प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचोरा तालुक्याची गरुड झेप

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचोरा तालुक्याची गरुड झेप

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची योजना असून त्यातून दरमहा दोन हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी स्वरूपात मिळतात. त्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी ई-केवायसी करणे बंधनकारक असते. पाचोरा तालुक्यात एकूण १२९ गावे असून एकूण योजनेची लाभार्थी ३३२४२ एवढे आहेत. त्यापैकी प्रलंबित असलेल्या लाभार्थीना हप्ते नियमित मिळण्यासाठी ई-केवायसी नियमित करून घेण यासाठी कृषी विभागामार्फत वर्षभर प्रयत्न सुरू होते. तथापि १०० टक्के खातेदारांनी ई-केवायसी करुण घेणे अडचणीचे काम होते, अशा परिस्थितीत पाचोरा कृषी विभागाने "कृषी कीर्तन सप्ताहाची" विशेष मोहीम हाती घेऊन तालुक्यातील संपूर्ण गावागावात छोट्या-मोठ्या गाव बैठका, शिवार फेरी, शेतकरी प्रशिक्षण इत्यादी घेऊन तालुका कृषी अधिकारी पाचोरा श्री आर.एन.जाधव यांच्या    मार्गदर्शनाखाली कृषी सहायकांनी जनजागृती करत स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसी करून घेतली त्याचा दृश्य परिणाम म्हणून तालुक्यात ३९ गावांमध्ये शंभर टक्केवारी पूर्ण करण्याच्या कामात पाचोरा तालुका अव्वल ठरला. या कृषी विभागाचे विशेष मोहिमेचे जनमानसातून समाधान व्यक्त होत असून उर्वरित सर्व गावे मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के ई-केवायसी पूर्णत्वच्या मार्गावर आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..