काल पाचोरा येथे लोकन्यायालयात हजारों च्या संख्येने प्रकरणांचा निपटारा...



मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल 
पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च रोजी विधी सेवा समितीचे प्र.अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर जी. एस बोरा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी बी औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण 166 इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात 2 कोटी 4 लाख 14 हजार 583 रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व 892 प्रकरणांचा निपटारा होवून यात 2 कोटी 14 लाख 26 हजार 892 रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. एकूण 4 कोटी 18 लाख 41 हजार 475 रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. यावेळी दहा वर्षे जुने चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले.

तसेच व्हर्च्युअल पद्धतीने दोन प्रकरणे निकाली काढले, तसेच कौंटूंबिक वाद मधील 20 प्रकरणे निकाली निघाले. 
  यावेळी पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती जी.एस.बोरा तसेच विधी सेवा समिती सदस्य ललिता पाटील यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पंच सदस्य म्हणून श्रीमती ललिता पाटील यांनी कामकाज पाहिले. तसेच सदर लोक न्यायालय यशस्वी करण्याकरिता पाचोरा न्यायालयातील सर्व वरिष्ठ,कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, कर्मचारी, बी. एस.एन.एल. अधिकारी, कर्मचारी, वीज महावितरण अधिकारी, कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तथा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद