नगरदेवळा येथे सार्वजनिक चौकात आणि स्मारक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावे यासाठी नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.

सार्वजनिक चौकात आणि  स्मारक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे यासाठी नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार श्री मोरे महाराज, श्री दिनेश पाटील , तसेच सरपंच सौ प्रतिक्षाताई काटकर ,श्री  किरण काटकर सर  यांना निवेदन देण्यात आले
नगरदेवळा सह परिसरात वाढत्या चोरी, अवैधता व इतर अनेक विघ्नसंतोषी कारवायांना आळा बसवण्यासाठी व याती संबंधितांवर वचक बसवण्यासाठी ग्राप. वा पोलीस भकित तातडीने गावातील विविध चौक व सर्वच स्मारकानाजवळ सी सी टी व्ही कॅमेरा बसावावे अशी नम्र विनंती 
सद्यास्थितीत गाव परिसरातून कापूस, पाळीव प्राणी, शेतीजन्य माल साहित्य, मोटारसायकली, लहान मोठे दुचाकी वाहने व घरफोडीच्या भुरट्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ होत असून दररोज एक ना अनेक ठिकाणी चोऱ्या होत असल्याने सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आमच्या पोलीस बांधवा वरील ताणही कमी होईल . यासाठी अभिलाषा भिला रोकडे युवती अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निवेदन दिले त्यांच्या समवेत मुकेश राजपूत  युवासेना जिल्हा उपाध्यक्ष , गणेश गुंजाळ  , निलेश महाजन, गोरख महाले, प्रणव महाजन उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..