शिक्षण विभाग समग्र शिक्षा, पंचायत समिती पाचोरा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यक साधने वाटप...! पाचोरा शिक्षण विभागाचा महाराजस्व अभियानात सहभाग
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज पाचोरा दिनांक 30 /07/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पाचोरा तालुकास्तरीय कार्यक्रमात शिक्षण विभागाचा स्टॉल लावण्यात आला होता.तसेच कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील व जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यक साधने वाटप करण्यात आली. व्हीलचेअर, इलेक्ट्रिक सायकल तसेच ब्रेल किट इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रांत अधिकारी भूषण अहिरे,तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार ,माजी जि प सदस्य रावसाहेब पाटील, मधुकर काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व केंद्रप्रमुख, दिव्यांगांसाठी कामकाज करणारे तालुका समन्वयक कैलास बडगुजर व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक घन:श्याम चौधरी,प्रकाश पाटील, लहू पवार, रावसाहेब साळुंखे, जयदीप पाटील, सुवर्णा पाटील, दिलीप पाटील, ओजस्विता आराध्ये , सुनिता पाटील, सोनाली शेवरे, संगीता देसले , सौ सीमा पाटील...