचोरा तालुक्यात १३ केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा; १,९३१ विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या रविवारी

Image
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी १३ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले असून परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी विजय पवार व शा. पो. आ. अधीक्षक सरोज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावर्षी इयत्ता पाचवीसाठी १,२६२ तर इयत्ता आठवीसाठी ६६९ असे एकूण १,९३१ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा नियंत्रणासाठी प्रत्येक केंद्रावर भेटी व निरीक्षणाचे नियोजन करण्यात आले असून गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. ‘मिशन स्कॉलरशिप’ उपक्रमांतर्गत यावर्षी दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांसाठी शाळा स्तरावर नियमित मार्गदर्शन वर्गही आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे ग...

प्रभाग क्र. १४ मध्ये उद्या स्वच्छता मोहीम व नागरिक तक्रार निवारण बैठक; नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष राहणार उपस्थित

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा (प्रतिनिधी): नगरपालिका प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने उद्या विशेष स्वच्छता मोहीम तसेच नागरिक तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील व नगरसेवक श्री. प्रदीप भगवान वाघ यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या बैठकीसाठी नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई किशोर आप्पा पाटील तसेच उपनगराध्यक्ष श्री. किशोर बारवकर हे स्वतः उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. या बैठकीत नागरिकांनी आपल्या वार्डातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीज, कचरा व्यवस्थापन तसेच इतर नागरी समस्यांबाबत लेखी किंवा तोंडी स्वरूपात तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन नगरसेविका सौ. सुरेखा पाटील व नगरसेवक श्री. प्रदीप वाघ यांनी केले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. प्रभागातील स...