पाचोरा तालुक्यातील तीस वर्षाच्या मतिमंद युवकावर शेतात अत्याचार व अनैसर्गिक कृती केल्याच्या प्रकरणी फरार असलेले संशयित यास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री संदीप राजपूत व श्री समीर पाटील यांनी सापळा रचून केले जेरबंद
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा तालुक्यातील एका गावात ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यातील घडला.संशयित ६७ वर्षांचा आरोपी या घटनेनंतर फरार आहे.
६७ वर्षाच्या वृद्धाने गावातील एका मतिमंद युवकाला गावाजवळील शेतात नेले.तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना शेतात मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली. त्यांनी त्या वृद्धाला पकडले मात्र तो पसार झाला.
ही घटना समोर आल्यानंतर पीडीत मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुला सोबत झालेल्या अतिप्रसंग कथन केला. व्हिडिओ काढणारे युवकही पोलिस ठाण्यात हजर झाले. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. लागलीच वेळेची पर्वा न करता तात्काळ तक्रार चालू असतानाच पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांनी तात्काळ एक पोलिसांची टीम तयार केली त्यामध्ये श्री संदीप राजपूत व पोलीस ड्रायव्हर श्री समीर पाटील यांनी सापळा रचून त्याची गुप्त माहिती घेऊन त्याला अटक केले
Comments
Post a Comment