एका आदिवासी कोळी समाजाच्या मुलीने शिर्डी येथे पार पडलेल्या भारत श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ज्युनियर "भारतश्री" हा मानाचा किताब मिळवुन नाव उंचावले...तीच्या हलाखीच्या परिस्थितीचा खडतर प्रवास...
नमस्कार मी कविता लक्ष्मण शेवरे. मी आज ज्या क्षेत्रात आहे त्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. वडील सोबत राहत नसल्या कारणामुळे सर्वस्व जबाबदारी ही आईवर होती. धुणी-भांडी ची कामे करून तिने आम्हाला शाळा शिकवली आमच्या गरजा पूर्ण केल्या. घरची परिस्थिती खूप हलाकीची असल्या कारणामुळे अवध्या वयाच्या अवघ्या चौदाव्या-पंधराव्या वर्षाची असताना मी आईसोबत धुणी-भांडी घासण्याची कामे करायला जाऊ लागले. मला लहानपणापासून खेळांची खुप आवड होती. शाळेमध्ये असताना मी अनेक खेळांमध्ये सहभाग घेतला.2023 पासून मी बॉडी बिल्डिंग करते. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये "नाशिक श्री" हा मानाचा किताब देखील मी पटकावलेला आहे. 2024 मध्ये ज्युनिअर महाराष्ट्र श्री. मिस्टर अँड मिस युनिव्हर्स या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत मी द्वितीय क्रमांक मिळवला. आग्रा येथील पॅराट्रूपस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्यारा जम्पिंग ऍक्टिव्हिटी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. दिल्ली येथे राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचालनासाठी माझी निवड झाली आणि कर्तव्यपथ दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासमोर संचलन केले. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन (IBBFF/IFBB) जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय मोरे सर आणि संदीप सोनवणे यांच्या पुढाकाराने नुकत्याच शिर्डी येथे पार पडलेल्या भारत श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ज्युनियर भारत श्री हा मानाचा किताब मी मिळवला. ज्युनियर वूमन फिजिक आणि ज्युनिअर वूमन बॉडी फिटनेस या दोन प्रकारच्या स्पर्धेमध्ये मी सुवर्णपदक जिंकले. परिस्थितीचे कारण देत बसलो तर आपण आपले स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो.जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशिबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. माझ्या कठीण परिस्थितीमध्ये ज्यांनी मला सहकार्य केलं अशा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद, तीचे नाशिक येथे कोळी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री किसन सोनवणे इ.समाजबांधव व महिला भगिनीं यांनी सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment