युवा सेने चे पाचोरा तालुका प्रमुख,युवा नेतृत्वाचा तेजस्वी चेहरा – उमेश दादा एरंडे यांना वाढदिवसाच्या भव्य शुभेच्छा...!


(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चैनल) 


पाचोरा शहरातील सामाजिक-राजकीय वर्तुळात सातत्याने सक्रिय असलेले, शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेचे पाचोरा तालुकाप्रमुख मा. श्री. उमेश दादा एरंडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असून, या निमित्ताने सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अश्विनी ऑटोमोबाईलचे संचालक, माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध व्यापारी श्री. संजय बापू एरंडे यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या उमेश दादांनी कमी वयातच राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. युवकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम, जनहिताच्या आंदोलनांमध्ये त्यांची उपस्थिती नेहमीच ठळक राहिली आहे.
शांत, संयमी, मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन चालणारा त्यांचा स्वभाव वडीलधाऱ्यांचा विश्वास संपादन करणारा तर तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. राजकीय वारसा जपत असतानाच स्वतःच्या कर्तृत्वावर जनतेत विश्वास निर्माण करण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. समाजोपयोगी कार्य, संघटनात्मक बांधणी आणि प्रभावी लोकसंपर्क यात त्यांनी केलेली कामगिरी ही प्रत्येक तरुणाला हेवा वाटावा अशीच आहे.
त्यांच्या कार्यशैलीतून पाचोरा शहर व तालुक्याला एक सकारात्मक दिशा मिळत असून, विशेषतः नव्या पिढीला नेतृत्वाचा नवा आदर्श मिळेल, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अधिक व्यापक व लोकाभिमुख कार्य घडेल, यात शंका नाही.
या शुभप्रसंगी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना की,
मा. उमेश दादा एरंडे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो,
त्यांचा सामाजिक-राजकीय प्रवास अधिकाधिक बळकट होवो,
आणि त्यांनी जनसेवेतून सातत्याने गगनभरारी घ्यावी.
💐🎂 उमेश दादा एरंडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आपला प्रत्येक दिवस जनतेच्या सेवेसाठी व समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित राहो, हीच सदिच्छा.
शुभेच्छुक :
✍️ श्री. राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
तसेच
पाचोरा तालुका प्रतिनिधी – दैनिक दिव्य प्रेरणा
जळगाव वृत्त / पाचोरा शहर प्रतिनिधी

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद