सजग ग्राहकच सक्षम बाजारव्यवस्थेचा कणा! पाचोरा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा



(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक 
सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा | प्रतिनिधी
ग्राहकांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि फसवणुकीविरोधातील सजगता या त्रिसूत्रीवर भर देत पाचोरा महसूल प्रशासनातर्फे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी शासकीय तहसील कार्यालय, पाचोरा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन अर्थपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. ग्राहक हा केवळ खरेदीदार नसून संपूर्ण बाजारव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, हा संदेश या कार्यक्रमातून ठळकपणे देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल देशमुख (पश्चिम विभाग प्रमुख, अखिल भारतीय ग्राहक पंचायत) उपस्थित होते. याशिवाय तहसीलदार विजय बनसोडे, नायब तहसीलदार विनोद कुमावत, पुरवठा अधिकारी सुषमा उरकुडे आदी मान्यवरांनी व्यासपीठाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच स्वामी विवेकानंद, बिंदू माधव जोशी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार विजय बनसोडे यांनी ग्राहक संरक्षण कायदे, प्रशासनाची जबाबदारी व ग्राहकांच्या तक्रारींवरील कार्यपद्धती यांचा सविस्तर आढावा घेतला.
प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. अनिल देशमुख यांनी “ग्राहक सजग असेल तरच फसवणूक रोखता येईल. ग्राहक हक्कांची जाणीव ही काळाची गरज असून अशा उपक्रमांतून समाजात जागृती घडते,” असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. भूषण अहिरे यांनी ग्राहक चळवळीला प्रशासनाची भक्कम साथ राहील, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी सजग राहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ मिस्तरी यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने पाचोरात आयोजित या कार्यक्रमातून ग्राहक हक्कांविषयी जागरूकता वाढीस लागून सक्षम, पारदर्शक आणि न्याय्य बाजारव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..