कृषी विभागातील विविध योजनांची गाव निहाय प्रशिक्षण मोहीमेला नंदीचे खेडगाव येथुन प्रारंभ...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
कृषी विभागातील विविध योजनांची गाव निहाय आणि मंडळ प्रमाणे तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्याची विशेष मोहीम दिनांक 20/03/25 ते 25/03/25 पर्यंत राबवण्यात येत आहे
त्याची सुरवात पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथून झाली
ग्रामपंचायत कार्यालय यांच्या सहकार्याने सायंकाळी 6वाजता हा मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम असंख्य गरजू शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावातील प्रतीष्टीत शेतकरी श्री. अशोक आबा हे होते. तर सुत्रसंचालन  विभागाचे श्री. कैलास कुमावत व श्री. रविंद्र पाटील यांनी केले. या कार्यक्रमात. मा. तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश जाधव साहेब यांनी पुढील काही  महत्वाच्या योजनाबद्दल मार्गदर्शन केले.

1)पी एम किसान- या  योजनेची अंतर्गत ई केवायसी
2) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ....फळ झाडे आणि शेवगा लागवड तंत्रज्ञान
3) सूक्ष्म सिंचन योजना- अर्ज प्रक्रिया, योजनेचे फायदे, अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन
4) PMFME - अर्जप्रक्रिया ते प्रकरणास बँक मंजुरी मिळणे बाबत
5) जलयुक्त शिवार अभियान 2.0 - मृदसंधारणा विषयी जनजागृती
6) बियाणे व खत पुरवठा- सन 2025-26 मधील खरीप हंगामातील पीक नियोजन व पूर्वतयारी
7) ॲग्रीस्टॅक-  आणि किसानं कार्ड
8) मागेल त्याला शेततळे- योजना
9) महाडीबीटीवरील सर्व योजना संदर्भात अर्ज प्रक्रिया कागदपत्रे आणि आणि योजनांचे महत्त्व
10) महाडीबीटीवरील कृषी यांत्रिकीकरणा ची व्याप्ती
11) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमाचे महत्व 
11) डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान नियोजन 
12) मृदा तपासणी विषयी जनजागृती
13) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
14) आत्मा योजनेअंतर्गत विविध घटक
15)  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उदोग योजना (PMFME)
श्री. जाधव साहेब यांनी गावातील लोंकाचा सहभाग पाहुन आपले गाव आदर्श  गाव बनु शकते अशी अपेक्षा व्यक्त केली

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
 मंडळ कृषी अधिकारी श्री.यु.आर. जाधव
कृषी पर्यवेक्षक  निंकुभ साहेब
आर. बी. चौधरी, श्री. साळवे,  श्री अभिजित
 संगीता मॅडम व पवार मॅडम यांनी  परिश्रम घेतले होते
सर्वांचे श्री. रविंद्र पाटील कृषी सहाय्यक खेडगाव नंदीचे व ग्रामपंचायत यांच्या कडुन आलेल्य मान्यवरांचे आभार माणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद