Posts

Showing posts from February, 2025

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वरखेडी येथील कु.चेतना रणदीप हिरे द्वितीय..

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आयोजित छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महा वक्तृत्व स्पर्धा दि.26/2/2025 रोजी नाहटा महाविद्यालय येथे संपन्न झाले.यामध्ये गट क्रमांक 5 खुल्या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत लासूरकर , द्वितीय क्रमांक कु.चेतना रणदीप हिरे तर  तृतीय क्रमांक तीर्थराज इंगळे यांना मिळाले तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले, सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  मा.ना.संजयभाऊ सावकारे( वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य ) मा. युवराजभाऊ लोणारी ( माजी नगराध्यक्ष, भुसावळ नगरपरिषद ) मा. किशोरजी चव्हाण ( मुख्याधिकारी, पारोळा नगरपरिषद ) मा. अजबसिंगजी पाटील (अध्यक्ष, ग. स. सोसायटी, जळगाव ) मा. महेशदादा फालक ( अध्यक्ष, ताप्ती एजुकेशन सोसायटी, भुसावळ ) मा. किरणजी महाजन ( उद्योजक, भुसावळ ) मा. एम. आर. चौधरी सर ( मुख्याध्यापक, जी. एस. चौधरी विद्यालय, वरणगाव )  मा. अजयजी देशमुख ( संचालक, ग. स. सोसायटी, जळगाव आदी उपस्थित होते....

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर*

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) आज दिनांक 28 रोजी महाराष्ट्र फाउंडेशन पुणे या संस्थेकडून राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर यांना जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार हा विविध मान्यवरांच्या हस्ते पुणे येथील आळंदीला देण्यात येणार आहे  जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर हे गेले अनेक दशकापासून चर्मकार समाजात उल्लेखनीय कार्य करत असतात ते आज विविध संघटनेत देखील काम करत असून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजेच एक मानाचा तुरा समाजात रोवला गेला असून ते आज विविध क्षेत्रातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मालन वसतिगृह पाचोरा येथे अधीक्षकपदावर , तसेच सहकार क्षेत्रात संचालक म्हणून दादासाहेब गजमल को-ऑप बँकेत अनेक वर्षे होते व पत्रकारिता मध्ये अनेक वृत्तपत्र मध्ये काम करून आजमितीला स्वतः झटपट लाईव्ह न्यूज च्या माध्यमातून संपादक म्हणून काम पाहतात ते गाळण बु ग्रामपंचायत मध्ये माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे  त्या...

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा चे जिल्हाधिकारी श्रीयुत आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात मिळाले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरिता दिनांक ७ जानेवारी, २०२५ ते १६ एप्रिल, २०२५ या कालावधीत राज्यात १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.  या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आज दिनांक २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी आढावा घेण्यात आला. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव, आयुक्त/संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/ उप महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI), नाविन्यपूर्ण उपक्रम, इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यात द्वित...

सहकारी शिक्षण संस्था संचलित सु.भा.पाटील शाळेचे जेष्ठ शिक्षिका सौ.रूपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना दाखवला अंगावर शहारे येणारा "छावा" चित्रपट

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) "मौत डरी थी देखकर उसे, ये खुद मौत का दावा हैं...!!!! धरती को नाज है उसपर ऐसा एक ही शेर जो शिवबा का "छावा" हैं..!! !!! जय शंभूराजे,"  पाचोरा येथील प्रकाश टॉकीज मध्ये "‌छावा" दाखवण्यात येत असून या चित्रपटाला तुफान गर्दी होत असून शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हा चित्रपट पाहण्यासाठी येत असून त्यांचे पाल्य त्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी नेत आहे पाचोरा शहरातील सु.भा.विद्यामंदिर येथील इयत्ता चौथी "इ" चे विद्यार्थी यांना शिकवणाऱ्या शिक्षिका रूपाली पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना "छावा" चित्रपट दाखवला महाराष्ट्र राज्याचा जाज्वल इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा आणि श्री छत्रपती संभाजी राजांचे शौर्य धर्मनिष्ठा विद्यार्थ्यांना समजली पाहिजे याकरिता हा चित्रपट दाखवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जेष्ठ शिक्षिका सौ.रूपाली पाटील मॅडम यांनी मुलांना चित्रपट दाखवला यावेळी मुलांना अक्षरशा: चित्रपट पाहताना डोळ्यात अश्रू येत होते. "मौत डरी थी देखकर उसे, ये खुद मौत ...

