अँटी करप्शन बोर्ड दिल्ली तर्फे नासिक सिन्नरला सौ. राजश्री चौधरी यांना "महाराष्ट्र भूषण पुरस्कार"
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
अँटी करप्शन बोर्ड दिल्ली तर्फे नासिक सिन्नरला सौ. राजश्री चौधरी यांना "महाराष्ट्र भूषण पुरस्कार"
देऊन झाला सत्कार. व अँटी करप्शन बोर्ड च्या वतीने डिव्हिजन वाईस प्रेसिडेंट छत्रपती संभाजीनगर च्या पदावर नियुक्ती ...
औरंगाबाद ( राहुल परदेशी): नाशिक मधील सिन्नर येथे काल दि .19 मार्च 2025.
रोजी बॅक्वेट हॉल, फाइव स्टार हॉटेल , संस्कृती घोटी रोड,सिन्नर
येथे सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रातील अतुलनिय कामगीरी बद्दल दिल्ली व महाराष्ट्रच्या पहिल्या महिला पत्रकार म्हणून,ज्यांनी उंच भरारी घेऊन समाजातील, अंधश्रद्धा ,अत्याचार , भ्रष्टाचार, बुवाबाजी, हुंडाबळी, महिलांवरील अत्याचाराला विश्वजगत,
साप्ताहिक सबला उत्कर्ष वृत्तपत्र दिल्ली & महाराष्ट्र वृत्तपत्रामधून आपल्या लेखणीने वाचा फोडली, पॉझिटिव्ह बातम्या आणि सामाजिक लेख यांच्या माध्यमातून समजाप्रबोधन केले. औरंगाबाद येथील सबला उत्कर्ष फाउंडेशन च्या वतीने सामाजिक कार्यातही भर दिला. आतापर्यंत राजश्री चौधरी यांना 35 पुरस्कार दिल्ली व महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेले आहेत व त्यांना जीवन गौरव पुरस्काराने देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांनी सन्मानित केलेले आहे. त्यांच्या ह्या अतुलनिय कार्याची दखल अँटी करप्शन बोर्ड
नवी दिल्ली चे निवड समिती अधिकारी यांनी घेतली व, महाराष्ट्र राज्याच्या आयोजन समितीमार्फत,त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर सौ राजश्री राहुल चौधरी यांना अँटी करप्शन बोर्ड च्या वतीने डिव्हिजन वाईस प्रेसिडेंट छत्रपती संभाजीनगर च्या पदावर नियुक्ती देखील करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून, व्यासपिठावर मा.कॅप्टन अशोककुमार खरात, नंदकुमार अहिरे (कृषी अधिकारी ) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा खैरनार (राष्ट्रीय उपाध्यक्ष अँटी करप्शन बोर्ड ), रविदास बाविस्कर ( महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन बोर्ड उपाध्यक्ष) हे होते तर उपस्थितामध्ये स्वप्निल डोंगरे शिवशाहीर सिन्नर, मच्छिंद्र बिडवे, साई इव्हेंट मॅनेजमेंट, सिंगर माधुरी ताई गुंजन, कोकाटे सुरेंद्र देशमुख , अशोक भवारी (बि.डी.ओ) रितेश बैरागी( मुख्याधिकारी) संभाजी गायकवाड( पोलीस निरीक्षक सिन्नर ), जितेंद्र भावे (निर्भय संघटना), धनराज वाघमारे( पोलीस क्राईम न्यूज लातूर), नामकर्ण आवारे (चेअरमन स्टाईस ),सोमनाथ पावशे (नगरसेवक सिन्नर), बाळासाहेब सोपान माने (युवा उद्योजक ), गणेश आव्हाड (संचालक ,सक्सेस प्लेसमेंट सिन्नर), कर्नल साहेबराव शेळके इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला, यांचे दिल्ली व महाराष्ट्रातील धुळे , जळगाव, औरंगाबाद , मुंबई जिल्हयामध्ये सर्वत्र जल्लोषात स्वागत होत असून कौतुक केल्या जात आहे. त्यांना मिळालेल्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरिय पुरस्कारा बद्दल त्यांचे श्रीमान विश्वास आनंद आरोटे, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ , आर्मी ऑफिसर श्री. अशोक हंगे (री. ए. एम. सी. छत्रपती संभाजीनगर) , आर्मी ऑफिसर विठ्ठल उबाले (RETD)छ. संभाजीनगर, आरोग्य सल्लागार वाहेद खान छ संभाजीनगर , सबला उत्कर्ष फाउंडेशन सचिव अण्णा निरंजन खैरनार , छ. संभाजीनगर , ऑफिसर निलेश ठाकूर (जिल्हा परिषद छ. संभाजी नगर ), गणेश चौधरी मुख्य संपादक छ. संभाजी नगर, पत्रकार धनंजय गाळणकर धुळे , पत्रकार रोहिदास चौधरी पारोळा धुळे, तलाठी साक्री लोंढे अण्णा, रोहित साकेत (समाज कल्याण ऑफिस) जळगाव, डॉक्टर नलीन महाजन रवंजे (जळगाव), बॉलीवूड सिंगर अमित जैन नई दिल्ली, अतिक अत्तर सीआरपीएफ दिल्ली, अखिलेश वर्मा बॉलीवूड ऍक्टर/ कोरिओग्राफी/ डान्सर मुंबई डॉक्टर संजय चौधरी , डॉक्टर सुनिता चौधरी (सोयगाव बनोटी), एडवोकेट हर्षा चौधरी छ.संभाजी नगर, पोलीस मस्के छ. संभाजी नगर , परिवारातील व समाजातील सर्वांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment