पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे रमजान ईद निमित्त शहरात शांतता राहावी यासाठी डी.वाय.एस.पी. श्री.धनंजय येरुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मोठ्या संख्येने संपन्न.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे रमजान ईद निमित्त पाचोरा शहरातील पोलिसांनी रूट मार्च काढून शहरात शांतता राहावी यासाठी सर्वांना शांततेचे आवाहन केलेले असून हिंदू व मुस्लिम बांधवांनी सलोख्याने राहावे यासाठी प्रयत्न करावे आपले शहर आपले गाव व आपलेच सर्व असून आपण एकमेकाला सहकार्य केले पाहिजे तसेच रमजाननिमित्त हिंदू मुस्लिम बांधवांची पोलीस स्टेशनला बैठक घेण्यात आली यावेळी असंख्य मुस्लिम बांधव व हिंदू बांधव उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सी एन चौधरी सर श्री सचिन सोमवंशी श्री रसूल शेठ श्री अजहर खान श्री मौलाना तसेच या कार्यकर्त्यांनी आपले भाषण करताना सूचना केल्या की सर्वांनी शांतताने नांदावे यासाठी प्रयत्न करा तसेच यावेळी पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांनी जात धर्म न पाहता फक्त आपण सर्व एकच आहोत याची सर्वांनी काळजी घ्यावी यावेळी शहरातून असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते यानंतर आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रोजाचा उपास सोडण्यासाठी फळ फ्रूट देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सी एन चौधरी सर यांनी केले तर आलेले सर्वांचे आभार पीएसआय श्री योगेश गणगे उपस्थित होते
Comments
Post a Comment