भडगाव येथे शासकीय विश्रामगृहात राज्यस्तरीय वधु-वर मेळावा संबंधित नियोजन-आयोजन बैठक संपन्न..!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  (भडगाव):- भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात    आज दि.२४/२/२०२५ वार सोमवार रोजी वधुवर मेळावा नियोजन बैठक संपन्न झाली. या वधुवर मेळावा संबंधित नियोजन बैठकीची सुरुवात ही आलेल्या सर्व समाज बांधवांच्या परिचयाने झाली. सर्व बांधवांनी मोठ्या हर्षउल्हासाने आपआपला परिचय सामाजिक कार्याची महती दिली, विशेष करुन भुसावळ-जळगाव भागातुन आलेले नारायण झगु कोळी यांनी आपला परिचय देऊन त्यांनी आयोजित व यशस्वी केलेल्या केलेल्या वधुवर मेळावा संबंधित माहिती सर्वांना सांगितली. त्यातुन खान्देश मध्ये होणा-या वधुवर मेळावा संबंधित सखोल चर्चा करण्यात आली.समाजाचे चांगले कार्य करणाऱ्यांना अडथळे येतातच पण त्या अडथड्यांना न डगमगता आपले कार्य चालुच ठेवावे असे आव्हान उंबरखेड चे मा.तुकाराम मोरे सरांनी समाज बांधवांना केले.आज माझी तब्येत बरोबर नसतांना ही मी या बैठकीला उपस्थिती दिली,तसेच नारायण कोळी यांनी समाजाचे कार्य जर यशस्वीपणे पार पाडायचे असेल तर मनापासून कार्य करावे दहा दिवस असे द्या की "आपल्याला घर ...

पाचोरा तालुका विधी समिती व गो.से.हायस्कुल संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनींना मोफत व सक्तीचे शिक्षणसह POCSO 2012, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) संबंधी मार्गदर्शन पर कार्यक्रम आज दि 24 फेब्रु.25 रोजी संपन्न..!

Image
( मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा तालुका विधी समिती आणि  गो  से  हायस्कुल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनी यांना बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, त्यासोबत POCSO कायदा 2012, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण  (NALSA) संबंधी मार्गदर्शन पर  कार्यक्रम आज  दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केला होता.  या  कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका विधी सेवा समिती सदस्य डॉ मुकेश तेली, सौ ललिता पाटील मॅडम , प्रा डॉ सुनीता गुंजाळ मॅडम, यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा वकील संघ उपाध्यक्ष अॅड सौ कविता रायसाकडा,  अॅड सचिव श्री निलेश सूर्यवंशी आणि अॅड कु चंचल पाटील मॅडम होते. दिव्यांग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक न्याय मिळवणे साठी वंचित राहू नये म्हणून NALSA  याची स्थापना करनेसंबंधी माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष  गो से  हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री एन आर पाटील सर तसेच  कार्यक्रमासाठी बोरसे सर, मनोरे सर यासोबत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

पहाट फाऊंडेशन च्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील युवकांला "आदर्श शेतकरी " पुरस्काराने केले सन्मानित ...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पहाट फाऊंडेशन च्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील युवकांला "आदर्श शेतकरी " पुरस्काराने केले सन्मानित ...!  पहाट फाऊंडेशन च्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांना राष्ट्रसंत गाडगे बाबा राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले.  बांबरुड राणिचे (ता.पाचोरा)ता.२४ पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांनी नोकरी च्या मागे न लागता शेती करण्यावर भर दिला. शेतीची आवड असल्याने किरण अशोक सुर्यवंशी यांची नेहमीच विविध प्रयोग करून त्यांनी विविध पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असून.कला शाखेतील पदवी व डी. एड  शिक्षण असलेल्या या युवकांने शेतीत राबविलेले अनेक प्रयोग यशस्वी केले आहे.किरण च्या वडीलांचे सांगने आहे की "नोकर न बनता ,मालक बना" हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन किरण अशोक सुर्यवंशी हा शेती क्षेत्रात  प्रयत्नशील  आहेत.   किरण अशोक सुर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेऊन पहाट फाऊंडेशन तर्फे त्यांना दि. २३ फेब्रुवारी रोजी ग्रामसंत ...

पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आईचे वृद्धपकाळाने आज दु:खद निधन....

Image
पाचोरा -भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक दुःखद निधन आज दिनांक 24/02/2025सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता स्व. ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्या *आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री होत्या.* त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथुन दुपारी 3:00 वाजता निघेल.  अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमी येथे होईल  शोकाकुल: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोरा भडगाव ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधव 

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा-पाचोरा जि.जळगाव आयोजित माजी न्यायाधीश दयाराम कोळी यांच्या"बोभाटा" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा)महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा पाचोरा यांच्या वतीने दि. 23 फेब्रु.2025 रविवारी सकाळी 10:00 वा.एम.एम.एस.एस. महाविद्यालय पाचोरा येथे माजी न्यायाधीश दयाराम कोळी लिखित "बोभाटा" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा हा मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाचोरा शाखेचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.दिलीप (भाऊ)ओंकार वाघ उपस्थित होते. त्यांनी आपल्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. यात . पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चे.मा.संजय(नानासाहेब )ओंकार वाघ, व्हा.चे.नानासाहेब व्ही.टी. जोशी, प्रा.डॉ. वासुदेव वले (कार्याध्यक्ष, म.सा.प., पाचोरा), डॉ. अशोक कौतिक कोळी (जामनेर), प्रा. डॉ. शिवसांब कापसे (उप-प्राचार्य, श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय, पूर्णा), सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. वर्षा बिरहार...

सुवर्ण खान्देश चॅनल च्या द्वितीय वर्धापनदिन पाचोरा येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) सुवर्ण खान्देश चॅनल च्या द्वितीय वर्धापनदिन काल पाचोरा येथील महालपुरे मंगलकार्यालयात सर्व मान्यवर, पत्रकार बांधव, मानवाधिकार आयोगाच्या सर्व पदाधिकारी,माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,तसेच नायब तहसीलदार विनोद कुमावत साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे,सचिन सोमवंशी, प्रोफेसर शिवसेना राजेंद्र चिंचोले सर,महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ.मंदाकिनी ताई पारोचे, तसेच इतर महिला पदाधिकारी भगिनी ,जेष्ठ पत्रकार सी.एन.चौधरीसर, श्री शांताराम चौधरी सर,अनिल आबा येवले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, मधुर खान्देश चे मुख्य संपादक व युवा पत्रकार राहुल महाजन, पत्रकार बंडु सोनार,पत्रकार  दिलीप परदेशी, सुवर्ण खान्देश चे ग्रामीण प्रतिनिधी ईसाभाऊ तडवी सातगाव, पत्रकार जावेद शेख, पत्रकार प्रविण बोरसे, अश्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुवर्ण खान्देश चे मुख्य संपादक श्री शशिकांत दुसाने जी यांचा सत्कार करतांना जेष्ठ पत्रकार शांताराम चौधरी सर, जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले , आरोग्य दुत चे...

भडगाव शहरातील बाळद रोडवरील मोटर सायकल चोरी प्रकरणी एक आरोपी भडगाव पोलिसांच्या ताब्यात... दोन मोटर सायकल जप्त...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) भडगाव तालुक्यातुन तसेच शहरामधुन  गेल्या काही दिवसांपासून भरपूर दुचाकी चोरीला जात आहेत. याविषयी भडगाव पोलिस प्रशासनाने वडजी येथील एका तरुणाला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेली असून या दुचाकी चोराकडून 2 मोटारसायकली जप्त करण्यात भडगाव पोलिसांना यश आले आहे.

