पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील संवेदनशील गुन्हातील आरोपीस तात्काळ जेरबंद केल्याने 2 पोलिस अधिका-यांचा पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेबांनी केला तात्काळ सत्कार...

पाचोरा पोलीस ठाण्यात  दिनांक 21/ 03 /2025 रोजी
 अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 कलम 92 (ब)(ड)(इ) तसेच BNS  कलम 115,133,351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 सदरचा गुन्हा संवेदनशील असल्याने पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तात्काळ पोलीस  पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत  व पोलीस हवालदार समीर पाटील यांना  आरोपीचा शोध   घेऊन हजर करण्यास सांगितले असता दोघांनी आरोपी यांचा  कसोशीने  शोध घेऊन सदर आरोपीस पुढील कारवाई करीता पाचोरा पोलीस ठाण्यात हजर  केले आहे.
 त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच पाचोरा पोलीस ठाण्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..