राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक
पाचोरा दि. 23 -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भाषा अध्ययन प्रशाळा व संशोधन केंद्र, हिंदी विभाग आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21/03/2025 रोजी 'राष्ट्रीय निबंध लेखन प्रतियोगिता' व 'स्वतंत्र काव्यपाठ प्रतियोगिता' घेण्यात आली.
या स्पर्धेत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे (द्वितीय वर्ष - साहित्य) हिने काव्यवाचन स्पर्धेत 'उठो द्रोपदी शस्त्र उठा लो' ही कविता सादर करुन प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. सायमा शफी सैयद (प्रथम वर्ष - साहित्य) या विद्यार्थिनीने राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत 'एकता और सांस्कृतिक गौरव की वैश्विक आवाज' या विषयावर निबंध लिहून तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य मा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य मा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य मा. डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा.जयश्री वाघ उपस्थिती होते. महाविद्यालय परिवाराकडून सदर विद्यार्थिनींचे या उत्तुंग यशाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment