विश्वासाची परंपरा : पाचोरा पीपल्स बँकेला ६० वर्षांचा गौरवशाली प्रवास...!सत्यनारायण महापूजा व नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन


(राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा : सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता व सामाजिक बांधिलकीची भक्कम ओळख निर्माण करणाऱ्या पाचोरा पीपल्स बँकेने आपल्या स्थापनेचे ६० गौरवशाली वर्षे पूर्ण केली. या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त बँकेतर्फे सत्यनारायणाची महापूजा व नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे भव्य उद्घाटन भक्तिभाव व उत्साहात पार पडले.

सत्यनारायणाची महापूजा बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. भागवत आबा महालपुरे व ताई साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आमदार श्री. किशोर आप्पा पाटील, चेअरमन श्री. अतुल भाऊ संघवी, व्हाईस चेअरमन श्री. प्रशांत भाऊ अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ, माजी संचालक, गावातील प्रतिष्ठित व्यापारी, बँकेचे ग्राहक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सांगितले की, “नवीन वर्षात ग्राहकाभिमुख योजना, आधुनिक सेवा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बँकेचा विश्वास अधिक दृढ केला जाईल. सभासद व ग्राहकांच्या हिताचे निर्णय हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील.”

सहकार चळवळीतील साठ वर्षांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे पाचोरा पीपल्स बँकेच्या निष्ठावान कार्याची साक्ष असून, भविष्यातही बँक प्रगती, विश्वास व सेवाभावाच्या मूल्यांवर मार्गक्रम

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..