रमजानच्या पवित्र महिन्यात डॉक्टर आलम देशमुख व सामाजिक कार्यकर्ते हरून देशमुख यांना एका शेतकऱ्याचे हरवलेले पन्नास हजार रुपये दिले परत...! जीवंत उदाहरण कलियुगात ईमानदारी अजुनही शाबुत
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
रमजानच्या पवित्र महिन्यात डॉक्टर आलम देशमुख व सामाजिक कार्यकर्ते हरून देशमुख यांना एका शेतकऱ्याचे हरवलेले पन्नास हजार रुपये दिले परत...! जीवंत उदाहरण कलियुगात ईमानदारी अजुनही शाबुत
पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी येथील शेतकरी नवनाथ बहादुर सिंग ,पाचोरा येथील आयडीबीआय बॅंकेत काही कामानिमित्त पाचोराला आलेले असताना त्यांच्याजवळ असलेले पन्नास हजार रुपये ची बॅग हरवली होती योगायोगाने मागून डॉक्टर आलम देशमुख व हारून देशमुख यांना ती बॅग सापडले असता त्यांनी त्यामध्ये असलेले पन्नास हजार रुपये व कागदपत्र तसेच पिंपरी येथील शेतकऱ्याचा नावाचा कागद आढळला असता त्यांनी त्वरित जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री उद्धव भाऊ मराठे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी लगेच त्या शेतकऱ्यांना कळविले त्यामुळे दुःखा असलेले शेतकरी यांनी आपले पैसे परत मिळत असल्याचे कळताच त्यांना आनंद झाला आपल्या कष्टाचे इमानदारीचे पैसे वापस मिळत आहे तसेच रमजान महिन्याचा पवित्र सण असून या पवित्र महिनादिनी डॉक्टर आलम देशमुख व हारून देशमुख,दानिश देशमुख ,मुजाईद देशमुख,तारीक देशमुख,नावेद देशमुख,मुकीम देशमुख,आशिफ देशमुख,अल्तामश देशमुख,एजाज देशमुख,यांनी आपली प्रामाणिकता सिद्ध करून मिळालेले पन्नास हजार रुपये वापस दिले यावेळी ही रक्कम माजी जिल्हा परिषद सदस्य श्री उद्धव भाऊ मराठे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब श्री डॉक्टर आलम देशमुख श्री हरुन देशमुख सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले, पत्रकार श्री राजेंद्र खैरनार , शेतकरी यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनला पन्नास हजार रुपये वापस मिळाले त्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. या कामी पाचोरा पोलिस स्टेशन चे कर्मचारी श्री रणजीत पाटील, श्री योगेश पाटील, श्री राहुल शिंपी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
Comments
Post a Comment