गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची कनिष्का महाजनची आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये "सुवर्ण कामगिर"; तीन गोल्ड मेडल्सची कमाई!
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : नुकत्याच पार पडलेल्या SOF (Science Olympiad Foundation) द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कनिष्का राहुल महाजन हिने दैदिप्यमान यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
इयत्ता दुसरी (इंग्रजी माध्यम) मध्ये शिक्षण घेत असलेल्या कनिष्काने आपल्या बुद्धिमत्तेची आणि अभ्यासू वृत्तीची झलक दाखवत तब्बल तीन सुवर्णपदके (Gold Medals) पटकावली आहेत.
विषयानुसार तिची कामगिरी लक्षणीय ठरली आहे—
सामान्य ज्ञान (General Knowledge) : ९८.४६% गुण (Distinction) – शाळेत प्रथम, सुवर्णपदक
गणित (Mathematics) : ८९.७५% गुण – शाळेत प्रथम, सुवर्णपदक
विज्ञान (Science) : ८२.६९% गुण – शाळेत प्रथम, सुवर्णपदक
कनिष्काच्या या अष्टपैलू यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याबाबत शाळेचे प्राध्यापक प्रेम कुमार शामनानी यांनी तिचे विशेष कौतुक करत सांगितले की, “कनिष्काचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या कामगिरीमुळे शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.”
कनिष्काच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे व तिचे पालक मधुर खान्देश साप्ताहिक वृत्ताचे राहुल महाजन यांचे अभिनंदन होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment