पाचोरा वकील संघाच्या उपाध्यक्षा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्ष यांचे चि.रुद्र रायसाकडा यांचा वाढदिवस एक विस्मरणीय आठवणी सोबत.....!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा,२१मार्च २०२५) पाचो-या तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणजेच दुसरे मिनी पंढरपूर.... श्री गोविंद महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरे. पिंपळगाव(पाचोरा) आषाढी एकादशी दिवशी रात्री बारा वाजता श्री गोविंद महाराज यांच्या मंदिराचा घंटा आपोआप निनांदतो येथे दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रा भरते पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त येथे पायी दर्शनाला येतात असे हे नावाजलेल्या तीर्थक्षेत्र हरे. पिंपळगाव या संत भुमीच्या गावात मतीमंद निवासी कर्णबधिर विद्यालय आहे. त्या विद्यालयात पाचोरा वकील संघाचे नुतन उपाध्यक्षा व प्रख्यात विधी तज्ञ ॲड.सौ.कविता मासरे( रायसाकडा) मॅडम व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नुतन प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांचे चिरंजीव कु.रूद्रराजे रायसाकडा यांचा आज दिनांक २१ मार्च २०२५ शुक्रवार रोजी "जन्म दिवस" ह्या "२१मार्च" ला दरवर्षी अविस्मरणीय क्षणात किशोर रायसाकडा हा साजरा करत असतात. याच शुभ दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मतीमंद व कर्णबधिर मुलांसाठी दाळबट्टीचे जेवण देऊन आपल्या मुलाचा वाढदिवस साध्या सोप्या पद्धतीने साजरा केला.
यावेळी मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर, पिंपळगाव पोलीस स्टेशन चे API काळे साहेब, जेष्ठ पत्रकार सी.एन. चौधरी सर, शांताराम चौधरी सर, सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, पत्रकार नंदुभाऊ शेलकर, मधुर खान्देश चे संपादक श्री राहुल महाजन पत्रकार श्री किशोर लोहार, फोकस न्युज चॅनल चे संपादक श्री भुवनेश दुसाने, पत्रकार श्री राजेंद्र खैरनार श्री कुंदन बेलदार,छोटू सोनवणे, श्री चेतन महाजन, श्री ललित पाटील, श्री संदीप पाटील रोशन जैन राजू ठाकूर शिंदाड चे पत्रकार श्री भिकन पाटील सातगाव चे पत्रकार श्री गजानन लाधे,भालचंद राजपूत (पत्रकार) राकेश सुतार पिंपळगाव हरे पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक प्रकाश पाटील कॉन्स्टेबल श्री अमोल पाटील,पोलीस हवालदार श्री नरेंद्र नलवडे.
Comments
Post a Comment