पाचोरा येथील पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केली मोहीम...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. रात्री गस्त घालताना एका चक्रीवर अचानकपणे छापा टाकला असता ४० हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले. चक्रीचालक घटनास्थळावरून फरार झाला. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.या घटनेबाबत वृत्त असे की, येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे २३ मार्च रोजी रात्री पावणेआठला राजीव गांधी टॉउन हॉलमागे एक इसम हा दुकानात टेबलवर संगणकाच्या साहाय्याने एलईडी स्क्रीनवर १ ते १० अंक असलेल्या चक्रीवर पैसे लावत होता. या ठिकाणी पोलीस पथकाने अचानक छापा टाकला. तेव्हा नागरिकांनी पळ काढला. पोलिसांनी दुकानातील ४० हजार रुपये किमतीचे २ कंपनीचे स्मार्ट एलईडी टीव्ही व २ सीपीयू जप्त करण्यात आले आहेत.या घटनेबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चक्रीचालक आरोपी अविनाश खंडू सूर्यवंशी (रा.पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवारांसह पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, वाहनचालक पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर पाटील यांनी केली.पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पाचोरा शहरात अवैधरित्या चालणाऱ्या चक्रीविरोधात मोहीम सुरू केल्याने चक्रीचालकांचे धाबे  दणाणले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..