पाचोरा नगरपरिषद निवडणूक 2025 : 21 डिसेंबर रोजी फेरीनिहाय मतमोजणी, प्रशासन सज्ज..!




✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी :
पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाने फेरीनिहाय मतमोजणी तक्ता जाहीर केला असून, त्यानुसार प्रत्येक प्रभागाची मतमोजणी ठरावीक फेरीत केली जाणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 8 फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार असून, प्रभागांचे गट करून 1 ते 12 टेबलांवर मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीत ठरावीक प्रभागांचीच मतमोजणी होणार असल्याने निकाल प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,

पहिल्या ते चौथ्या फेरीत प्रभाग क्रमांक 1 ते 8,

पाचव्या व सहाव्या फेरीत प्रभाग क्रमांक 9 ते 12,

तर सातव्या फेरीत केवळ प्रभाग 11 व 12 च्या सदस्य पदाचीच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या फेरीत नगराध्यक्ष पदाची मतमोजणी होणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.


मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी नियुक्ती, टेबलनिहाय नियोजन व उमेदवार प्रतिनिधींसाठी सुविधा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

मतमोजणीदरम्यान उमेदवार, प्रतिनिधी व नागरिकांनी संयम राखावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाचोरा शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.


✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..