बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सोहळा दोंडाईचा येथे संपन्न

 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा येथील सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छ.संभाजीनगर संचालित,खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय,दोंडाईचा येथे संस्था अध्यक्ष  शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दोंडाईचा येथील सुवर्णकार भवन येथे उत्साहात पार पडला.*
*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष प्रवीणभाऊ महाजन, संस्थेचे  अध्यक्ष  शिवाजीराव साळुंके पाटील   सचिव छायाताई साळुंके,संस्थेचे उपाध्यक्ष सत्यम साळुंके ,सौ कोमल  साळुंके,राष्ट्रवादी महिला धुळे जिल्हाध्यक्षा पूजाताई खडसे, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अवनी पाटील,दोंडाईचा शहर व ग्रामीण मराठी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र टाटीया जितेंद्रसिंग गिरासे,अख्तर शाह या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि* *दीपप्रज्वलन करण्यात आले नंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली .सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी,व्यसनमुक्तीपर नाटिका , राम आयेंगे गीत, क्या कहना हे आनंद दर्शवणारे गीत ,देशभक्तीपर गीत, व्यसनमुक्ति वर नाटिका, भगतगीत,पांडुरंग माऊली चे गीत ,आणि सर्वात शेवटी लेझीम नृत्य ,अशा विविध गीतांवर नृत्य सादर करून सुंदरतेने आपली कला दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला .सर्व प्रेक्षकांनी खुप कौतुक करुन विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढवण्याचा प्रयत्न केला .कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्षांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची आणि त्यांना शिकवत असलेल्या त्यांच्या विशेष शिक्षकांचे आणि शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे खूप कौतुक केले .संस्था अध्यक्ष साहेबांनी विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जी संकल्पना राबवली त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन केले .कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता .तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोंडाईचा शहरातील समाजसेवक .रावसाहेब भामरे यांनी कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिला ,स्टार्च फॅक्टरीचे सीईओ  राजेंद्र परमार साहेब यांनी विद्यार्थी आणि पालकांना भोजनाची व्यवस्था केली,पूजा ताई खडसे,कुमुद अग्रवाल, वीणा अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना वेशभूषा उपलब्ध करून दिली, गोपाल हॉटेलचे मालक टीनूसेठ यांनी नाश्त्याची व्यवस्था केली,प्रेरणा ताई राजपूत यांनी  पाण्याच्या बॉटल्सची मदत केली . ज्ञानेश्वर बागुल यांनी साऊंड सिस्टिम उपलब्ध करून दिली .छोटू मराठे यानी स्टेज व मंडप  उपलब्ध करून दिले, राज महाजन यांनी संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग करून दिली, मोहित वालेचा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे फोटोग्राफी करून दिली तसेच पंडित वाघ यानी सत्कारसाठी  पुष्पगुच्छ उपलब्ध करून दिले .संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील साहेबांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम,किशोर शेलार यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पाटील यानी केले.शाळेतील मुख्याध्यापिका सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली ✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद