पाचोरा पीपल्स बँकेच्या ६० व्या वर्धापन दिनी योगिता पाटील यांची आकर्षक ड्राईंग ठरली केंद्रबिंदू
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्युज चॅनल)
पाचोरा पीपल्स बँकेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त संघवी कॉलनी येथील रहिवासी योगिता पाटील यांनी साकारलेली कलात्मक ड्रॉईंग उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यांच्या रांगोळीने कार्यक्रमास कलात्मक साज चढवत संचालक मंडळ, व्यापारी वर्ग तसेच मान्यवरांची विशेष दाद मिळवली.
लहानपणापासून रांगोळी काढण्याची आवड जोपासणाऱ्या योगिता पाटील यांनी शालेय जीवनापासूनच या कलेत सातत्य राखले आहे. विविध प्रकारच्या रांगोळ्यांतून त्यांनी अनेक राजकीय नेते व राष्ट्रीय महापुरुषांचे हुबेहूब चित्रण साकारले असून त्यांची रांगोळी पाचोरा शहरात विशेष ओळख निर्माण करणारी ठरली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी ATD ड्रॉइंग टीचरचे शिक्षण घेतले असून गेल्या पंधरा वर्षांपासून त्या रांगोळी कलेत सक्रिय आहेत.
शालेय जीवनात रांगोळी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. टायगर किड्स शीतल अकॅडमी येथे दोन वर्षे ड्रॉइंग टीचर म्हणून काम करताना त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्या कामगिरीची दखल घेऊन त्यांची संभाजीनगर येथील बुराणी स्कूलमध्ये ड्रॉइंग टीचर म्हणून नियुक्ती झाली. सध्या त्या विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने रांगोळी काढण्याची कला शिकवत असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना नवे बळ मिळत आहे.
पाचोरा पीपल्स बँकेच्या वर्धापन दिनी साकारलेल्या उत्कृष्ट ड्रॉइंग मुळे योगिता पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment