भडगावात कारागिरीचा उत्सव; विश्वकर्मा जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल भडगाव (प्रतिनिधी : प्रा. सुरेश कोळी) सृष्टीचे शिल्पकार, कारागिरांचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती भडगाव शहरात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी साईबाबा मंदिर परिसरात तालुक्यातील सुतार समाजाच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी पार पडत परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. दरम्यान, विठोबा मिस्तरी व समाजबांधवांच्या वतीने स्वतंत्र मिरवणूक काढण्यात आली होती. समाजातील समन्वय आणि एकोप्याचे दर्शन घडवत मिरवणूक साई मंदिरात आणण्यात आली. येथे प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे शरद निकम व विठोबा मिस्तरी यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी सामूहिक आरतीत सहभाग घेतला. साई मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. कारागिरांच्या कष्टाला सन्मान देणाऱ्या या सोहळ्याने सामा...