आज दिनांक १ एप्रिल२०२५ मंगळवारी सकाळी अनिल महाजन माता-पिता,व परिवासह चारी धाम यात्रा आनंदाने पुर्ण करुन परतले घरी...




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल कट्टा (

आज दिनांक १/४/२०२५ मंगळवार सकाळी) पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेले सध्या मुंबई येथे व्यवसाय निमित्ताने वास्तव्यास असलेले अनिल महाजन यांनी त्यांच्या कुटुंबासह आणि आई-वडिलांसोबत जगन्नाथ पुरी, गंगासागर ही शेवटची चार धाम तीर्थयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मागील चार वर्षापासून सुरू असलेला हा चार धाम तीर्थ यात्रेचा प्रवास १ एप्रिल ला पूर्ण झाला आहे. अनिल महाजन हे वरिष्ठ पत्रकार (मंत्रालय, मुंबई) तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष असून यांनी या यात्रेत सर्व सुख-सुविधांचा अनुभव घेतला आहे ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासनाने त्यांना मोलाचे सहकार्य केले आणि दोन्ही ठिकाणी व्हीआयपी प्रोटोकॉल अंतर्गत उत्तम दर्शनाचा लाभ मिळाला.

चारधाम पैकी शेवटच्या असलेल्या एक दाम म्हणजेच पुरी आणि गंगासागर या यात्रेत प्रशासनाच्या वतीने शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच गंगासागरला जाण्यासाठी पश्चिम बंगाल प्रशासनाने विशेष बोट आणि प्रोटोकॉलची व्यवस्था करण्यात आली होती. अनिल महाजन यांच्या राष्ट्रीय स्तरावरील मित्रपरिवार आणि शासकीय-राजकीय संपर्कांचा या यात्रेत मोठा उपयोग झाला. त्यांनी आपल्या सर्व मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

(शब्दांकन:-संपादक मधुर खान्देश न्युज चॅनल युवा पत्रकार राहुल महाजन)

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..