श्री राधा रमण मंदीराचा 25 वा वर्धापनदिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज दिनांक 23/03/2025, वार-रविवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्व . खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथील विद्यार्थ्यांना दोंडाईचा शहरातील व्यापारी मा .श्री सुदामशेठ माखीजा , त्यांचा संपूर्ण माखीजा परिवार , यांनी सिंधी कॉलनी दोंडाईचा येथे उभारलेल्या श्री राधा रमण आणि श्री स्वामी लीला शहा ह्या मंदिराच्या 25 व्या वर्धापन* *दिनानिमित्ताने ,शाळेतील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना आमंत्रित करून उत्सव साजरा करण्यात आला .25 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर दोंडाईचा येथील दीदीं,सिंधी समाजाचे अध्यक्ष मा .श्री गिरधारी लाल रूपचंदानी ,आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि त्यांचे टीचर माननीय श्री बालकृष्ण गुप्ता ( पप्पु भैय्या )आणि सर्व सिंधी बंधू भगिनी यांना आमंत्रित करण्यात आले होते . शाळेचे संस्था अध्यक्ष माननीय श्री .शिवाजीराव साळुंके पाटील साहेब , मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम,आणि शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून राधा रमण मंदिराच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .सर्वात प्रथम सर्व सिंधी बंधू-भगिनींनी फटाके फोडून आणि विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पवर्षाव करून, शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केले .मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली बैठक व्यवस्था केलेली होती .सर्व विद्यार्थ्यांना पाणी आणि सरबत देण्यात आले .नंतर आर्ट ऑफ लिविंग परिवाराने सुंदर सत्संग / भजनचा कार्यक्रम सादर केला .शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा सत्संगचा आनंद घेतला गणपतीच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून दाखवले आलेल्या सर्व मान्यवरांना आणि सर्व सिंधी बंधू भगिनींना विद्यार्थ्यांचे नृत्य खूपच आवडले .सर्वांनी मुलांचे कौतुक केले .* *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र बोधवानी यांनी केले .शाळेच्या विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी संस्थेबद्दल आणि शाळेबद्दल माहिती देऊन मा . माखीजा परिवाराचे, मा . संस्थाअध्यक्ष साहेब ,मुख्याध्यापिका मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आभार मानले .शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून श्री राधा रमण मंदिराचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सन्माननीय माखीजा परिवाराकडून रुमाल आणि युनिफॉर्म भेटवस्तू स्वरूप देण्यात आले . नंतर सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले . शाळेतील वि . शिक्षक श्री कमलेश पाटील सर ,श्री प्रवीण पाटील सर ,वि .शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम,श्रीमती मंदा शिरसाठ मॅडम,तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री दिनेश जाधव , श्री सुनील पवार, श्री हिम्मत रोकडे, श्रीमती यशोदा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सिंधी कॉलनी येथे नेऊन श्री राधा रमण मंदिराचा 25 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला .*
*पुन्हा एकदा मा . माखीजा परिवाराचे मनापासून आभार ✍️✍️ श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा*🙏🙏
Comments
Post a Comment