अवघ्या ४ तासांत मोटारसायकल चोरीचा उलगडा; आरोपीस ताब्यात घेत चोरीची दुचाकी जप्त – १२ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
पाचोरा शहरात घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेचा पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चार तासांत छडा लावत आरोपीला ताब्यात घेत चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली. विशेष म्हणजे या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही अवघ्या १२ तासांच्या आत मा. पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
फिर्यादी प्रशांत शंकर वाघ (वय ४२, व्यवसाय शेती, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.३७ वाजता जामनेर रोडवरील राधास्वामी पेट्रोलपंप येथे त्यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो, लाल रंगाची मोटारसायकल (क्र. MH-19 BR-4211) पार्क करून ठेवली होती. मात्र काही वेळातच अज्ञात इसमाने सदर मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपी तुषार लक्ष्मण आघाडे (वय २७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये दिनांक १४ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी व पो.कॉ. शरद मांगो पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारत डेअरी बसस्टॉप परिसरात एक इसम मोटारसायकलसह संशयास्पद हालचाली करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ भारत डेअरी बसस्टॉप परिसरात जाऊन संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल आढळून आली.
पोलिसांनी त्यास पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने आपले नाव तुषार लक्ष्मण आघाडे (रा. सातगाव डोंगरी) असे सांगितले व गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष आरोपीकडील सुमारे १५ हजार रुपये किंमतीची हिरो फॅशन प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी यांनी करून गुन्ह्याचे दोषारोपपत्र अवघ्या १२ तासांच्या आत मा. पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले.
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी व पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद