पाचोरा तालुका "कृषी विभागाचा अभिनव उपक्रम" राबवण्यात येत आहे
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
"कृषी विभागाचा अभिनव उपक्रम" गेल्या पंधरा दिवसापासून कृषी विभाग पाचोरा यांचेमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उपक्रमांतर्गत गावोगाव बैठका, शेतकरी मिळावे, शेतकरी प्रशिक्षण,घोंगडी बैठका, शेतकरी प्रशिक्षण, चर्चासत्र इत्यादींच्या माध्यमातून विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी तसेच अद्यावत कृषि तंत्रज्ञानाची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर सदरील उपक्रमांची परिणामकारकता वाढवण्यासाठी कृषी विभाग पाचोरा यांनी तालुका कृषि अधिकारी, रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनातून सर्व मंडळातील कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांनी गेल्या आठ दहा दिवसांत ," कृषि कीर्तन सप्ताहाच्या" माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनांसह तंत्रज्ञान यांचा प्रचार प्रसार करत सध्या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत फार्मर 'आय डी' तयार करणे व पिएम-किसान अंतर्गत ईकेवायसी नोंदणी करण्याचे कामाकाज युद्धपातळीवर सुरू केलेत. वेगवेगळ्या कल्पना व कृलृप्त्या वापरून देखील पाहिजे ती गती येत नसल्याने शेवटी पाचोरा कृषि विभागाची संपूर्ण क्षेत्रीय टिम यांनी गावोगाव जावून वरील उपक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करण्याचा अभिनव उपक्रम व ई. के. वाय.सी. करण्यासाठी सर्व उपाय योजनांचा अवलंब करण्यात आला.आता एवढ्यावरच न थांबता अग्रीस्टॅग अंतर्गत फार्मर आय.डी. तयार करण्यासाठी आवश्यक असलेली पीएम-किसान योजनेअंतर्गत केवायसी चे काम करण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी कर्मचारी यांनी फक्त कार्यालयात बसूनच काम न करता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन , बांधावर जाऊन, तसेच विविध सुविधा केंद्रांना भेटी देत, मिळेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घेऊन कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी ईकेवायसी चे काम करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. या उपक्रमामुळे आता शेतकरी बांधवांनी देखील त्यांना तसा प्रतिसाद दिलेला आहे, आणि त्यामुळे सर्व जनसामान्यातून कृषी विभागाबद्दल आदर व समाधान व्यक्त केले जात आहे. यापैकी काही कृषि सहाय्यकांचे कामकाजाबाबत परामर्श घेतला असता मौजे बांबरूड खुर्द प्र.पा.येथील कृषि सहाय्यक श्री प्रशांत पाटील हे शेतकर्यांच्या थेट शेतावर जावून सोबतच ग्राहक सुविधा केंद्राचे चालक श्री प्रविण पाटील यांच्यासह शेतावरच ईकेवायसीचे काम 100% पूर्ण केले. तर श्रीमती वैशाली पाटील, कृषि सहाय्यक,पिंपळगाव खुर्द यांनी मौजे संगमेश्वर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात संगमेश्वर सह,चुंचाळे,नगरदेवळा सिम, पिंपळगाव खुर्द येथील 100% ईकेवायसी करत अग्रीस्टॅग ची नोंदणीसह PMFME चे अर्ज भरून घेतले याच पद्धतीनेच पाचोरा तालुक्यातील सर्व गावागावात कृषि विभागातील कर्मचाऱ्यांकडून कामाकाज सुरू असून सर्वसाधारण पणे स्वतःच ईकेवायसी करणे किती महत्वाचे आहे हा आदर्श सर्व सामान्यांसमोर ठेवलेला आहे.आजमितीस तालुक्यातील एकूण 129 गावांपैकी 96 एवढी गावे 100% पूर्ण करत पाचोरा तालुक्यातील कामाकाज सर्व दृष्टिकोनातून अव्वल स्थानावर ठेवले, सदरील मोहीम हि, रमेश जाधव, तालुका कृषि अधिकारी, पाचोरा यांच्या मार्गदर्शनातून मंडळ कृषि अधिकारी, सुनिल बोरसे, उत्तम जाधव व सुनिल पाटील यांच्या सहकार्या व नियोजनातून सर्व क्षेत्रीय कृषि सहाय्यक यांनी फत्ते केली.
Comments
Post a Comment