पैसा,प्रॉपर्टी बघून लग्न करणाऱ्या व क्षणिक सुखासाठी संसार उध्वस्त करणाऱ्या महिला व पुरुषांसाठी समाजात आदर्श घडवणारी प्रेरणादायी बातमी…पाचोऱ्यातील सरला आणि मधुकरची लग्नानंतरची प्रेम कहाणी...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पैसा,प्रॉपर्टी बघून लग्न करणाऱ्या व क्षणिक सुखासाठी संसार उध्वस्त करणाऱ्या महिला व पुरुषांसाठी समाजात आदर्श घडवणारी प्रेरणादायी बातमी…पाचोऱ्यातील सरला आणि मधुकरची लग्नानंतरची प्रेम कहाणी
शोध पत्रकारिता….आजारी पतीला पत्नीचा आधार! पेट्रोल पंपावर काम करून ओढतात परिवाराचा गाडा

जळगाव: आपण नवरा बायकोची भांडण त्याचबरोबर नवरा बायको मध्ये अनेक वर्षे सोबत राहून वेगळे होणं,प्रॉपर्टीचे वाद असे अनेक प्रकरण बघितले असतील आणि त्या प्रकरणातून समाजामध्ये परिस्थिती किती बदलली आहे. याचे उदाहरण आपल्याला बघायला मिळते. परंतु मी आज आपल्याला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपुरा येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबाबद्दल समाजामध्ये आदर्श निर्माण करणारी बातमी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडत आहे.
मित्रांनो फोटोमध्ये दिसणाऱ्या या महिला शहरातील बाहेरपुरा परिसरातील राहणाऱ्या सरलाबाई मधुकर चौधरी आहे.  या मागील अनेक वर्षांपासून आपल्या पतीसोबत संसार करीत असून त्यांना एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. संसार सुरळीत सुरू असतांना अचानक त्यांच्या पतीची तब्येत खराब झाली व पतीला आता कायमचा आराम करायला डॉक्टरांनी सल्ला दिल्याने घरचा कर्ता पुरुष हा घरी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेवटी या महिलेला पुरुषाचे कपडे घालून पाचोरा शहरातील राधास्वामी पेट्रोल पंपावर काम करावे लागत आहे….यामध्ये पेट्रोल पंपाच्या मालक व कर्मचाऱ्यांनी ताईला एक मदतीचा हात दिला आहे.

मित्रांनो “धन,दौलत,पैसा, प्रॉपर्टी, शेती, घर दार या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे नसतील तर पतीकडे तुमच्याकडे ढुंकूनही कोणी बघणार नाही…अनेक युवक विना लग्नाचे राहिले असून अनेक महिला आपल्या पतीसोबत कठीण प्रसंगात राहायला तयार नाहीत… परंतु या संपूर्ण विषयाला सरला ताईने मात्र पूर्णविराम लावला आहे.  पती आजारी असताना देखील त्या पेट्रोल पंप वर काम करत आहेत हे मात्र पतीला जमले नाही म्हणून मधुकर देखील त्याच पेट्रोल पंप काम करून पत्नीला मदत करून आपले दिवस पुढे ढकलत आहे…ही गोष्ट इथेच संपत नाही तर हा विषय समाजामध्ये आदर्श घेण्यासारखा आहे एकीकडे मुली पळून जाणे,पतीला पत्नी सोडून जाणे अशा अनेक घटना घडतात परंतु तुमचं नातं जर मजबूत असेल तर तुमच्या नात्याला कोणीही तडा जाऊ देणार नाही असे चित्र या सरला व मधुकर चौधरी च्या माध्यमातून बघायला मिळाला आहे!

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद