पाचोरा तालुक्यात विज्ञानप्रेमाचा उत्सव...!५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे १६ डिसेंबरला दिमाखदार उद्घाटन...!



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्यशोध न्यूज चॅनल)

पाचोरा प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि नवोन्मेषाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने पाचोरा तालुक्यात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण विभाग, पंचायत समिती पाचोरा व वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गाळण बु. यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.

या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून उद्घाटन समारंभाचे शुभहस्ते आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. दादासाहेब श्री. बाबूलाल हरी राठोड, अध्यक्ष – हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, गाळण बु. हे राहणार आहेत.

या प्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, तज्ञ मार्गदर्शक व विविध मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध विषयांवरील नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी विज्ञान प्रकल्प हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

प्रदर्शनात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळणार असून विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य, ऊर्जा संवर्धन आदी विषयांवरील प्रकल्प सादर केले जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कौशल्याला चालना मिळणार आहे.

दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत साहित्य मांडणी, तर दुपारी ४ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..