नऊ वर्षीय धनश्री शिंदे बेपत्ता : परिसरात चिंतेचे वातावरण...!


(राजेंद्र खैरनार सत्य शोध न्यूज चॅनल)

चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावातून एक अत्यंत चिंताजनक घटना समोर आली असून, कु. धनश्री उमेश शिंदे (वय ९ वर्षे, रा. तरवाडे, ता. चाळीसगाव) ही बालिका दि. 12/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. सायंकाळच्या सुमारास घराजवळून बाहेर गेलेली धनश्री बराच वेळ होऊनही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र उशिरापर्यंत काहीही ठोस माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी अखेर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ हरवलेली बालिका म्हणून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नातेवाईक व परिचितांची चौकशी करणे, तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये माहिती प्रसारित करणे अशा विविध दिशांनी तपास सुरू असून पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची माहिती आहे. घटनेनंतर तरवाडे गावासह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, धनश्रीच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबीय, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन शोधकार्य करत आहेत. ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धनश्रीबाबत कोणालाही काहीही माहिती, संशयास्पद हालचाल किंवा ठावठिकाणा आढळल्यास, तात्काळ खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे—

📞 सपोनी नितीन पाटील : 9284661658
📞 पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण : 8329287165

लवकरात लवकर बालिकेचा शोध लागावा, यासाठी ही बातमी जास्तीत जास्त प्रसारित व शेअर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..