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन चिमुकल्यांच्या नृत्याविष्कारांनी गजबजले...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा :- तात्यासाहेब आर ओ पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात,जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती.प्रथमतः मुख्य अतिथी व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करून गणेश वंदनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.       राजस्थानी,पंजाबी, हिंदी, मराठी भाषेच्या गीतांवर लहान चिमुरड्यांच्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. मोबाईल,सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे समाजात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी लहान चिमुकल्यांनी आपल्या नृत्यातून प्रभावी संदेश देत त्याचे शारीरिक, मानसिक परिणामांसोबतच कुटुंबातील नातेसंबंध किती कमकुवत होत आहेत यावर उपस्थितांना विचार करावयास भाग पाडले व मनोरंजनातून समाज प्रबोधन देखील केले.     शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सु...

पाचोरा वकिल संघाच्या संयुक्त विद्यमाने मिठाबाई कन्या विद्यालयात तालुका विधी सेवा शिबिर संपन्न

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) कन्या विद्यालयात "तालुका विधी सेवा शिबिर व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानेअंतर्गत विद्यार्थ्यांना ..' पोकसो कायदा, अन्न व शिक्षण कायदा, इ.' विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अँड.कविता मासरे- रायसाकडा(उपाध्यक्ष पाचोरा वकील संघ)ललिताताई पाटील,अँड. चंचल पाटील डॉ. प्रा.सौ.सुनीता मांडोळे,श्री.नैनव सर, यांनी कायदेविषयक माहिती दिली कार्यक्रम खिळी मेळीमीच्या वातावरणात संपन्न झाला  यावेळी कन्या विद्यालयील शिक्षकवृंद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोपडा रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय व प्रेरक - रोटरी प्रांतपाल राजिंदर खुराणा

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  चोपडा दि.२०(प्रतिनिधी ) मैत्री आणि सेवेचा विचार कृतीतून रुजविणारी चळवळ म्हणून रोटरी आज जगाला परिचित आहे. गरजांवर आधारित प्रकल्प हाती घेऊन त्यानुसार कार्य करणाऱ्या चोपडा रोटरी क्लबने गेल्या ५४ वर्षात उल्लेखनीय व  प्रशंसनीय कार्य केले असून ते इतर क्लबसाठी प्रेरक आहे, असे गौरवोद्गार काढत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल राजिंदर खुराणा यांनी चोपडा क्लबचे अभिनंदन करुन क्लबच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.         येथील धरणगाव रोडवरील हॉटेल निलांजन येथे ते रोटरी सदस्यांशी संवाद साधतांना बोलत होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करुन पूजन केले.            प्रांतपाल भेटीदरम्यान क्लब असेंबलीमध्ये सर्व बी ओ डी मेंबर्स व डिस्ट्रिक्ट ऑफिसर व सदस्यांच्या बैठकीत प्रांतपाल रोटे. राजिंदर खुराणा यांनी रोटरी क्लब चोपडा तर्फे राबविण्यात आलेल्या प्रकल्पांबद्दलची माहिती जाणून घेत मार्गदर्शन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. @सेवा प...

ॲड कविता मासरे (रायसाकडा) यांची नोटरीपदी नियुक्ती

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) येथील प्रख्यात विधी तज्ञ एडवोकेट कविता मासरे (रायसाकडा)  यांची भारत सरकारच्या वतीने नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल सर्व स्तरातून ॲडवोकेट कविता मासरे (रायसाकडा) यांच्यावर अभिनंदन  वर्षाव होत आहे केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे पदी निवड करण्यात आलेल्या यादीमध्ये ऍडव्होकेट कविता मासरे (रायसाकडा) यांचा नावाचा समावेश आहे यांना मागील 14 वर्षापासून वकिली व्यवसायाचा अनुभव आहे तसेच ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या या निवडीबद्दल सहकारी मित्र परिवार यांच्यासह विविध संस्थेची तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे पाचोरा येथील दिवाणी व फौजदारी तसेच जिल्हा सत्र न्यायालयात येथे कार्यरत आहेत कायदेशीर दस्तावेज स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणून नोटरी हे फार महत्त्वाचे आहे व्यवहार योग्य रीतीने पार पाडले जातील याची खात्री करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात भारत स...

