कृष्णापुरीत अश्विनी ऑटो मोबाईल च्या बाजुला ‘तिरुपती हार्डवेअर अॅण्ड प्लंबिंग’चे भव्य उद्घाटन २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील कृष्णापुरी परिसरात ग्राहकांच्या सोयीसाठी नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या “तिरुपती हार्डवेअर अॅण्ड प्लंबिंग” या दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.
या शुभप्रसंगी सकाळी ११ वाजता कलशपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून, सायंकाळी ५:०० वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.
दुकानाचे उद्घाटन मा. श्री. संजय हिरामण एरंडे (नगरसेवक, न.पा. पाचोरा) यांच्या शुभहस्ते होणार असून, मा. श्री. अनिल बारकू पाटील (उपसरपंच, पुनगाव ता. पाचोरा) हे प्रमुख उपस्थित म्हणून लाभणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण भारत डेअरी बस स्टॉपजवळ, अश्विनी ऑटोच्या बाजूला, कृष्णापुरी, पाचोरा (जि. जळगाव) येथे निश्चित करण्यात आले आहे. या नव्या दुकानाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दर्जेदार हार्डवेअर व प्लंबिंग साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
उद्योजक समाधान अभिमन पाटील व पवन राजेंद्र पाटील यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला असून, सर्व नागरिकांनी या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून नव्या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे नम्र आवाहन केले आहे.
नवीन व्यवसायामुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच परिसराच्या विकासाला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..