पाचोरा येथे जिल्हास्तरीय रोटरी ओळख सत्र उत्साहात
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज पाचोरा रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 आयोजित CROP अर्थात रोटरी ओळखपत्र सेमिनार काल रविवार दिनांक 13 रोजी उत्साहात पार पडला. निर्मल सीड्स पाचोरा येथील वातानुकूलित सभागृहात आयोजित या क्रॉप सेमिनार ला प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, निर्मल सिड्सच्या संचालिका वैशालीताई सूर्यवंशी, उपप्रांतपाल हरविंदर थेठी, उप प्रांतपाल भरत सिनकर, रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, सचिव डॉ. स्वप्नील पाटील व सचिव प्रोजेक्ट डॉ. प्रशांत सांगडे, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी एन्क्लेव्ह सुधीर आबा पाटील, कन्व्हेनर राजेश मोर व को-कन्वेनर डॉ. मुकेश तेली मंचावर उपस्थित होते. रोटरी क्लब विषयक परिचय देताना प्रमुख मार्गदर्शक शशिकांतजी धामणे( चाळीसगाव ), विरेंद्रजी पाथरीकर( नागपूर ), अमोलजी काबरा (नाशिक), डॉ संदिपजी देशमुख (चाळीसगाव) , डॉ नितीन रेदासनी ( जळगाव) यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव ग्रामीण भागातील पारोळा, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, भुसावळ, फैजपूर...