पातोंडा येथे खंडेराव महाराज यात्रानिमित्त खंडेराव केसरी कुस्त्यांची दंगल उत्साहात

Image
 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पातोंडा ता . चाळीसगांव जि जळगांव येथे संपुर्ण गावाचे ग्रामदैवत गावाच्या दक्षिणेला तितुर नदीच्या काठावर वसलेले पुरातत्व असे खंडेरावाचे मंदीर दरसालाबादाप्रमाणे यात्रा संपूर्ण गावाच्या लोक वर्गणीतून उत्सहात साजरी करण्यात येते यात तमाशा किर्तन आणि अखेरचा कुस्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो दरसालाबादाप्रमाणे प्रत्येक समाजातील माणसाला यात्राकमेटीचा मान दिला जातो यावर्षी झगडे कुटुंबातील छोटू झगडे यांना यात्राकमेटी चा मान दिला गेला यात्रेत कुस्त्यांसाठी गावातील त्रिमुती केसरी ज्ञानेश्वर साहेबराव महाजन/. नाना पैलवान हे गावातील मुलांना मल्लविद्या देवून कुस्ती खेळतात त्यांना वस्तात म्हणतात वस्तात रंगीबेरंगी डाव या शिष्यांना देत असतात आपला शिष्य पारंगत झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो  *देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे* अशी विद्या ज्ञानेश्वर साहेबराव महाजन यांनी आपल्या पठ्यांना दिली या खंडेराव महाराज केसरी कुस्ती मल्लविद्या त नाना पैलवान यांचे 4 मुले सोनु महाजन  ई...

एन मुक्ता तर्फे पंच परिवर्तन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा तोरणमाळ येथे संपन्न..तोरणमाळ येथे संपूर्ण खानदेशातील विद्वानांनी केले पर्यावरणावर मंथन..

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) दोन दिवसीय कार्यशाळेत बौद्धिक सत्र विविध खेळ व मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यातून घेतला सर्व प्राध्यापकांनी आणि प्राचार्यांनी आनंद.. भडगाव प्रतिनिधी ( प्रा सुरेश कोळी ) नवापूर येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संचालित नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड काॅलेज टीचर्स असोसिएशन (एन-मुक्ता) या संघटनेतर्फे नुकतेच दोन दिवसीय पर्यावरण या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. उद्घाटन सत्रानंतर या कार्यशाळेमध्ये राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य कबचौ उमवी रामसिंग दादा वळवी यांनी जैवविविधता या विषयावर मांडणी करून रानभाज्या तसेच आदिवासी भागातील विविध भाज्यांचे प्रकार त्यावर केलेली कामगिरी यावर प्रकाश टाकला. सायंकाळी सर्व प्राध्यापकांनी पारंपारिक खेळांचा आनंद लुटला.     दुसऱ्या दिवशी सकाळी डाॅ.योगेश नांद्रे यांनी योग सत्र घेतले  नंतर पहिल्या सत्रात प्राचार्य डॉ व्ही. आर. पाटील यांनी घन जंगल  (मियावाकी) व त्याचे महत्त्व सांगितलं .दुसऱ्या सत्रात डॉ. दहातोंडे यांनी शेती व पर्यावरण हा विषय मांडला. तसेच पुढील सत्रात ...

१९फेब्रु. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील सर्व सरपंचांना मार्गदर्शन करतांना पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक जी पवार साहेब

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांनी दर महिन्याला पोलीस पाटील यांची मीटिंग घेत असून त्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन करीत असतात घेताना सांगितले की आपल्या काही अडचणी असल्यास किंवा आपल्या गावात काही संशयात व्यक्ती किंवा काही आढळल्यास त्वरित पोलिसांची संपर्क साधावे यावेळी त्यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वत्र शांतता राहील यासाठी काळजी घ्यावी असे मार्गदर्शन करताना श्री अशोक पवार साहेबांनी सांगितले यावेळी पीएसआय श्री परशुराम दळवी साहेब उपस्थित होते तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील उपस्थित होत्या